लायन्स क्लब ऑफ राहाताच्या 2026-27 कार्यकारिणीचा भव्य शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न
राहाता
- समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा अखंड वारसा जपत लायन्स क्लब ऑफ राहाता यांच्या 2026-27 या वर्षातील नव्या कार्यकारिणीचा 8 वा Induction and Installation Ceremony अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजसेवेची शपथ घेत समाजहितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
यावेळी अध्यक्ष म्हणून लायन उमेश शेटे, सचिव म्हणून लायन दिनेश कार्ले आणि कोषाध्यक्ष म्हणून लायन खिझर शहा यांची निवड करण्यात आली. त्यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात मावळते अध्यक्ष ॲड. संतोष घोडके यांनी मागील वर्षभरात क्लबने राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला. मावळते सचिव ॲड. दिनेश कार्ले यांनी वर्षभरातील कार्याचा सविस्तर अहवाल सादर केला.
Installation Officer लायन प्रवीण गुलाटी तसेच Induction Officer लायन डॉ. संजय उबाळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत समाजसेवेच्या कार्यासाठी प्रेरित केले. प्रविण गुलाटी यांनी लायन्स बद्दल माहिती दिली व सर्व लायन्स सभासद यांनी समाजासाठी ,गरजू मुलांसाठी, वयोवृद्ध व्यक्ती यांना मदत करून चांगल्या अँक्टिव्हिटी करणेबाबत आव्हान केले
कार्यक्रमामध्ये ग्रॅज्युएट चहा चे संस्थापक अध्यक्ष तथा सर्वेसर्वा लायन श्री. निलेश जाधव सर यांनी कीनोट स्पीकर म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत प्रभावी, प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक भाषण केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांमध्ये सेवाभाव, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची नवी ऊर्जा निर्माण केली.
यावेळी रीजन चेअरमन ॲड. संदीप गोंदकर आणि झोन चेअरमन लायन अक्षय गिरमे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब ऑफ राहाता यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले. लायन डॉ. संजय उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबने जिल्हा पातळीवर उल्लेखनीय कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार ॲड. संदीप गोंदकर यांनी काढले. तसेच नव्या कार्यकारिणीला आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गायकवाड यांनी केले.
यावेळी लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य लायन डॉ. एकनाथ गोंदकर, लायन प्रकाश सदाफळ, डॉ. संजय गायकवाड, ॲड. गोरखभाऊ दंडवते, लायन अंजली उबाळे आणि लायन संध्याताई कार्ले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मागील कार्यकारिणीतील उपाध्यक्ष लायन मुन्नाभाई शहा, लायन राजेंद्र बांगर तसेच सचिव लायन रतन चौधरी यांनी वर्षभरातील समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत सर्व सदस्यांचे आभार मानले.
यावेळी लायन्स क्लब शिर्डीचे अध्यक्ष श्री महेश वैद्य, विजय थोरात, विकास शिवगजे, अनिल दोरवाणी, लायन्स क्लब श्रीरामपूरचे राहुल होले तसेच लायन्स क्लब कोपरगावचे PST तसेच राहाता येथील गुंतवणूक तज्ञ आणि साई चरित्र अभ्यासक श्री रवींद्र जोशी तसेच श्री संजय भणगे, विजय निरगुडे, चंद्रशेखर सोनी, हर्षल चोळके, शैलेश सोळंकी, रुचिका कोरडे, प्रकाश भोसले, सतीश गोरडे, श्री व सौ. ऋषीराज नळे, खंडेराव शेटे, श्री व सौ. संदीप शेटे, राजुभाऊ शेटे, श्री व सौ. गणेश लांडगे, रवी बनसोडे, उर्मिला हासे आणि सविता काळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरला तायडे, श्वेता कार्ले, स्मिता मुरादे, सुनील हासे, साहेबराव गायकवाड आणि सोहन उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरला तायडे यांनी केले, तर सोहन उबाळे यांनी उपस्थित मान्यवर, सदस्य आणि पाहुण्यांचे आभार मानले.
यावेळी लायन डॉ. संजय उबाळे यांना मागील वर्षी झोन चेअरमन म्हणून केलेल्या उल्लेखनीय, प्रभावी आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत Multiple Council कडून प्रदान करण्यात आलेले Appreciation Certificate लायन प्रवीण गुलाटी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत परस्परांतील आपुलकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ केली.
समाजहित, सेवाभाव आणि मानवतेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत लायन्स क्लब ऑफ राहाता नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आगामी वर्षातही अधिक जोमाने समाजोपयोगी उपक्रम राबवेल, असा दृढ विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. समाजसेवेची ही अखंड परंपरा अशाच उत्साहाने आणि समर्पणाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा