शनिवार, २५ जुलै, २०२६

आषाढी एकादशीनिमित्त श्री साईबाबा संस्थान येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्‍थानिक उत्सव साजरा ....साईप्रसादालयात २३ हजार भाविकांनी घेतला साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ

आषाढी एकादशीनिमित्त श्री साईबाबा संस्थान येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्‍थानिक उत्सव साजरा ....
साईप्रसादालयात २३ हजार भाविकांनी घेतला साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ
 

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या वतीने आज आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री साईप्रसादालयात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता.
आषाढ शुद्ध एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. साईबाबांनी त्यांचे परमभक्त दासगणू महाराज यांना भगवान विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिल्याची पावन परंपरा आहे. बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाईत साजरा केला जात असे. त्याच परंपरेनुसार आजही हा उत्सव संस्थानतर्फे भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्री साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर भगवान श्री विठ्ठलाची प्रतिमा विराजमान करण्यात आली. तसेच धूप आरतीच्या वेळी श्री विठ्ठलाची पारंपरिक मराठी आरती गायली जाईल.
उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून रात्री ०७.३० ते ०९.०० या वेळेत ह.भ.प. दिगंबर महाराज बोरसे, राहाता यांचे कीर्तन संपन्न होईल. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात येईल. पालखी समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती होईल.
आषाढी एकादशीच्या महाप्रसादाचा अंदाजे २३ हजार भाविकांनी लाभ घेतला. तसेच २८ हजार ९८३ भाविकांना अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाच्या तयारीसाठी संस्थानतर्फे ४५ पोते साबुदाणा, ३४ पोते शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल, सुमारे १,९०० किलो बटाटे तसेच इतर आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करून धार्मिक वातावरणात उत्सव साजरा केला. हजारो साईभक्तांनी दर्शन, आरती, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...