शनिवार, २५ जुलै, २०२६

नेवासा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्यरात्री शेतात लपवलेला लाखो रुपयांचा गांजा हस्तगत दोघे जेरबंद !

नेवासा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्यरात्री 
 शेतात लपवलेला लाखो रुपयांचा गांजा हस्तगत दोघे  जेरबंद !

नेवासा 
:-दि.२४ च्या मध्यरात्री नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार ६० रुपयांचा तब्बल ४७.८२८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दि.२४ जुलैच्या रात्री ११:५० ते २५ जुलैच्या मध्यरात्री १:५० च्या सुमारास नेवासा पोलिसांना वाकडी शिवारात गुंगीकारक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांना माहिती मिळाली मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या उपस्थितीत नेवासा पोलिसांनी तात्काळ वाकडी येथील महादेव पंडित जवदे याच्या राहत्या घराजवळील शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.पोलिसांनी शेडची पाहणी केली असता तेथे पिवळ्या,पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या ३ वेगवेगळ्या गोण्यांमध्ये गांजाचा साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.पिवळ्या गोणीत १५.८४२ किलो (किंमत १,५८,४२० रु.),
पांढऱ्या गोणीत १३.१०- किलो (किंमत १,३१,००० रु.) आणि हिरव्या गोणीत १८.८८६ किलो (किंमत १,८८,६४० रु.) असा एकूण ४७.८२८ किलो गांजा मिळून आला.या कारवाईत पोलिसांनी महादेव पंडित जवदे (वय ३८ वर्षे) आणि त्याचा साथीदार शुभम बाबासाहेब काळे (वय २९ वर्षे, दोघे रा.वाकडी,ता. नेवासा,जि.अहिल्यानगर) यांना  ताब्यात घेतले. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणी पोलीस अंमलदार शहाजी बाबासाहेब आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुरनं ६३४/२०२६, NDPS कलम २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,
शेवगांव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू,पोलीस निरीक्षक  प्रताप दराडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक  अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे ,पोलीस हवालदार शहाजी आंधळे ,रवी शेळके ,अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, हरी गायतडक ,संदीप ढाकणे, सुमित करंजकर,नवनाथ शेकडे, गणेश फाटक, राहुल गायकवाड, चालक पोलीस हवालदार खंडागळे मेजर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे व होमगार्ड यांनी केली. 
पुढील तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार पो.नि.प्रताप दराडे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...