नवनाथांच्या कृपाछायेत विज्ञानप्रेमी विद्यार्थी घडविणाऱ्या मायंबा शाळेस सर्वतोपरी मदत – प्रा. लक्ष्मण गोर्डे
जि. प. प्रा. शाळा, मायंबा क्लास येथे मंगळवारी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी जलसंपदा व पालकमंत्री मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून प्राप्त सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या इंटरऍक्टिव्ह बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच राहाता नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, गुणवंत विद्यार्थी, नवप्रवेशित विद्यार्थी, माजी शिक्षक, नवनियुक्त मुख्याध्यापक तसेच शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर उपस्थित होते. प्रा. गोर्डे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या अडचणी नगरपालिकेमार्फत सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव यांनी ‘मिशन आपुलकी’मुळे शाळेचा कायापालट कसा होत आहे याची माहिती दिली.विदयार्थ्यांनी तालबद्ध लेझीम , सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली.
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर यश संपादन करणाऱ्या तन्वी जयेश थोरात, आर्वी निलेश थोरात, आरुष अमोल बेदरे, आराध्या श्रीरंग कुऱ्हे, कृष्णा श्रीरंग कुऱ्हे, शिवांजली गजानन भुरके, तनिष्क जयेश थोरात या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच पदोन्नत मुख्याध्यापक रामदास काळोखे, सुनील गायकवाड, अशोक गुरव, भालचंद्र तांदळे, मनोहर वहाडणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अश्विनी गाडेकर, सुनील रामचंद्र गायकवाड, मारुती गायकवाड, अरुण मोकळ, संजय घोलप, संजय आग्रे, तुकाराम गव्हाणे, प्रकाशजी खांडेभराड, सुजाता पुरी, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अर्चना साळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी संपत पटेकर, लक्ष्मण तांबे, संदीप कापसे, स्वप्नील फापाळे, शाम जगताप, अनिल साबळे, किशोर डांगे,प्रदीप साळुंके, नवनाथ गाडेकर, विशाल परबत यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा