शिर्डीत २८ व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलाध्यक्षपदी साही . राजेंद्र फंड.
शिर्डी
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने, डेबूजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय, इंगळी (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथील हॉटेल जे.के. पॅलेस येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि उद्घाटन:
या संमेलनाचे अध्यक्षपद श्री. राजेंद्र सुंदरदास फंड (राहता) भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून आचार्य सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील घुणकी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर उपसंघटक मा. सौ. सुमन गजानन देसाई (मुंबई) उपस्थित राहतील.
दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम:
संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता 'राष्ट्रसंत गाडगे महाराज कवी कट्टा' ने होईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उद्घाटन सोहळा, प्रतिमा पूजन आणि पुस्तक प्रकाशन पार पडणार आहे. दुपारी कवी राजेंद्र फंड यांच्या 'जीवनदीप गाडगेबाबांचा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. एकनाथराव बोरसे, श्री. देवरावजी सोनटक्के संस्थापक अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य धोबी,परीट,वरठी सर्व भाषिक समाज महासंघ. श्री. सुनील गोसावी संस्थापक सचिव शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, व ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते होईल. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या निवडक गीतांचे
सादरीकरण राष्ट्रीय भारुडकर हमीद सय्यद यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा