शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे बोरावके वस्ती शाळेला टिफिन बॅग आणि टिफिन बॉक्स चे वाटप

हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे बोरावके वस्ती शाळेला टिफिन बॅग आणि टिफिन बॉक्स चे वाटप

राहता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरावके वस्ती या शाळेला सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रगण्य मानल्या  जाणाऱ्या हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार अशा टिफिन बॅग आणि टिफिन बॉक्स चे वाटप करण्यात आले. त्यावेळी कंपनीचे तालुका अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रगतशील शेतकरी शेखर गायकवाड, अण्णासाहेब गोरे, कर्डिले नाना, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ आरणे आणि शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड उपस्थित होते. मुख्याध्यापक अमोल साळवे यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेतील नवनवीन उपक्रमांची माहिती दिली आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले ,तसेच दत्ता गायकवाड म्हणाले की तालुक्यातील विविध उपक्रम राबवत असलेली ही एक गुणवत्तापूर्ण शाळा आहे .या शाळेला पालकांचे अनमोल सहकार्य सतत असते. कंपनीने केलेल्या या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल त्यांनी पंचायत समितीच्या वतीने कंपनीचे विशेष आभार मानले. कंपनीचे तालुका अधिकारी किरण गायकवाड म्हणाले की कंपनीने आतापर्यंत तालुक्यातील 95 टक्के जिल्हा परिषद शाळांना सीएसआर फंडातून विविध प्रकारचे मदत केलेली आहे. सदरच्या कार्यक्रमाबद्दल गणेश नगर केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी कौतुक केले. शाळेतील उपशिक्षक गणेश कुमावत यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...