गुरुवार, २ एप्रिल, २०२६

कॅनरा बँकेकडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त

कॅनरा बँकेकडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त
कॅनरा बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत श्री साईबाबा हॉस्पिटल करिता ३५ लाख रुपयांचे दोन अत्‍याधुनिक व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले.  सदर मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र. से.) व कॅनरा बँकेचे मुख्य हेड ऑफिसर प्रमोद कुमार सिंग यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, कॅनरा बँकेचे रिजनल ऑफिसर अनिल कुमार, नागपूर रिजनचे सुरेंद्र भाऊ, मॅनेजर उमेश शेटे व चंद्रशेखर सोनी तसेच श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह हॉस्पिटल मधील डॉक्‍टर व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...