बुधवार, १५ एप्रिल, २०२६

अस्तगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,अस्तगाव आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहिल्या,त्यावेळी त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफी वाटप करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण व डान्स कला सादर केले,विद्यार्थ्यांचा कलागुण बघून अध्यक्ष मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या तरुणांनी डीजे न लावता 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ६ वाजता,प्रबोधनपर भीम गीताचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व गावाला   डीजे लावून धांगडधिंगा न करता प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवीन परंपरा चालू केल्याबद्दल  मंडळातील तरुणांचे कौतुक केले.*
*यावेळी आलेल्या सर्व ग्रामस्थांना अस्तगावचे पोलीस पाटील यांच्या वतीने नाष्ट्याचीही सोय करण्यात आली होती.यावेळी जॉन युवराज त्रिभुवन,दशरथ गव्हाणे,सुरेश त्रिभुवन यासह शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव त्रिभुवन,विजय गोर्डे,आर.बी. चोळके,सुनील चोळके,नंदूभाऊ जेजुरकर,वाल्मीक गोर्डे,ज्ञानदेव चोळके,दशरथ गव्हाणे,ज्ञानेश्वर जेजुरकर,नंदकुमार गव्हाणे,संतोष गोर्डे,बाबासाहेब लोंढे, ज्ञानदेव गोर्डे,रंजन सुलाखे,पंकज लोंढे,नितीन लोंढे,प्रदीप चोळके,पोलीस पाटील राजेश त्रिभुवन,पवन आरंगळे,निवास त्रिभुवन,दादासाहेब आरंगळे,जाकीर शेख,समद शेख,विजय त्रिभुवन,महेश त्रिभुवन,सचिन त्रिभुवन,विजय मोकळ,राजू त्रिभुवन,रमेश त्रिभुवन,युवराज त्रिभुवन,विलास त्रिभुवन,शरद त्रिभुवन,प्रकल्प त्रिभुवन,अमोल त्रिभुवन,कमलेश त्रिभुवन, अशोक पेटारे,हरिदास पटारे, मिथून संसारे,भीमा त्रिभुवन, गणेश त्रिभुवन,रवींद्र जेजुरकर निलेश मोरे,आबा मेचे,नितीन त्रिभुवन,बबलू खरात,राजेंद्र तांबे बाळासाहेब सापते,प्रमोद त्रिभुवन‌,देविदास जेजुरकर, सागर गोर्डे,अक्षय सुलाखे, सहाने सर,नळे सर,कर्डिले सर,राजेंद्र पठारे यशराज घोगले,युवराज पठारे,अनिकेत त्रिभुवन,आकाश त्रिभुवन,राजू जेजुरकर,उद्धव त्रिभुवन,कैलास गायकवाड,दत्तू पेटारे,करन त्रिभुवूूूण,संतोष त्रिभुवन,अवि त्रिभुवन,सागर त्रिभुवन,गौतम त्रिभुवन रामा त्रिभुवन,सुखदेव त्रिभुवन,अशोक गोडगे,भानुदास गवांदे,तेजस त्रिभुवन,यांसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सुनीता त्रिभुवन,अलका त्रिभुवन,दमयंती शेजुळ,सिंधू त्रिभुवन,अर्चना त्रिभुवन,मीराबाई त्रिभुवन, बेबीताई मेढेकर,सुशिला त्रिभुवन,ग्रामसेवक सूर्यवंशी मॅडम,वैशाली कासार,पो.कॉ.मोरे मॅडम,पो.कॉ.दांडगे दादा तसेच राहता पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी आदीसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील विद्यार्थी तसेच असंख्य महिला भगिनी व अस्तगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,अस्तगाव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन बघून ग्रामस्थांकडून मंडळाचे कौतुक करण्यात आले. तसेच 16 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी सायंकाळी ठीक ६ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मा.श्री.अजय भाऊ देहाडे यांचा बहरदार भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे,अशी माहिती जॉन युवराज त्रिभुवन बीजेपी राहता तालुका अध्यक्ष अनु.जाती.यांनी दिली,तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने राहाता तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे असे आव्हान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे करण्यात आले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...