राजेंद्र फंड यांना शिवरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २7 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक 1 मार्च 2026 रोजी मराठी भाषा दिनानिमित्ताने सातारा येथे संपन्न होत असून या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, पुस्तके प्रकाशन व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
या संमेलनात राजेंद्र फंड यांच्या साहित्यिक प्रवासात 3 वेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, 3 वेळा कविसंमेलनाचे अध्यक्षपद, 1 वेळा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, 3 वेळा साहित्य संमेलनाचे विशेष अतिथीपद , पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, लोककला कार्यक्रमाध्यक्ष असे अनेक साहित्यिक उपक्रमात मानाची पदे भूषविली आहेत. राजेंद्र फंड हे सध्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून ते " ग्रामसेवा संदेश" दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या माध्यमातून आजपर्यंत हजारो साहित्यिकांना त्यांनी लिहिते केले आहे. त्याचबरोबर आरोग्य पत्रिका , दक्षता मासिक, वर्तमानपत्रात व इतर अनेक दिवाळी अंकात दरवर्षी त्यांचे साहित्य प्रकाशित होत असते.
साहित्याबरोबर लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे माध्यमातून प्रेसिडेंट म्हणून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबविले आहेत. त्यांच्या या सर्व उपक्रमाची दखल घेऊन कवी सरकार यांनी सातारा येथे दिनांक 1 मार्च 2026 रोजी मराठी भाषा दिनानिमित्ताने होणाऱ्या २7 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात दि. 1 मार्च 2026 रोजी मा. डॉ शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांचे हस्ते राजेंद्र फंड यांना शिवरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे साही. राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, कवयत्री माधुरी पिंगळे, प्राध्या. अशोक कानडे, वैष्णवी निर्मळ, साईनाथ रहाटकर, प्रल्हाद घोरबांड, यशवंत पुलाटे, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर, नगराध्यक्ष ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, व्हाइस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, ला. सागर रोकडे, महेश गाडेकर, अनिल हुपरीकर, किरण बांदेकर, विनायक फंड, सुधाकर वाघ, अनिल देसाई, सुनील निकम, साईनाथ हजारे, कैलास देवरे, मनोज म्हस्के, योगेश रोकडे, व इतर अनेकांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा