साईबाबा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात संपन्न
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचालित, भी साईबाबा महाविद्यालय, शिर्डी येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्यस्तरीय उपक्रमा अंतर्गत दिनांक ८ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध वाचनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांच्या प्रेरणेने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे तसेच प्र.प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.
या ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनासाठी प्रेरित करणे तसेच विविध विषयांवरील ज्ञानाचा परिचय करून देणे हा होता. या प्रदर्शनामध्ये श्री साईसच्चरित, शैक्षणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, कला, संगणक शास्त्र तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आले होते.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत ग्रंथ भेट कार्यक्रम, सामूहिक वाचन, घोषवाक्य स्पर्धा, लेखक–वाचक संवाद, वाचन जागरूकता रॅली तसेच पुस्तक परीक्षण स्पर्धा (लेखन व सादरीकरण) अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा