शिर्डी
श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी तर्फे मकर संक्रात निमित्त हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात सौ. वंदनाताई गाडीलकर सौ. वैशालीताई दराडे संस्थेचे महिला संचालिका सौ लता बारसे सौ. सुनंदा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते महिला भगिनीचा आनंदाचा सोहळा असलेला हळदी कुंकू समारंभ निमित्त अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम साईंच्या नगरीत प्रथमच उपस्थित महिला लहान मुले आणि पुरुषाच्या मनात काय आहे हे अगदी अचूकपणे ओळखणारा समीर ज्ञानेश्वर यांचा मनकवडा हा अवधूत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला व मुले यांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते तसेच संस्थेचे सर्व संचालक व संचालिका यांच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली महिला भगिनीसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 पैठणी ठेवण्यात आल्या होत्या वरील मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला तसेच या कार्यक्रमात मनकवडा समीर ज्ञानेश्वर यांनी विविध थक्क करणारे प्रयोग करत उपस्थितांना आश्चर्य चिकित केले तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना मा.सौ वंदना ताई गाडीलकर सौ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते अकरा महिला सभासदांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले तसेच महिला सभासद व मुलांनी समीर ज्ञानेश्वर मनकवडा या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार व व्हॉइस चेअरमन मा. श्री पोपटराव कोते तसेच सर्व संचालक व संचालिका सचिव सहसचिव व कर्मचारी वृंद यांनी मोठे परिश्रम
घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा