रविवार, १८ जानेवारी, २०२६

गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद

गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शनिवारी आनंद बाजार भरवला होता. त्यात त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे भाजीपाला,फळे,स्टेशनरी, कोल्ड्रिंक्स ,खेळण्या, सौंदर्यप्रसाधने तसेच खाण्याच्या विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. जवळपास 48 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. विशेष म्हणजे बाल आनंद बाजारात खाऊ गल्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, गावातील पदाधिकारी, शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी मनसोक्तपणे खरेदी करून खवय्येगिरी केली आणि मुलांचे कौतुक केले. बाल आनंद मेळावा भरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना खरेदी-विक्रीचे ज्ञान मिळावे ,शाळेत मिळालेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता यावे. शाळेतील मुलांनी ग्राहक आणि विक्रेता या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. व्यवहार करताना किंवा बाजारात बसताना शेतकरी, व्यापारी यांना किती कष्ट असावे लागतात याचा ज्वलंत अनुभव घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक कैलास चिंधे ,सुनील गायकवाड ,दत्ता गायकवाड ,सुनीता गागरे, मनीषा निर्मळ व्हेरोणिका गायकवाड, सोनल भावसार ,भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे यांच्या परिश्रमाने मेळावा यशस्वी झाला. मुलांच्या या बाल आनंद मेळाव्यात गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, सरपंच सुनीताताई कासार ,दत्तकृपा पतसंस्थेचे सोपान कासार ,महेश आहेर ,एकरुखे शाळेचे मुख्याध्यापक राधाकिसन दळवी, गावातील पदाधिकारी, पालक ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
बाल आनंद मेळाव्याचे संपूर्ण संचालन दत्ता गायकवाड आणि वेरोनिका गायकवाड यांनी केले तर मनीषा निर्मळ यांनी सर्वांचे आभार मानले .शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे, केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी विशेष कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...