गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

पत्रकारांच्या सन्मानाने उजळला पत्रकार दिनाचा सोहळा

पत्रकारांच्या सन्मानाने उजळला पत्रकार दिनाचा सोहळा


लोणी, 

राहाता तालुक्यात पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात पत्रकारांच्या कार्याला योग्य तो मान मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकारांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेचे राहता तालुका कार्याध्यक्ष श्री. संपत डी. निर्मळ (आबा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस तथा अनुपम सेल्स कारपोरेशनचे संचालक श्री. उमेशजी पन्हाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच तालुका कार्यकारी सदस्य श्रीपाद बोकंद व तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.

यावेळी बोलताना श्री. संपत (आबा) निर्मळ यांनी पत्रकारांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की,
“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील प्रत्येक घटनेचा वस्तुनिष्ठ व निर्भीड आरसा जनतेसमोर ठेवण्याचे पवित्र कार्य पत्रकार करतात. सण, सुट्टी, वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून २४ तास समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून कृतज्ञतेची भावना आहे.”

या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार शहाजी दिघे, महेश भोसले, शंकर सोनवणे, संदीप गावडे, तसेच पत्रकार कैलास वाघमारे, कैलास विखे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याच वेळी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर कलाकार, अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पंडित आणि कलाकार ज्ञानदेव शिंदे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारांच्या कार्याचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम आणि त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता यामुळे हा सत्कार सोहळा कौतुकास्पद, प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे पत्रकारितेचा सन्मान अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...