सोमवार, ५ जानेवारी, २०२६

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेची इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आणि कॉम्प्युटर मॅजिक बॉक्स मुळे डिजिटल शिक्षणाकडे यशस्वी घोडदौड

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेची इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आणि कॉम्प्युटर मॅजिक बॉक्स मुळे डिजिटल शिक्षणाकडे यशस्वी घोडदौड


महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या डिजिटल स्कूल संकल्पना अंतर्गत गणेशनगर केंद्र शाळेला तिसरा ६५ इंची अत्याधुनिक स्वरूपाचा इंटर ऍक्टिव्ह बोर्ड प्राप्त झाला. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर शिक्षा नवी दिल्ली यांच्यामार्फत 32 इंची सी. एस. मॅजिक बॉक्स देखील शाळेला मिळाला आहे. गणेशनगर केंद्र शाळा तालुक्यातील एक अग्रगण्य तंत्रस्नेही शाळा म्हणून ओळखली जाते, या लोकसहभागामुळे पुनश्च एकदा शाळा नावाजली आहे.
 डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक साधनांचा वापर करून उच्च प्राप्तीचे शिक्षण मिळावं यासाठी या साधनांचा उपयोग होणार आहे अशा प्रकारचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी  राजेशजी पावसे यांनी केले. गणेशनगर गावच्या सरपंच सुनीताताई कासार , सोपान काका कासार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा रोहिणी घोगळ उपसरपंच, प्रतीक्षा राजेंद्र गाढवे यांनी विशेष प्रयत्न केले. माझी आदर्श शाळा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या उपक्रमामध्ये शाळेचा क्रमांक यावा यासाठी स्थानिक पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांची एकत्रित बैठक गटशिक्षणाधिकारी यांनी घेऊन मौलिक सूचना व मार्गदर्शन देखील केले. गणेशनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी देखील शाळेच्या लोकसहभागाबद्दल व विशेष उपक्रमाबद्दल कौतुक केले.
 शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शाळेचे मुख्याध्यापक  संजय घोलप  यांनी दिली ,तसेच लोकसहभाग जास्तीत जास्त प्राप्त करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक  कैलास चिंधे यांनी मोलाचे सहकार्य केले.
 सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सुनीता गागरे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले. शाळेतील विविध गोष्टी तंत्रज्ञानाच्या साह्याने शाळेतील शिक्षिका व्हेरोणिका गायकवाड, मनीषा निर्मळ ,कोमल भावसार  शिकवत असतात.
 कार्यक्रमाचे नियोजन ,संयोजन रोशन धनवटे यांनी केले ,तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...