सोमवार, ५ जानेवारी, २०२६

सावित्रीबाई फुले मुळे महिलांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाले-डॉक्टर सुजाता अंत्रे


सावित्रीबाई फुले मुळे महिलांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाले-डॉक्टर सुजाता अंत्रे

गणेशनगर केंद्र शाळेत सावित्रीबाई फुले यांची 195 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गाणी, भाषणे, व पथनाट्य सादर केली.
 सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गणेशनगर येथील प्रसिद्ध डॉ.सुजाता अंत्रे यांनी केले, तसेच त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचे आरोग्य बाबत घ्यावयाची काळजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग सांगून व्याख्यान दिले.
 याच कार्यक्रमात शाळेतील बदली झालेले शिक्षक सुनील सिनारे यांनाही शाळेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
 तसेच गावच्या सरपंच सुनीताताई सोपान कासार यांची नात सबुरी गणेश लांडगे हिचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास चिंधे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले.
 आभार व्हेरोनिका  गायकवाड यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुनील गायकवाड ,सुनीता गागरे, मनीषा निर्मळ ,रोशन धनवटे ,सोनल भावसार यांनी प्रयत्न केले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीताताई कासार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुजाता अत्रे  होत्या, शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप, दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सोपानकाका कासार ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...