दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने भगवान थोरात याची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
. शिर्डी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था संघ व इंटरनॅशनल ॲचिव्हर्स अवाॅर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण जीवन गौरव पुरस्कार समारंभ कार्यक्रम शिर्डी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने साई युग न्युज चे संपादक भगवान थोरात यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या राहाता तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले की मी संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे, शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, प्रिया चौधरी फोरेवर स्टार इंडियामध्ये प्रथम रनअप श्री सुरेश पाटील जिल्हा माहिती अधिकारी शिर्डी , जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ पगार ,तसेच विविध मान्यवर उपस्थित होते थोरात यांचा मित्र परिवार मोठा असल्याने त्यांच्याकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा