शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

नगर–मनमाड महामार्गावरील गटार कामांना स्थगिती; सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश

नगर–मनमाड महामार्गावरील गटार कामांना स्थगिती; सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश

राहता शहराच्या नियोजित विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचा सखोल पाहणी दौरा

राहता 
नगर–मनमाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत, संबंधित कामांना तात्काळ स्थगिती देत सुधारित आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. राहता शहराचा विकास हा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि कुणालाही त्रास न होता व्हावा, या भूमिकेतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत सखोल आढावा घेतला.


यावेळी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, कैलास बापू सदाफळ, नगरसेवक दशरथ तुपे, राहता नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित प्रशासकीय अधिकारी, भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रस्त्याची उंची विद्यमान पातळीपेक्षा ६०० मि.मी. पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याने साईड गटारांची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यालगतची दुकाने, व्यापारी आस्थापना व पेट्रोल पंप बाधित होण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी महामार्गावरील गटारांचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देत, रस्त्याची उंची ६०० मि.मी. ऐवजी कमाल ३०० मि.मी. पर्यंत ठेवून गटारासंदर्भात सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जमिनीखालून आवश्यक खोदकाम करून गटारे करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. या बदलांनुसार तयार होणाऱ्या सुधारित आराखड्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच रस्त्यालगतचे व्यवसाय, दुकाने व पेट्रोल पंपधारकांना कोणताही त्रास होणार नाही, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राहता शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील साईड गटार कामे, इरिगेशन गेस्ट हाऊस, राहता पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून सविस्तर आढावा बैठक घेतली.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेने दिलेल्या जबाबदारीनुसार राहता शहराचा नियोजित व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर व सर्व नगरसेवकांनी विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही पाहणी व बैठक पार पडली.

पुढे म्हणाले  महामार्ग विभागाने आठवड्याभरात सुधारित आराखडा सादर करावा. त्यासाठी राहता नगर परिषदेचा ठराव तसेच हा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ते प्रकल्प असल्याने पालकमंत्री महोदयांचे पत्र जोडण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची अंतिम मान्यता घेण्यात येईल, असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. राहता ते सावळीविर बुद्रुक नाशिक फाटा दरम्यानचे गटार काम हे सुधारित आराखड्यानुसारच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


डॉ विखे म्हणाले राहाता पोलीस स्टेशनच्या सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या भव्य इमारतीच्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी इरिगेशन विभागाकडून २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांचाही आज प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.

 छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स संदर्भात नागरिक व व्यापाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी तसेच अवैध बाबींवर पोलीस विभागासोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. कॉम्प्लेक्सच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव हाती घेण्यात येत असून, नियमबाह्य बाबींवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


पुढील दोन वर्षांत राहता शहर औद्योगिक व शहरीकरणाच्या दृष्टीने वेगाने पुढे जाणार आहे. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा मी स्वतः करणार असून, व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना कोणताही त्रास न होता पायाभूत सुविधा उभारण्यावर आमचा ठाम भर आहे,असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

अस्तगाव बाजारतळ येथील जगदंबा माता मंदिरात मा.सौ. मनीषाताई जॉन त्रिभुवन यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ

अस्तगाव बाजारतळ येथील जगदंबा माता मंदिरात मा.सौ. मनीषाताई जॉन त्रिभुवन यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी अस्तगाव,चोळकेवाडी,मोरवाडी,तर्कसवाडी,गोल्हारवाडी येथील येथील सर्व लाडक्या बहिणी,अस्तगाव येथील सी.आर.पी.,सर्व महिला बचत गटातील पदाधिकारी व सदस्य, शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक,राजकीय,कष्टकरी वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य महिला भगिनींनी अनपेक्षितपणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
 यावेळी *प्रमुख अतिथी म्हणून साकुरी येथील मा.सौ.पुजाताई (प्रदीप)पप्पूभाऊ बनसोडे उपस्थित होत्या.

यावेळी ज्योतीताई गोर्डे,मनीषाताई लोंढे, स्वातीताई चोळके,दिपश्री  चोळके,मंगल आत्रे,शैला लोंढे, सीमा जेजुरकर,अनिता लोंढे, अर्चना  जेजुरकर,जया लोंढे,दिपाली लोंढे, शोभा सापते,माया त्रिभुवन, वैशाली कासार, शैला लोंढे,स्वाती चोळके,वंदना कोह्राळे,स्वाती लोंढे, अनिता सोनवणे,संगिता जेजुरकर,अनिता त्रिभुवन, शकुंतला सापते ,ऋषाली गव्हाने, मनिषा जेजुरकर,अश्विनी सुलाखे,उज्वला अत्रे,सायली अत्रे,सुनीता जोर्वेकर,रेखा त्रिभुवन,दिपाली त्रिभुवन, राणी अष्टेकर,उषाबाई त्रिभुवन,रंजना त्रिभुवन,सिधुबाई त्रिभुवन, सुनीता त्रिभुवन, कल्याणी त्रिभुवन,अलका त्रिभुवन,मंदा पेटारे,प्रियंका त्रिभुवन,अनिता त्रिभुवन,वनिता मोकळ,सपना बिडवे,सुनंदा शेजूळ,शोभा इंगळे,वैशाली भूतकर मॅडम,भांड मॅडम,ढूस मॅडम, गोर्डे मॅडम,समिना शेख,रेश्मा मणियार,संगीता नरोडे,अर्चना पारखे,परवीन शेख,कल्पना लोंढे,भरती नळे,निशा गाडेकर,प्रीती गव्हाणे,शितल गव्हाणे,अलका गोरे,प्रतीक्षा पेटारे,दीपाली भालेराव,नाजिया शेख,योगिता डेंगळे, अनिता डेंगळे,शबाना पठाण,चैत्राली कदम,वैशाली शिंदे, सोनाली पवार,सुमन मोरे, कविता त्रिभुवन,अनिता बिडवे,जयश्री बिडवे,सुभद्रा जेजुरकर, योगिता सापते,सुनिता सापते,अर्चना यादव,चंद्रकला त्रिभुवन,मंगल चोळके,रंजना चोळके,उषा नळे, सविता बाणेदार,कुसुम मेढे, ज्योती झोंबड,सविता रायते,वर्षा मेढे, अनिता गोरे,दुर्गा राऊत, वैशाली चोळके,सना शेख,पूनम शेळके,हिना शेख,नाजमा शेख, लिलाबाई सापते, मंदाबाई सापते,जयश्री सापते, स्वाती जेजुरकर,कोमल मोरे,अर्चना जेजुरकर,जयश्री मोरे,नंदा पठारे,अलका चोळके, प्रियंका त्रिभुवन,वैशाली मोरे, वहिनी सापते,आशा पुंड,वनिता अष्टेकर,मुस्कान शेख,अलका शेजुळ,दिपाली बर्डे,हिराबाई बर्डे, सखुबाई सोनवणे,पूजा ठाकरे,साधना त्रिभान, साक्षी सापते,अंजना सापते,स्वाती लोंढे,कल्पना लोंढे,मनीषा लोंढे, शैला लोंढे,अनिता लोंढे,पुनम अष्टेकर,स्वाती अष्टेकर,संगीता नळे,चतुरा बिडवे,संगीता जेजुरकर,माया सुलाखे,सुप्रिया जेजुरकर, संगीता पेटारे, प्रियांका पेटारे,सोनाली पेटारे शुभांगी पेटारे,उषा अष्टेकर, सोनाली बोरसे,पुष्पा ठाकरे, रवीना साळुंखे,सविता लोंढे, अनिता चोळके आदिसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

साईबाबा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात संपन्न


 साईबाबा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात संपन्न

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचालित, भी साईबाबा महाविद्यालय, शिर्डी येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्यस्तरीय उपक्रमा अंतर्गत दिनांक ८ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध वाचनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांच्या प्रेरणेने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे तसेच प्र.प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.
या ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनासाठी प्रेरित करणे तसेच विविध विषयांवरील ज्ञानाचा परिचय करून देणे हा होता. या प्रदर्शनामध्ये श्री साईसच्चरित, शैक्षणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, कला, संगणक शास्त्र तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आले होते.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत ग्रंथ भेट कार्यक्रम, सामूहिक वाचन, घोषवाक्य स्पर्धा, लेखक–वाचक संवाद, वाचन जागरूकता रॅली तसेच पुस्तक परीक्षण स्पर्धा (लेखन व सादरीकरण) अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

गुलशन फाउंडेशन, शिर्डी येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

गुलशन फाउंडेशन, शिर्डी येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
शिर्डी 
 गुलशन फाउंडेशन, शिर्डी येथे लायन्स क्लब राहाता व ग्रामीण रुग्णालय, राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मूलभूत गरजा व आरोग्यविषयक समस्या या विषयावर आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ग्रामीण *रुग्णालयाच्या डॉ. शुभांगी कान्हे  मॅडम यांनी महिलांना आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले. तसेच हिंद लॅब यांच्या माध्यमातून महिलांची रक्त तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे *प्रास्ताविक झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे* यांनी केले. त्यांनी महिलांना रक्त तपासणी अहवालाबाबत योग्य मार्गदर्शन करत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरामध्ये जवळपास ४० ते ५० महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये CBC (Complete Blood Count), Cancer Marker तपासणी, HbA1c (साखर तपासणी) तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.
 *गुलशन फाउंडेशनच्या मॅनेजर सौ. सविता मगर यांनी लायन्स* क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास लायन अंजली उबाळे, लायन उमेश शेटे, लायन सरला तायडे, लायन स्मिता मुरादे, लायन खिजर शाह तसेच गुलशन फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लायन खिजर शाह यांनी केले.


चुकीचे जागेवर होत असलेले गटारीचे काम त्वरित थांबवुन साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्यात यावी असे निवेदन भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिले



शिर्डी

अहिल्यानगर मुख्य रस्त्यावरील साईड गटारीचे काम रस्त्याच्या कडेला न घेता रस्त्यावरच गटारीचे बांधकाम करण्यात येत असल्याने रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद केला जात आहे. यामुळे केवळ सध्याची वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही, तर भविष्यात त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याचीही दाट शक्यता आहे. याबाबत तात्काळ संबंधीतांना आदेश देवुन चुकीचे जागेवर होत असलेले गटारीचे काम त्वरीत थांबवुन साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्यात यावी असे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना समक्ष भेटुन दिले यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिर्डी ते अहिल्यानगर या अत्यंत महत्वाच्या मुख्य रस्त्याचे काम चालु आहे. सदर रस्ता राहाता शहरातून जात असताना तो आधीपासूनच रुंद स्वरूपाचा असूनही, सध्या करण्यात येणाऱ्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्याची प्रत्यक्ष वापरातील रुंदी कमी होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून येत आहे. राहाता शहरातून जाणारा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड व हलकी वाहतूक होत असते. त्यातच रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये,आठवडे बाजार, व्यापारी संकुले व वस्ती असल्यामुळे रस्ता अधिक रुंद व मोकळा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता वाढून भविष्यात वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष म्हणजे, रस्ता मोकळा असतानाही रस्त्याच्या प्रत्यक्ष भागावरच गटारीचे बांधकाम करण्यात येत असल्याने रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद केला जात आहे. यामुळे केवळ सध्याची वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही, तर भविष्यात त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याचीही दाट शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या उपलब्ध रस्त्याचे त्वरीत संपूर्ण डांबरीकरण करून तो अधिक रुंद करण्यात यावा व रस्त्याच्या बाहेरील बाजूस साईड गटाराचे काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे राहाता शहरातील वाहतुकीची अडचण दूर होऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन्ही खासदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावर खा.भाऊसाहेब वाकचौरे व खा.निलेश लंके यांनी संबंधीत अधिकां-यांना सुचना देवुन यावर लक्ष घालुन शहरातुन जाणारा रस्ता अरुंद न होता साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्याच्या सुचना केल्या. 
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित विषयावर जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

भारत सरकारने लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरविले

लोणी  
जिल्ह्याच्या सुपुत्री आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र भोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव हा  'अहीलेच्या लेकीचा सन्मान' असल्याची  प्रतिक्रीया देवून  जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

भारत सरकारने लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र भोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून गौरविले आहे.केरळ मधील वायनाड येथे २०२४ मध्ये घडलेल्या भीषण भूस्खलनात तसेच प्रतिकूल हवामानावर मात करून शेकडो नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी बचाव मोहीमेचे नेतृत्व केले होते. या महत्वपूर्ण कामगिरीत   अवघ्या काही  तासात १९०फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत उभारणी कर्नल सीता शेळके यांच्या नेतृत्वात झाली होती.

आपती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करून  वायनाड येथील नैसर्गिक संकटात बजावलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल भारत सरकारने कर्नल सीता शेळके सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेल्या सन्मानाबद्दल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

कर्नल सीता शेळके यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या आसीम धैर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा सन्मान असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, वायनाड मधील संकट काळात त्यांनी दाखलेले धाडस आणि  केलेल्या नेतृत्वाला देशाने सलाम केला आहे.

अहील्यानगरची सुपूत्री आणि विशेष करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनीने  जिद्द आणि  चिकाटीचा वारसा जपणार्या 'अहीलेच्या लेकीचा' झालेला सन्मान जिल्ह्याचा नावलौकीक आणि अभिमान वाढविणारा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

कोपरगावतील पत्रकारिता कौतुकास्पद जनहित कारक - संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे

कोपरगावतील पत्रकारिता कौतुकास्पद जनहित कारक - संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष   नितीन कोल्हे

कोपरगांव -- देशातील पत्रकारितेमध्ये काही प्रमाणात अनिष्ट प्रवृत्ती वाढल्या असल्या तरी सुदैवाने कोपरगांव परिसर अपवाद ठरला आहे. सर्वं सामान्यांचे जनहित व समाज सुधारणा बळकट करण्यासाठी युवा पत्रकारांनी योगदान द्यावे असे कळकळीचे आवाहन संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी . येथील साप्ताहिक शुभ लाभ संपादक संजय पुरुषोत्तम लाड यांच्या वार्षिक शभलाभ या 21व्या दिनदर्शिकेचे   साई संजीवनी बॅंक जेष्ठ संचालक, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल यांचें अध्यक्षतेखाली प्रकाशन करतांना काढले.   यावेळी श्री. कोल्हे पुढे म्हणाले, 
    संजय लाड  अनंत अडचणींवर मात करीत सलगपणे कोपरगांवकरांच्या घराघरात, सर्व कार्यालयात या दिनदर्शिका  व
साप्ताहिक शुभ लाभचे दिवाळी अंक आणि साप्ताहिक शुभ लाभ मधून धार्मिक, संस्कार क्षम विविध प्रकारच्या माहितीचा खजिना पोहविण्याची कौतुकस्पद कामगिरीचा वसा पूर्णत्वास नेत आहे. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष  नारायण अग्रवाल यांनी खडतर परिस्थितीत आपला विमा व्यवसाय सांभाळत साप्ताहिक शुभ लाभ प्रसिद्धी बरोबर दर्जेदार दिवाळी अंक, वार्षिक दिनदर्शिका सलगपणे प्रकाशित करताना या परिसरातील धार्मिक ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षैत्रातील संस्कार क्षम माहिती जन सामान्यांच्या घराघरात पोचवून या भागाच्या विकासाला हातभार लावत असल्याचे गौरवोद्गार काढले 
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संजय लाड यांनी पूर्वी पंचांग, पुणे - मुंबईतील महागड्या दिनदर्शिकातून जनतेला सण, व्रत वैकल्ये शुभ मुहूर्त, तारीख आदी विविध माहिती बोटावर मोजता येणाऱ्या लोकांना मिळत असल्याने मी माझे व्यवसायाचे कायम संपर्कासाठी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला याला जनतेने सलगपणे चांगला प्रतीसाद दिल्याने जनतेचे आभार मानले
या कार्यक्रमात बांधकाम अभियंता माधवराव देशमुख, कृषी उद्योगपती सुरेश कोल्हे, , प्रगत शेतकरी पोपटराव नरोडे, अशोक आढाव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी - ना.विखे पाटील

सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी - ना.विखे पाटील 


शिर्डी  


राज्यातील  सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणी पुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणार्या धरणांच्या जलाशयांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प ('फ्लोटिंग सोलर') उभारून महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रस्थानी आणण्याचा विश्वास र जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जलसंपदा विभागाच्या वतीने 'हरित ऊर्जा उपयोजन'  या विषयावर पुणे येथे आयोजित धोरणात्मक परिषदेत मंत्री विखे पाटील बोलत  होते. यावेळी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, मित्र संस्थेचे वरिष्ट अधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. विखे पाटील म्हणाले की, "वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सिंचन पायाभूत सुविधांचा धोरणात्मक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतून   फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमुळे जमिनीच्या अधिग्रहणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे शेतीसाठी जमिनीचे संरक्षण होईल. तसेच, जलाशयावर सौर पॅनेलचे आच्छादन असल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन पाण्याचे संवर्धन होईल, ज्याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण समुदायाला होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी परिषदेत व्यक्त केला.

 परिषदे मध्ये सौर उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी आणि अनेक वैयक्तिक विकासकांनी सहभाग नोंदवला. तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक निकष या बैठकीत प्रामुख्याने  चर्चेला आले. या योजना राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पारदर्शक पीपीपी (PPP) मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थिती प्रतिनिधीनी व्यक्त केले.

उद्योजकांनी केलेल्या सूचना लक्षात घेता, या तरंगते सौर प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग एक 'नोडल एजन्सी' म्हणून काम करण्याबाब विचार करण्यात आला.जलसंपदा विभागाच्या जलाशयावर तरंगते सौर ऊर्जा करण्याच्या उपक्रमामुळे महाराष्ट्र केवळ ऊर्जेत स्वयंपूर्ण होणार नाही, तर हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D2 चा सेकंड क्वार्टर अवॉर्ड कार्यक्रम संपन्न

इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D2 चा सेकंड क्वार्टर अवॉर्ड कार्यक्रम संपन्न


इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D2 चा सेकंड क्वार्टर अवॉर्ड कार्यक्रम व नववर्ष स्वागत समारंभ हॉटेल पेगासस, नाशिक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिताभाभी मालपाणी यांनी केले
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून
मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशभाऊ मालपाणी,
गॅट को-ऑर्डिनेटर लायन सुनीताभाभी मालपाणी,
वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल


आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावडे हे मान्यवर उपस्थित होते.
या अवॉर्ड नाईटमध्ये नगर रिजनमधील
लायन्स क्लब संगमनेर सफरॉन सॅफायर,
लायन्स क्लब कोपरगाव,
लायन्स क्लब श्रीरामपूर,
लायन्स क्लब संगमनेर,
लायन्स क्लब शिर्डी साई
आणि लायन्स क्लब राहता
या क्लब्सनी हाफ क्वार्टर कालावधीत केलेल्या उत्कृष्ट, समाजोपयोगी व प्रेरणादायी कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

या उल्लेखनीय कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल यांनी संबंधित सर्व क्लब्सच्या PST यांना मानाची ट्रॉफी देऊन गौरव केला.
तसेच तीन झोन चेअरमन यांना Best ZC Award देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये नगर रिजनमधून डॉ. संजय उबाळे यांना बेस्ट झोन चेअरमन म्हणून गौरवण्यात आले.
या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. संजय उबाळे म्हणाले,
“हा सन्मान म्हणजे झोनमधील सर्व क्लब्सच्या एकत्रित मेहनतीचे व समर्पित सेवाभावाचे फलित आहे.”
या संपूर्ण सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपले मार्गदर्शक लायन गिरीशभाऊ मालपाणी व लायन सुनीताभाभी मालपाणी यांचे झोनच्या वतीने मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले.

“सेवेतून नेतृत्व हे ब्रीद आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच सार्थ ठरत आहे. अशीच एकजूट, ऊर्जा व सेवा निरंतर सुरू राहो,” अशी भावना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी पुणे, नगर व नाशिक येथून जवळजवळ २३० सभासदांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन सचिन शहा, लायन धनंजय धुमाळ, लायन भूषण महाजन तसेच नाशिकमधील सर्व लायन्स सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा माध्यमिक विद्यालय एकरुखे शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १००% लागलेला आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा माध्यमिक विद्यालय एकरुखे शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १००% लागलेला आहे.

शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेस विद्यालयाचे एकूण २५ विद्यार्थी बसले होते. पैकी इंटरमिजीएट साठी १६ तर एलिमेंटरी साठी ०९ विद्यार्थी बसले होते. सर्वच्या सर्व २५ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी पदाधिकारी व सदस्य तसेच सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत एकरुखे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भोसले एस.बी.व चित्रकलेचे मार्गदर्शक श्री.हाळनोर बी.बी. शिक्षक, शिक्षकेत्तर यांनी अभिनंदन केले.

रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न


रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न

रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष सन्मा.अनिलजी हुपरीकर संचलित टीम  रेशीमगाठी वधू-वर सूचक मंडळ यांच्या वतीने आयोजित उच्चस्तरीय रेशीमगाठी परीट समाज वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 हा कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय, कात्रज–कोंढवा रोड, पुणे येथे अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजप नेते आदरणीय राजाभाऊ किसनराव कदम यांनी भूषविले. तसेच राज्य परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय खंडेरावजी कडलग, श्री.उत्तम तेलंग, श्री.सनतवढाई ,  श्री. संतोष भालेकर, श्री. नानासाहेब वाघमारे, श्री. माधवराव देसाई, श्री. दिगंबर हौसारे सो. श्री. गोविद राऊत, श्री. सुनील फंड हे समाजातील मान्यवर प्रमुख उपस्थिती लाभली. समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सन्माननीय राजेंद्रजी फंड यांनी अत्यंत प्रभावी, वेळेचे काटेकोर नियोजन ठेवून केले.


या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे AI व डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. आगाऊ डिजिटल नोंदणी, PDF/Excel बायोडेटा फाईल, टोकन क्रमांक प्रणाली यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी वेळेची मोठी बचत झाली आणि सर्व व्यवस्थापन अधिक सुकर झाले. स्टेजवरील डिजिटल स्क्रीन प्रेझेंटेशनमुळे वधू-वरांची माहिती स्पष्टपणे सर्वांना समजली.
प्रत्येक वधू-वराच्या ओळखीवेळी पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू व संक्रांतीचे वाण हा उपक्रम सन्माननीय सौ. सुषमाताई अमृतकर यांच्या माध्यमातून सुंदररीत्या पार पडला. उत्तम स्टेज व्यवस्था, ध्वनी प्रणाली, व्हिडिओ/फोटो, सत्कार साहित्य, आसन व्यवस्था तसेच चहा-पाणी व जेवणाची उत्कृष्ट सोय यामुळे उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
समाजहिताचा संदेश देताना मान्यवरांनी विवाह जुळविताना अनावश्यक अपेक्षा व आर्थिक देवाण-घेवाण टाळून विचार, ध्येय, संस्कार व विश्वास यावर नाते जुळवावे असे मार्गदर्शन केले. जवळपास 250 पेक्षा जास्त वधू-वर आणि 500 पेक्षा जास्त पालक उपस्थित राहणे ही या उपक्रमाच्या यशाची साक्ष ठरली.
एकूणच हा मेळावा केवळ परिचयापुरता मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संस्कार, समुपदेशन, पालकांचा सन्मान व महिलांचा आदर यांचे सुंदर मिश्रण ठरला आणि महाराष्ट्रातील एक आदर्श व प्रेरणादायी उपक्रम म्हणून निश्चितच उल्लेखनीय ठरला.

           मेळाव्याचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन महाराष्ट्रभरातून आलेले रेशीमगाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री.अनिल रामचंद्र खडके (हुपरीकर), पुणे,श्री.दत्तात्रय क्षीरसागर,सोलापूर,सौ.सुष्माताई अमृतकर अमरावती ,श्री. प्रशांत शिंदे कोल्हापूर,
श्री.योगेश रोकडे नाशिक,श्री.महेश यादव, कोल्हापूर,श्री.किरण बांदेकर बेळगाव,श्री.राजेंद्र फंड,आहिल्या नगर ,श्री. डि . एस . राऊत नाशिक,श्री. अमित जाधव पुणे,श्री.प्रकाश अभ्यंकर पुणे, श्रीमती,  सुनिता राक्षे,सांगली,
श्री.दिलीप काटकर सातारा, श्री,विशाल राऊत,धाराशिव यांनी केले.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांच्या आरोग्य सेवेकरिता संगमनेर आणि शिर्डी येथे सेवा दवाखाना स्थापन करण्यास महायुती सरकारने मंजुरी दिली

शिर्डी 

       राज्‍य कामगार विमा योजने अंतर्गत कामगारांच्‍या आरोग्‍य  सेवकरीता संगमनेर आणि शिर्डी येथे सेवा दवाखाना स्‍थापन करण्‍यास महायुती सरकारने मंजुरी दिली असल्‍याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

       जिल्‍ह्यातील संगमनेर व शिर्डी येथे ३ हजार पेक्षा जास्‍त विमा धारक संख्‍या असल्‍याने या भागात कामगार विमा योजने अंतर्गत कामगारांच्‍या आरोग्‍य सेवेकरीता सेवा दवाखाना सुरु व्‍हावा अशी मागणी कामगारांच्‍या माध्‍यमातून तसेच खासगी उद्योग समुहाच्‍या वतीने करण्‍यात येत होती. या संदर्भात पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, आरोग्‍य मंत्र्यांसमवेत बैठक घेवून या सेवा दवाखान्यास मंजूरी मिळावी म्हणून  प्रयत्न केले होते.

     संगमनेर येथे ५ हजार, शिर्डी  येथे ९ हजाराहून अधिक विमा धारक कामगारांची संख्‍या आहे. ही सर्व बाब लक्षात घेवून कामगारांच्‍या आरोग्‍य सुविधां करीता संगमनेर व शिर्डी येथे नवीन सेवा दवाखाने तात्‍काळ सुरु करण्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य कामगार विमा सोसायटीने मान्‍यता दिली असल्‍याचे उपसंचालक डॉ.संजय ढवळे यांनी सांगितले.

   कामगारांसाठी सेवा दवाखान्‍याची सुविधा उपलब्‍ध होत असल्‍याने जिल्‍ह्यातील विविध क्षेत्रांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या कामगारांना या सेवा दवाखान्‍याचा मोठा दिलासा मिळणार असून, महायुती सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयाचे उद्योग आणि कामगार जगतातून स्‍वागत झाले असून, पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विविध कामगार संघटना आणि खासगी उद्योग समुहांनी आभार मानले आहेत.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश

श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश


श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन (सन २०२५–२६) हे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथे संपन्न झाले असून या प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २३४ उपकरणे सहभागी झाली होती. या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या प्राथमिक विभागातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. साई विलास सिनगर याने ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर आधारित उपकरण सादर करून विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी त्याला विज्ञान शिक्षक श्री. अमोल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते पार पडला. या यशाबद्दल विद्यार्थी चि. साई विलास सिनगर व संबंधित शिक्षकांचे मा. न्या. अंजू शेंडे-सोनटक्के, अध्यक्ष तदर्थ समिती तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, मा. डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी अहिल्यानगर तथा सदस्य तदर्थ समिती, मा. श्री. गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती, मा. श्री. भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. अतुल वाघ, प्र. प्रशासकीय अधिकारी, सौ. शिल्पा पुजारी, मुख्याध्यापिका, श्री. आसिफ तांबोळी, प्राचार्य तसेच मा. श्री. राजेश पावसे, गटशिक्षणाधिकारी, राहाता पंचायत समिती यांनी अभिनंदन केले.

रात्री उशिरा डॉ. सुजय विखे रस्त्यावर; राहुरीतील वाहतूक कोंडीचा घेतला प्रत्यक्ष आढावा

रात्री उशिरा डॉ. सुजय विखे रस्त्यावर; राहुरीतील वाहतूक कोंडीचा घेतला प्रत्यक्ष आढावा

राहुरी 
राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले.

या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर–मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत, “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो-व्हिडिओपुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे ठामपणे सांगितले.

यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट | डॉ. सुजय विखे पाटील
“मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली, हे माझं भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर नेत्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली.
जिथे ट्रॅफिक जाम आढळेल, तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील.

फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही, तर लोकांचा विश्वास संपतो याची मला पूर्ण जाणीव आहे.
आज केवळ एका तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती. मागील काही दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो.

सोमवार, १९ जानेवारी, २०२६

साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी शिर्डी तर्फे मकर संक्रात निमित्त हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न


शिर्डी

श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी तर्फे मकर संक्रात निमित्त हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात सौ. वंदनाताई गाडीलकर  सौ. वैशालीताई दराडे संस्थेचे महिला संचालिका सौ लता बारसे सौ. सुनंदा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते महिला भगिनीचा आनंदाचा सोहळा असलेला हळदी कुंकू समारंभ निमित्त अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम साईंच्या नगरीत प्रथमच उपस्थित महिला लहान मुले आणि पुरुषाच्या मनात काय आहे हे अगदी अचूकपणे ओळखणारा समीर ज्ञानेश्वर यांचा मनकवडा हा अवधूत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला व मुले यांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते तसेच संस्थेचे सर्व संचालक व संचालिका यांच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली महिला भगिनीसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 पैठणी ठेवण्यात आल्या होत्या वरील मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला तसेच या कार्यक्रमात मनकवडा समीर ज्ञानेश्वर यांनी विविध थक्क करणारे प्रयोग करत उपस्थितांना आश्चर्य चिकित केले तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना मा.सौ वंदना ताई गाडीलकर सौ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते अकरा महिला सभासदांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले तसेच महिला सभासद व मुलांनी समीर ज्ञानेश्वर मनकवडा या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार व व्हॉइस चेअरमन मा. श्री पोपटराव कोते तसेच सर्व संचालक व संचालिका सचिव सहसचिव व कर्मचारी वृंद यांनी मोठे परिश्रम 
 घेतले

रविवार, १८ जानेवारी, २०२६

गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद

गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शनिवारी आनंद बाजार भरवला होता. त्यात त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे भाजीपाला,फळे,स्टेशनरी, कोल्ड्रिंक्स ,खेळण्या, सौंदर्यप्रसाधने तसेच खाण्याच्या विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. जवळपास 48 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. विशेष म्हणजे बाल आनंद बाजारात खाऊ गल्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, गावातील पदाधिकारी, शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी मनसोक्तपणे खरेदी करून खवय्येगिरी केली आणि मुलांचे कौतुक केले. बाल आनंद मेळावा भरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना खरेदी-विक्रीचे ज्ञान मिळावे ,शाळेत मिळालेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता यावे. शाळेतील मुलांनी ग्राहक आणि विक्रेता या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. व्यवहार करताना किंवा बाजारात बसताना शेतकरी, व्यापारी यांना किती कष्ट असावे लागतात याचा ज्वलंत अनुभव घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक कैलास चिंधे ,सुनील गायकवाड ,दत्ता गायकवाड ,सुनीता गागरे, मनीषा निर्मळ व्हेरोणिका गायकवाड, सोनल भावसार ,भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे यांच्या परिश्रमाने मेळावा यशस्वी झाला. मुलांच्या या बाल आनंद मेळाव्यात गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, सरपंच सुनीताताई कासार ,दत्तकृपा पतसंस्थेचे सोपान कासार ,महेश आहेर ,एकरुखे शाळेचे मुख्याध्यापक राधाकिसन दळवी, गावातील पदाधिकारी, पालक ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
बाल आनंद मेळाव्याचे संपूर्ण संचालन दत्ता गायकवाड आणि वेरोनिका गायकवाड यांनी केले तर मनीषा निर्मळ यांनी सर्वांचे आभार मानले .शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे, केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी विशेष कौतुक केले.

नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण...

नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण...

 राहुरी 
नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग, तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या.यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थितीत होते. 

वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली. वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन” असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले.

सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले.

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून श्री साईबाबा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात प्राप्त

 भारतीय स्टेट बँकच्या शिर्डी शाखेकडून श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल करिता  52 लाख 50 हजार रुपयांचे 3 व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले.  सदर मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र. से.) यांच्या हस्ते विधिवत पूजन  करण्यात आले. 

यावेळी साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे  डॉ. विजय नरवाडे डॉ. संतोष मराठे, डॉ. महेश मिस्त्री,  सहा. आधीसेविका संगीता थोरात, बायो मेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, इन्चार्ज सिस्टर  वैशाली सुर्वे,  यांच्यासह हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत मोठी नियुक्ती

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत मोठी नियुक्ती 

अनुपम सेल्स कॉर्पोरेशन,लोणी चे संचालक माननीय उमेश भिमराज पन्हाळे यांना अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा!

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राहता तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राहता तालुका कार्याध्यक्ष संपत निर्मळ (आबा), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे व श्रीपाद बोकंद यांनी एकमताने ठराव मंजूर केला. या ठरावास सोलापूर कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत वेधपाठक साहेब यांनी अधिकृत अनुमोदन दिले.
या ठरावानुसार अनुपम सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक, लोणी (ता. राहता) येथील उमेश भिमराज पन्हाळे यांची अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेश पन्हाळे हे केवळ यशस्वी उद्योजक नसून, त्यांच्या अंगी समाजाप्रती अपार प्रेम, आदर व जिव्हाळा असून, समाजसेवा हीच त्यांची ओळख बनली आहे. ह.भ.प गोरक्ष  देठे महाराज यांनी  उमेश पन्हाळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशी गरजूंसाठी तत्पर मदत, सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग आणि संघटनात्मक कामकाजातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांचे नाव जिल्हा सरचिटणीस पदी  नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीमुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व मान्यवरांनी उमेश पन्हाळे यांचे मनापासून अभिनंदन करत, पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्य मराठी पत्रकार परिषद अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष, शहाजी दिघे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी पत्रकार शंकर सोनवणे, संदीप गावडे, महेश भोसले, ज्ञानेश्वर साबळे कैलास वाघमारे, कैलास विखे अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित, सिने, कलाकार- ज्ञानदेव शिंदे यांची उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी ते वणी पदयात्रा सोहळा मोठा आनंदात व उत्साहात पार पडला

सप्तश्रृंगी गड 
 श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी वणी ते शिर्डी पदयात्रा सोहळ दि.11/01/2026 ते 14/01/2026 पर्यंत पदयात्रा सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला संस्थेचे कर्मचारी वृंद हे सर्व हे मोठा उत्साहाने सप्तशृंगी गडावर पोचून सप्तशृंगी आईचे दर्शन मोठ्या भक्ती भावाने घेतले प्रत्येक गावोगावी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून देवीची आरती व सत्कार केला दिनांक. 11/01/2026 रोजी दर्डे फाटा मगरे वस्ती या ठिकाणी सकाळचा नाष्टा तसेच पदयात्रा यांचा सत्कार

 करण्यात आला तसेच पालखी तर्फे मगरे सहकुटुंबाचा शाल श्री साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करून पदयात्री यांनी त्यांचे आभार मानले अकरा तारखेला संध्याकाळचा मुक्काम रुई (देवगाव) येथे श्री राम कृष्ण हरी वारकरी आश्रम या ठिकाणी झाला आश्रम चे ह. भ.प. श्री माऊली शिंदे महाराज यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत  केले मोलाचे सहकार्य केले संस्थेचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार संचालक रामभाऊ गागरे सचिव विलास वाणी तसेच विजुभाऊ शिंदे यांनी संस्थेच्या पालखीला भेट देऊन  ह. भ . प . श्री माऊली शिंदे महाराज यांच्या हस्ते पालखी ची आरती करण्यात आली तसेच मा.चेअरमन यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला 


व मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच दिनांक12/01/2026 रोजी दुपारी श्री गणेश कोल्हे उगाव यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत व जेवणाची व्यवस्था केली कोल्हे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच12/01/2826 रोजी तिसगाव येथील ह. भ. प . महंत राकेश गिरी महाराज तसेच श्री. मनोज शिरसाठ. सौ मानसी शिरसाट तसेच शिरसाट परिवाराने पालखीचे व पदयात्रेचे स्वागत करून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली. शिरसाट कुटुंबाच्या हस्ते पालखीचे पूजा व आरती करण्यात आली पदयात्री कडून त्यांचा शाल श्रीफळ साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या पालखी व पदयात्रे यांचे गावोगावी स्वागत  करून मोलाचे सहकार्य केले. श्री साई संस्थान सोसायटीची पालखी सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात पार पडला. संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व संचालिका सचिव सहसचिव यांनी पालखीला सहकार्य केल्याबद्दल मानले आभार

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...