श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश
श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन (सन २०२५–२६) हे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथे संपन्न झाले असून या प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २३४ उपकरणे सहभागी झाली होती. या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या प्राथमिक विभागातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. साई विलास सिनगर याने ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर आधारित उपकरण सादर करून विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी त्याला विज्ञान शिक्षक श्री. अमोल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते पार पडला. या यशाबद्दल विद्यार्थी चि. साई विलास सिनगर व संबंधित शिक्षकांचे मा. न्या. अंजू शेंडे-सोनटक्के, अध्यक्ष तदर्थ समिती तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, मा. डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी अहिल्यानगर तथा सदस्य तदर्थ समिती, मा. श्री. गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती, मा. श्री. भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. अतुल वाघ, प्र. प्रशासकीय अधिकारी, सौ. शिल्पा पुजारी, मुख्याध्यापिका, श्री. आसिफ तांबोळी, प्राचार्य तसेच मा. श्री. राजेश पावसे, गटशिक्षणाधिकारी, राहाता पंचायत समिती यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा