राहाता येथील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात — सामाजिक बांधिलकीची सुंदर प्रचीती
राहाता परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब पुणे सुप्रीम व लायन्स क्लब राहाता यांनी एकत्र येत खऱ्या अर्थाने “We Serve” या लायन्सच्या ध्येयवाक्याला न्याय दिला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन्ही क्लबच्या माध्यमातून एक सामाजिक जबाबदारीची भावना जोपासत मदतीचा हात पुढे करण्यात आला.
या उपक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल, लायन रवींद्र गोलार, लायन्स क्लब पुणे सुप्रीमच्या अध्यक्षा लायन सौ. संजना झवर तसेच झोन चेअरमन लायन डॉ. संजय उबाळे यांच्या पुढाकाराने सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांच्या किमतीचे किराणा किट, दिवाळी फराळ, ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या किटमुळे पूरग्रस्तांना एक महिन्यापुरता दिलासा मिळाला.
या वेळी राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी लायन्स क्लब करीत असलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले व आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते लायन दशरथ तुपे यांनी सांगितले की, “लायन्स क्लब राहाता पूर्वी कोल्हापूर व सोलापूर येथील पूरग्रस्तांना देखील मोठ्या प्रमाणावर मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा परंपरेचा वारसा आजही टिकवून ठेवला आहे.”
झोन चेअरमन लायन डॉ. संजय उबाळे, लायन प्रकाश सदाफळ मा. अध्यक्ष लायन दशरथ तुपे आणि कैलास बापू सदाफळ यांच्या उपस्थितीत कॅनाल जवळील वस्ती तसेच बनकर वस्तीतील एकूण सुमारे २० पुरबाधित कुटुंबांना मदत वितरित करण्यात आली. या सर्व मान्यवरांनी पूरग्रस्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आश्वासन दिले की, “लायन्स क्लब सदैव समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहील.”
डॉ संजय उबाळे यांनी लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांनी आमच्या क्लब सोबत पूरग्रस्त यांना भरीव मदत केली अतिशय छान उपक्रम करणेसाठी एकत्र आले ही आमच्या क्लब साठी अभिमानाची बाब आहे, अशीच मदत गरजू पर्यंत करत राहू अशी भावना व्यक्त केली
या प्रसंगी माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ, अॅक्टिव्हिटी चेअरमन लायन अंजली उबाळे, लायन रतन चौधर सेक्रेटरी ,लायन मिलिंद बनकर, राहुल बनकर,लायन ॲड दिनेश कारले ट्रेजरर,लायन सरला तायडे, लायन किरण वाबळे, ला. स्मिता मुरादे, ला. डॉ मनाली उबाळे, ला. सोहन उबाळे, ला. लता जाधव, ला. आसावरी बेंद्रे, ला. खिजर शाहा आदी उपस्थित होते.
ही कृती फक्त मदतीची नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलतेची, एकतेची आणि माणुसकीची जाणीव जपणारी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा