शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

राहाता सह्याद्रीतर्फे वीटभट्टी मजूर, पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम मजुरांना मिठाई वाटप:

 राहाता सह्याद्रीतर्फे वीटभट्टी मजूर, पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम मजुरांना मिठाई वाटप

                 


   वंचितांची ही दिवाळी गोड होण्यासाठी  दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आठ वाजताच  कामगार कामावर जाण्याच्या आधी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने पिंपळवाडी येथील वीटभट्टी कामगार, पिंपळवाडी येथील पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम कामगार असे 100 कामगारांना दिवाळी  मिठाईचे वाटप त्यांच्या घरी जाऊन कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आज करण्यात आले . 
                        यानिमित्ताने अचानक येऊन  आपल्या कुटुंबाची दिवाळी गोड केल्याचे  पाहून सर्व कामगारांना आनंद झाला. लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने आजच्या या उपक्रमाचे प्रायोजक  क्लबचे सदस्य तथा  संचिती एज्युकेशन फाउंडेशन आणि व्हीजन हाउसकीपिंग सोल्युशनचे संचालक ला. अमोल उगले हे होते. प्रारंभी क्लबचे प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर यांनी या कामगारांशी संवाद साधून यावर्षीच्या ओल्या दुष्काळाने झालेली हानी पाहता शेतकरी व मजूर यांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले आहेत. म्हणून लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने तुमच्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. 
          प्रायोजक  ला. अमोल उगले म्हणाले मी एक व्यापारी असून या ओल्या दुष्काळात व्यापारी, शेतकरी व मजुरांचे झालेले हाल मी प्रत्यक्ष पाहिल्याने माझ्या उत्पन्नातील काही भाग या दिवाळीच्या निमित्ताने मी हातावर पोट असणाऱ्या  वीटभट्टी कामगार, आदिवासी व बांधकाम कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे. 
             आजच्या या दिवाळी उपक्रमाचे नियोजन क्लबचे व्हाइस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, ट्रेझरर ला. राजेंद्र फंड, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. विक्रम देसाई, यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...