राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता एक नावाजलेली ए ग्रेड पतसंस्था असून नेहमीच सामाजिक व गरजेचे उपक्रम राबवत असते. आज संस्थेच्या सर्व ठेवीदारांना दीपावली निमित्त साखर वाटप करण्यात आली. या वेळी जेष्ठ संचालक देविदास सोनटक्के यांनी आज ची साखर वाटप ही संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या वयक्तिक खर्चातून केलेली असल्याचे व दोन दिवसापूर्वी चेअरमन यांची मातोश्री चे निधन झाल्यामुळे ते आज हजर नसल्याचे सांगितले. या वेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ संतोष मैड बोलले कि ठेवीदारांना साखर वाटप करण्याचा कार्यक्रम पुरवणीयोजित मोठा करण्याचा मानस होता व माजी खासदार यांच्या हस्ते करण्याचे होते परंतु काही अपरिहार्य कारणा मुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. भाऊसाहेब चौधरी यांनी संस्थेची ठेवी दहा कोटी च्या पुढे पोहचविण्यात मोलाचा वाटा त्याबरोबरच त्यांनी संस्थे तर्फे व मैड हॉस्पिटल तर्फे दीपावली च्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.घेऊन ठेवीदार, संचालक मंडळ. कर्जदार यांच्याशी चांगले ऋणानुबंध जोपसले असून त्यांची कार्यशैली वैशिष्ठ पूर्ण आहे.मुख्य अतिथी व राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर्जेराव मते सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि संस्थेचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, व्हा चेअरमन ग्राउंडफ्लोर वर काम करतात व संस्थेला ठेवीदार तर भेटतात पण चांगले कर्जदार
नियमित कर्ज भरणारे मिळणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे संस्थेचे नाव लौकिक वाढून संस्था गतीने योग्य दिशेने मार्गस्थ असते.
त्यानंतर जेष्ठ संचालक सतीश खांबेकर यांनी आभार मानले व सर्व अतिथी व्हा चेअरमन, संचालक मंडळ यांच्या हस्ते सर्व ठेवीदारांना साखर वाटप करण्यात आली व चेअरमन Army मातोश्री साठी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी डॉ संतोष मैड, मधुकर चौधरी (स्वीय सहाय्यक )शंकर रोकडे (स्वीय सहाय्यक )सर्जेराव मते सर, डॉ महेश गव्हाण, पत्रकार राजूभाई पठाण (
संचालक ), सतीश खांबेकtर, देविदास सोनटक्के,संजय देवकर, देवराम गाडेकर, संदीप तुपे, मनीषा गोर्डे, बेबीताई सदाफळ, उर्मिला निकाळे, सदाशिव बोठे,रावसाहेब भागवत, विलास साठे, पुरुषोत्तम गुंजाळ, आश्रफ शेख, रवींद्र वैजापूरकर,साई गणेश गव्हाणे व ठेवीदार असंख्य मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा