गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

एकरूखे शाळेतील श्रेयश नालकर याची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड

एकरूखे शाळेतील श्रेयश नालकर याची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड




सन 2025 26 मध्ये इस्रो शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर निवड चाचणीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरूखे येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थी चि. श्रेयश राहुल नालकर या विद्यार्थ्यांची 154 गुण मिळवून  इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्रेयसचे जलसंपदामंत्री आदरणीय श्री.राधाकॄष्ण विखे पा.,आदरणीय सौ. शालिनी ताई विखे पा.आदरणीय सुजयदादा विखे पाटील,आदरणीय श्री. आनंद भंडारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी,आदरणीय श्री.भास्कर पाटील साहेब शिक्षणाधिकारी,आदरणीय  श्री विवेक गुंड साहेब गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावशे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू कांबळे साहेब, शिविअ श्री घोरपडे साहेब, गणेशनगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सोमनाथ वैद्य साहेब, एकरुखे शाळेचे मुख्याध्यापक श्री राधाकिसन दळवी सर, श्रेयशचे वडील श्री राहुल नालकर व आई सौ संगीता नालकर. मार्गदर्शक शिक्षक श्री जगन्नाथ डांगे सर, श्री सुधाकर अंत्रे सर व सर्व शिक्षक या सर्वांनी  अभिनंदन केले. 



तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत एकरूखे व सर्व ग्रामस्थ यांचे वतीने श्रेयशचे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...