श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सव २०२५ जल्लोषात
साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या देवीची आरती पत्रकार महाजन, कोते, बिडवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. या उत्सवात देवीच्या आरतीचा मान श्री साई संस्थानचे माजी कामगार अधिकारी मोहनराव कोते, पत्रकार संजय महाजन व संजय बिडवे यांना मिळाला. गरबा, दांडियासह महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन हे या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
साई निर्मिती करिअर अकॅडमी, श्रीकृष्णनगर, एअरपोर्ट रोड येथे आयोजित या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी ७ वाजता देवीची महाआरती आणि त्यानंतर गरबा व दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघत आहे.
यावर्षी प्रतिष्ठानने "स्वच्छ शिर्डी... सुंदर शिर्डी..." ही संकल्पना घेऊन एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत शहरातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दररोज प्रशांतदादा कोते, अनिल मामा सोमवंशी व नवनाथ गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.
उत्सवातील भाविकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी दररोज रात्री १० वाजता दांडिया कार्यक्रमानंतर मोफत लकी ड्रॉ काढण्यात येतो. यामध्ये १० साड्या व १० गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जातात. हा लकी ड्रॉ भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.
साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष ताराचंद कोते, भारत चंदोरे, गणेश सोमवंशी, सुधीर सुपेकर, प्रशांत शिरसाठ, अमोल सोमवंशी, सौरभ पाटील, गणेश मोहन, विशाल दहिवड, प्रशांत राहणे, स्वप्नील सोमवंशी, आकाश शिंदे, साई कोते, रोहित आमोलिक, ऋषी पारधे, कृष्णा माळवे, मयूर कोते, ओमकार कोते, पत्रकार तुषार महाजन यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या उत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व भाविकांनी या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा