लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या 1st Quarter Awards सोहळ्यात डॉ. संजय उबाळे यांना “Best Zone Chairperson Award” ने गौरवन्यायत आले
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 तर्फे आयोजित भव्य 1st Quarter Awards सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट संघटनशक्ती आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल “Best Zone Chairperson Award” ने सन्मानित करण्यात आले.
हा भव्य पुरस्कार सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मा. लायन राजेशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव, मनमाड आदी ठिकाणांहून सुमारे ४०० हून अधिक लायन्स सभासद मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमास लायन्स इंटरनॅशनलचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये –
मा. लायन राजेशजी अग्रवाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)
मा. लायन राजेंद्र गोयल (Convener)
मा. लायन विजयजी सरडा (Multiple Council Chairman)
मा. लायन राजुभाई मुच्छाल (ID Endorsed)
मा. लायन गिरीशभाऊ मालपाणी (Past Multiple Council Chairman)
मा. लायन श्रेयस दीक्षित (1st Vice District Governor)
तसेच लायन रवींद्र गोल्हार, लायन रवींद्र सातपुते, लायन सलिल कारखानीस, लायन आर. के. शाह, लायन सुनीताभाभी मालपाणी, लायन राजेश कोठावदे, लायन धनंजय धुमाळ आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.
समाजकार्यात आघाडीवर असलेल्या क्लबचा गौरव
मागील तीन महिन्यांमध्ये उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या विविध क्लब्स व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
लायन्स क्लब संगमनेर SAFFRON SAFFIRE – प्रेसिडेंट लायन कल्याण कासाट व त्यांच्या टीमचा गौरव.
लायन्स क्लब कोपरगाव – प्रेसिडेंट लायन अक्षय गिरमे व त्यांच्या टीमचा सन्मान.
तसेच लायन्स क्लब श्रीरामपूर आणि लायन्स क्लब राहाता यांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
सर्व सन्मानित क्लब्सना आकर्षक ट्रॉफी व डिस्ट्रिक्ट पिन प्रदान करण्यात आल्या.
डॉ. संजय उबाळे यांचे मनोगत
“हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या संपूर्ण झोनचा आहे. माझ्या झोनमधील प्रत्येक क्लब प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर तसेच लायन्स सदस्यांच्या अथक मेहनतीने, एकसंघ कार्यामुळे आणि कॅबिनेट ऑफिसर्सच्या सहकार्यामुळे हा मान मला मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या सर्वांच्या सेवाभावाचा सन्मान आहे,” असे डॉ. संजय उबाळे यांनी मनोगतात सांगितले.
तसेच त्यांनी पुढे आवाहन केले – “आपण सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प घेतला आहे. पुढेही एकत्र राहून, समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहचवूया आणि लायन्स क्लबचे नाव अधिक उज्ज्वल करू
कार्यक्रमाची वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. टाळ्यांचा कडकडाट, सन्मानचिन्हांचे वितरण आणि उपस्थित मान्यवरांची भाषणे यामुळे सोहळ्याला विशेष उंची लाभली.
लायन्स क्लब राहता चे मा. अध्यक्ष लायन प्रकाश सदाफळ,लायन pravin गुलाटी कॅबिनेट ऑफिसर,लायन दर्शन वैद्य डिस्ट्रिक्ट लिओ प्रेसिडेंट
लायन राजेंद्र बांगर उपाध्यक्ष,लायन रतन चौधरी सेक्रेटरी, लायन दिनेश कारले ट्रेजरर, ॲड गोरखभाऊ दंडवते
लायन अंजली उबाळे मेंबरशिप चेअरमन, लायन दीपक दंडवते एल सी एफ कॉर्डिनेटर लायन स्मिता मुरादे डायरेक्ट, लायन सोहन उबाळे, लायन. खिजर शहा, संजय भनगे,
रवींद्र जोशी, डॉ विजय म्हस्के,रवी धस,सचिन सदाफळ,विजय धनवटे, डॉ . राजेश्री गाडेकर, डॉ.राहुल चोळके,सत्यवान कोल्हे,संतोष भडांगे,संदीप भीगारदिवे, गायकवाड साहेब, गायकवाड सिस्टर,सुरेश गायकवाड अनाप मॅडम यांनी अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा