राहाता तालुक्यात शासकीय कार्यालये रिकामी; सौ. प्रभावती घोगरे यांचा प्रशासनाला इशारा
राहाता,
तालुक्यातील तहसील, कृषी विभाग, पंचायत समिती यासह अनेक शासकीय कार्यालये सोमवारी सकाळी १० वाजताही रिकामी दिसून आली. नागरिक व शेतकरी आवश्यक कामांसाठी आले, मात्र कार्यालयांवर कुलूप दिसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रशासनातील अनागोंदीवर काँग्रेस नेत्या व कृषीभूषण सन्मानित सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
"शासन थांबतं… पण शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या अडचणी थांबत नाहीत,"
-सौ. प्रभावती घोगरे
त्यांची प्रमुख मागणी:
बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ लागू करावी
अधिकाऱ्यांची वेळेवर उपस्थिती बंधनकारक करावी
सेवा वेळेत न दिल्यास शिस्तभंगात्मक कारवाई करावी
“हे केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर सामान्य जनतेचा अपमान आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जर ही परिस्थिती त्वरित सुधारली नाही, तर काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही सौ.घोगरे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा