मंगळवार, ३ जून, २०२५

राज्य वेतन त्रुटी समितीने पॅरामेडिकल पदावर झालेला अन्याय दूर न केल्यामुळे राज्यात असंतोष डॉ.संजय उबाळे

राज्य वेतन त्रुटी समितीने पॅरामेडिकल पदावर झालेला अन्याय दूर न केल्यामुळे राज्यात असंतोष डॉ.संजय उबाळे 

राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगात झालेल्या अन्यायाबाबत राज्य वेतन त्रुटी समिती म्हणून श्री खुल्लर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली सदर समितीने दिलेल्या कालावधीत सर्व संघटनांनी आपली निवेदने आपल्या विभागातील प्रमुख अधिकारी यांच्याकडे सादर केली त्यानंतर संवर्गनिहाय वेतन त्रुटी समितीने प्रत्येक संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व काही पदांना वेतन त्रुटी दूर करण्यासाठी प्रस्तावित केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय नामदार अजितरावजी पवार साहेब या सर्वांनी एक पारदर्शक सरकार चालवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच कार्यकाळात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी या पदनामाला मंजुरी मिळाली यासाठी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील  ,आरोग्यमंत्री  दीपक सावंत आरोग्य राज्यमंत्री रामजी शिंदे यांच्या पुढाकाराने पदनामात बदल करून पंचवीस वर्षांपूर्वीची मागणी मान्य केली त्याबद्दल संघटनेच्या वतीने सर्वांचे अभिनंदनचा ठराव त्या वेळेला आम्ही केला होता ,
वेतन त्रुटी खंड दोन मध्ये ठराविक पदांना आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रस्ताव सादर करण्यात आले व त्याच पदांना वेतन त्रुटी समितीने मान्यता देण्यात आली 
त्याही वेळेला प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेच्या वतीने बक्षी समितीकडे सकारात्मक अहवाल संघटनेने सादर केला होता. परंतु त्याही वेळेला आमच्या पदरी निराशा पडली
 त्यानंतर राज्य वेतन त्रुटी  समिती मध्ये सुद्धा माननीय संचालक, माननीय सचिव यांनी प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांना एस 15 ही वेतनश्रेणी प्रस्तावित करण्यात आली होती व स्वतः माननीय खुल्लर साहेब अध्यक्ष राज्य वेतन त्रुटी समिती यांनी सुद्धा आपण करत असलेल्या अतिशय जोखमीच्या कामामुळे अतिरिक्त काम असल्यामुळे आपणास S15  ऐवजी एस 16 वेतनश्रेणी देण्यात यावी असे खुद्द त्यांनी त्यावेळेला समिती समोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले होते, परंतु राज्य वेतन त्रुटी समिती कडे प्रस्ताव प्रस्तावित झाला त्यावेळेला आरोग्य विभागातील ठराविक पदांनाच पुन्हा पुन्हा त्याच त्याच पदांना वेतनश्रेणी मध्ये झालेला अन्याय दूर करून प्रस्तावित करण्यात आले ,
परंतु प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हे पद आरोग्य विभागांमध्ये अतिशय महत्त्वाचे व पाठीचा कणा समजले जाणारे पद,हे पद सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय  शिक्षण विभागत कार्यरत आहे ,प्रयोगशाळेतील अहवालावर रुग्णांची व डॉक्टरांचे सर्व अवलंबून असतात महत्त्वाचे बाब म्हणजे कोविड काळामध्ये याच प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांनी आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांची स्वाब घेणे तपासणी करणे अहवाल सादर करणे अतिशय जिगरीचे काम केले ,ज्या वेळेला कोविडमध्ये रुग्णासोबत स्वतःचे नातेवाईक व सर्व दुरून बघत होते त्याच वेळेला प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय, क्षय रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालया वैद्यकीय शिक्षण विभागातील  याच कर्मचाऱ्यांनी स्वतः घशामध्ये हात घालून रुग्णांचे स्वाब घेऊन अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे, त्याच कालावधीत याच पदावर काम करणारे अनेक प्रयोगशाळात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांचे काम करत असताना निधन झाले आहे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. 
आरोग्य विभागामध्ये पॅरामेडिकल पद अत्यंत महत्त्वाचे असते प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी , क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, तंत्रज्ञ या पदावर सर्वस्व रुग्णालयाचे कामकाज अवलंबून असते प्रयोगशाळेमधून रिपोर्ट दिला तरच डॉक्टरांना पुढे रुग्णावर उपचार करता येतो क्ष किरण विभागातील तंत्रज्ञानी एक्स-रे करून व औषध निर्माण अधिकारी यांनी कोविड काळामध्ये रुग्णाला लागणारे इंजेक्शन व औषधे कोविडसंबंधात उपलब्ध करून रुग्णांना योग्य ती सेवा दिलेली आहे 
परंतु वेतन त्रुटी समितीने जी महत्त्वाची पदे रुग्णालयामध्ये काम करतात त्यांच्यावरच अन्याय केलेला आहे, या पदाला वेतनश्रेणी लागू झाली ती ही आमचीच आहे .परंतु पॅरामेडिकल पदांवर अन्याय झाला ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात असून एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला आहे ,
वरिष्ठ कार्यालयात असणारे अधिकारी आकृतीबंध तयार करताना किंवा शासनाला कुठलाही प्रस्ताव सादर करताना संघटनेला विचारात घेत नाहीत, परस्पर अहवाल सादर करून या प्यारा मेडिकल पदांवर अन्याय करत आहे ग्रामीण भागात सेवा देत असताना किती अडचण येतात याचा विचार व्हावा गडचिरोली भामरागड या ठिकाणी एका रुग्णालयामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञान एक महिला आपल्या दोन वर्षाच्या बाळाला घेऊन काम करताना आपल्या जीवाची व बाळाची परवा न करता प्रयोगशाळेत काम करत होती 
असे अनेक प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी आहेत जे रात्रंदिवस 24 तास सेवेला बांधील असतात, काही कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागांमध्ये फक्त आठ तास ड्युटी असते परंतु प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व प्यारा मेडिकल पद मात्र 24 तास रुग्णांच्या सेवेत काम करत असतात .
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे जवळजवळ पाच प्रलंबित प्रस्ताव आरोग्य सचिव कार्यालयात गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित आहेत  व  वेतन त्रुटी बाबत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांची लवकरच पॅरामेडिकल संयुक्त कृती समिती भेट घेणार आहेत अशी माहिती डॉ. संजय उबाळे अध्यक्ष प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी निवेदनात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...