मजूर मिळत नसल्याने पाहुण्यांना काम करण्याची आली वेळ .
शिर्डी :
परिसरात शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने पाहुणेमंडळी व कुटुंबासोबत काम करून घ्यावे लागत आहे. बेमोसमी पावसाने शेतकऱ्याचे गणितच बिघडून टाकले आहे ऐन पावसाच्या तोंडावर मजूर मिळत नसल्याने शेतीची काम खोळंबली आहेत आहेत .मजूर उपलब्ध नसल्यामुळे, अनेक शेतकरी आता स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबासोबत शेतीचे काम करत आहेत. जावई संजय महाजन पत्रकार शिर्डीला संस्थान एम्प्लॉईज तर दुसरे जावई झेडपी अभियंता डिके इंगळे यांना देखील काम करण्याची वेळ आली .याला कारण म्हणजे, शेतीसाठी आवश्यक असलेले मजूर उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांची उपलब्धता कमी आहे. अनेक शेतकरी या अडचणीवर मात करण्यासाठी चार दिवस पाहुणचार करण्यासाठी आलेले पाहुणे देखील हातभार लावत आहेत. त्यात जावई पाहुणे यांना सोबत घेऊन काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मजूर उपलब्धता कमी:
शेतीसाठी आवश्यक असलेले मजूर पूर्वी सहज उपलब्ध होत होते, परंतु आता त्यांची उपलब्धता कमी झाली आहे. अनेक शेतकरी या समस्येचा सामना करत आहेत आणि त्यांना शेतीचे काम स्वतः किंवा कुटुंबासोबत करावे लागत आहे. मजुरी 300 ते 400 रुपये रोज देऊन देखील मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करावी की सोडून द्यावी असा प्रश्न पडलेला आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात मका चारा कापणीला मजूर मिळत नसल्याने अद्याप उभाच आहे. विहिरींना पाणी असून देखील कपाशी लागवडीला शेती तयार नसल्याने शेतकरी कासावीस झाला आहे. . *शेतकरी पेक्षा मजूर शिल्लकी*. मजूर शेती काम करण्यासाठी एकरी पाच ते सहा मजूर देऊन तीनशे ते चारशे रुपये रोज देऊन देखील मजूर मिळत नाही सकाळ संध्याकाळ दोघं टाईम काम करून शेतकरी पेक्षा मजूर शील्की राहिला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी शेती काम करण्यासाठी मजुरांकडून पैसे उचल म्हणून घेतले आहेत. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा