सोमवार, २१ एप्रिल, २०२५

वाकडी -धनगरवाडी शिवारात तिसरा बिबटयाही जेरबंद

वाकडी -धनगरवाडी शिवारात  तिसरा बिबटयाही जेरबंद 


Rahata
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील स्नेहल राशिनकर या चिमुकलीचा बळी गेल्यानंतर वन विभागाने धनगरवाडी परिसरात पिंजरे लावले असून पिंजऱ्यामध्ये कोंबड्या ठेवून सुद्धा बिबट्या पिंजऱ्याला हुलकवणी देत आहे  बिबटया अजून  मात्र या ठिकाणाहून वाकडी कडे दोन किलोमीटर अंतरावर बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या चिंचाच्या झाडाजवळ यांच्या शेतात 15 एप्रिल रोजी सायंकाळी एक बिबटया पिंजऱ्यात अडकला होता.दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात अडकला तसेच 20 एप्रिल रविवार रोजी रात्री तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे आहे. दुपारी वन विभागाचे अधिकारी वन संरक्षक यांनी येऊन जेरबंद बिबट्याला घेऊन गेले तसेच वाकडी धनगरवाडी चितळी या परिसरामध्ये भीतीचे वातावरण कायम असून शेतीचे कामे करण्यासाठी महिला व पुरुष धाडस करीत नाही  तरी वन खात्याने अजूनही मोकाट असलेल्या बिबट्यांना जेरबंद  करण्यासाठी उपाययोजना कराव्या  तसेच काही शेतकरी शेतात येताना काही ठिकाणी बिबट्यांचा संचार दिसत आहे शाळकरी मुले तसेच मजुरी कामाला जाणाऱ्या महिला या पूर्णपणे धास्तीने जीव मुठीत घेऊन जात आहेत तरी वन संरक्षण अधिकाऱ्यांनी बिबट्या संदर्भात वाकडी धनगरवाडी चितळी लांडेवाडी या परिसरातून शेतकऱ्यांनी फोन केल्यास फोन उचलून सहकार्य करावे असे नागरिकांनी म्हटले आहे तरी वन अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून पिंजऱ्यांची संख्या वाढवावी जेणेकरून बिबट्या जेर बंद होतील अशी मागणी नागरिकांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...