रविवार, २० एप्रिल, २०२५

अंध अपंग दिव्यांग संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ ममता पिपाडा यांचा जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला

अंध-अपंग (दिव्यांग) संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देवुन प्रथम लोकनियुक्त नगरध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांचा जन्मदिनानिमित्त सत्कार कऱण्यात आला. आम्हा सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी निधी वाटपाची सुरुवात ममता पिपाडा यांनी सुरुवात केली. ही आमच्या सर्वांसाठी मौल्यवान भेटच होती त्यामुळे आमच्या कुटुंबासाठी आधार निर्माण झाला. असे मनोगत दिव्यांग संघटनेचे प्रमुख सतिष निकम यांनी व्यक्त केले. सौ.ममता पिपाडा यांच्या जन्मदिन दिव्यांगांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीआय़चे माजी जिल्हाउपाध्यक्ष दिलीपराव  वाघमारे,प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, श्रावण पवार, शशिकांत कांबळे, मदनलाल पिपाडा,महावीर पिपाडा,उज्वला निकल,निखील पिपाडा,शहाबाई साळवे, श्रृती पिपाडा,ट्विंल पिपाडा आदी उपस्थित होते. 
यावेळी सतिष निकम पुढे बोलताना म्हणाले की पिपाडा दाम्पत्य हे आम्हाला कोणतीही अडी-अडचण असो नेहमी आमच्या पाठीशी खंबीर उभे राहत आलेले कुटुंब आहे. प्रत्येक सुख दु:खात नेहमी पारीवारीक सदस्याप्रमाणे सहभागी होतात. डॉ.पिपाडा हे कुठेही भेटले व दिसले तरी आवर्जून विचारणा करतात. रात्री 11 वाजता एका गरिब कुटुंबाच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते यातुन त्यांची गोरगरिब लोकांविषयी असलेले प्रेम व सदभावना दिसुन येते. यावेळी निकम यांना आलेल्या अनेक अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. यावेळ प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पिपाडा कुटूंबाशी गेल्या अनेक वर्षापासुन आलेले संबंधाना अधोरेखित करत भावना अनावर झाल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी अस्सल हाडाचा शेतकरी आहे. मा आजही माझी शेती बैलांसोबत करतो. ज्या प्रमाणे माणसाला ह्रद्यविकाराचा झटका येतो त्याप्रमाणे माझा बैल ह्रदय विकाराच्या झटक्याने मरण पावला त्याच्या अत्यंविधीसाठी डॉ.राजेंद्र पिपाडा हे उपस्थित होते त्यांची प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त होते.  



आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दिव्यांग्यांसाठी निधी उपलब्ध करुन देवु शकलो याचा मला मनस्वी समाधान आहे. आणि माझा जन्मदिवस दिव्यांग्य बांधवांमध्ये साजरा कऱण्याचे भाग्य लाभले यामुळे मला आनंद झाला. (सौ.ममता पिपाडा (प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...