शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

श्री साईबाबा संस्थानने साईभक्तांचा विमा उतरवावा आंतराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे मागणीस मिळाले यश साई भक्तांचा 5 लाखाचा विमा उतरवणार श्री साईबाबा संस्थान.

 श्री साईबाबा संस्थानने साईभक्तांचा विमा उतरवावा आंतराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे मागणीस मिळाले यश साई भक्तांचा 5 लाखाचा विमा उतरवणार श्री साईबाबा संस्थान.




शिर्डी प्रतिनिधी: 

साईबाबांच्या दर्शनासाठी शिडीत आलेल्या भाविकांचा श्री साईबाबा संस्थानने विमा उतरवावा तसेच शिर्डी व परिसरात अपघात झालेल्या भक्तांवर साईनाथ रुग्णालयात मोफत उपचार करावेत या मागणीचे जाहीर निवेदन आंतराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली साईबाबा संस्थानचे मा कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल मॅडम यांना 2018 साली देण्यात आले होते,
यामागणीस सतत पाठपुराव्यामुळे नुकतेच यश मिळाले असून श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे मा कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी नुकतेच साईबाबा संस्थांनच्या वतीने सुरक्षित साईदर्शन संकल्पनेला मान्यता देऊन परगावाहून पायी येणाऱ्या साई भक्तांची आगाऊ नोंदणी करून त्यांचा सुमारे ५ लाखाचा विमा उतरवण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी वारंवार पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला व सदर अपघाती विमा व सुरक्षित साईदर्शन का ?  गरजेचे आहे याचे महत्व प्रशासनाला समजावून सांगितले आहे, घरापासून घरापर्यंत सुरक्षित साई दर्शनामुळे पायी येणाऱ्या साई भक्तांचा रस्त्यात होणाऱ्या अपघातापासून आता भाविकांची साईबाबा यामध्यमातून रक्षा करणार असल्याचे ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी सांगितले. यापूर्वी देखील विविध विषय हाताळून मागणीस यश मिळाले आहे त्यात प्रामुख्याने बुंदी पाकीटवर मॅन्युफॅक्चर स्टॅम्प, साईभक्त अपघाती विमा, हॉस्पिटलमध्ये अपघात ग्रस्थांना मोफत उपचार, मंदिर परिसरात अपघात झाल्यास पूर्वी १० लोकांवरून ५० लोकांपर्यंत भरपाई व विमा देण्याची मागणी असे अनेक मागण्या प्रसाशानाकडून योग्य पाठपुरावा करून मान्य करून घेण्यास यश मिळाले आहे .
यावेळी सदर मागणीच्या यशासाठी गणेश वाघचौरे,गणेश खैरे, बसवराज शिंदे, संदीप वाघमारे, शशिकांत अल्हाट, जुबेर शेख, विशाल जैन, रविंद्र वाघ, राकेश भोकरे, शरद जगदाळे, शोभा वर्पे , जावेद शेख, विशाल पाटील, कपिल कांडा, डॉ. विजय मकासरे, रामेश्वर लोनारी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...