डॉ संजय उबाळे यांची पुनश्च प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड
राहता
प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 23 मार्च रोजी अगत्य टुरिझम शिर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मीटिंगसाठी संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व सभासद आले होते सर्वप्रथम साई प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली श्री प्रदीपजी चौधरी साहेब वरिष्ठ सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा संपन्न झाली, श्री सुभाषजी महिरे प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. राज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे व संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे नियोजन करण्यात आले होते. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण राज्यातील सभासद व पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचा अहवाल या ठिकाणी सादर केला व याही पुढे संघटनेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली
यानंतर दुपारच्या सत्रात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रदीपजी चौधरी व श्री सुभाषजी माहिरे यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून महाराष्ट्र राज्याची नवीन कार्यकारणी जाहीर केली नवीन कार्यकारिणी करत असताना काम करणाऱ्या सभासदांना संधी द्यावी अशी मागणी आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वानुमते बिनविरोध डॉक्टर संजय उबाळे यांची पुनश्च राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली
तसेच कार्याध्यक्षपदी अजय क्षीरसागर, सरसचिवपदी विवेकानंद येनावार, कोषाध्यक्षपदी अविनाश धमगाये, उपाध्यक्षपदी राजेंद्र लिल्लारे, मारुती कदम ,संभाजी पाटील
सचिवपदी अजय ठाकरे, संघटक सचिवपदी अनिल तेलमोरे अनुजा यादव, सांस्कृतिक सचिवपदी संपत आंधळे , डायरेक्टर पदी संजय बेजलवार, संजय देशपांडे, अनिता ठाकरे तसेच विभागीय सचिव पदी विनोद चौधरी, राजेश कांबळे, गिरीश केळकर, महेश होळकर ,विनायक गावित, विलास सावळे,
कायदेशीर सल्लागार ॲड .प्रकाश रामटेके
प्रसिद्धीप्रमुख योगेश दिघे, रामचंद्र जोगदंड
वरिष्ठ सल्लागारपदी सुभाष मोहिरे, प्रदीप चौधरी, अनिल घोडमारे ,अनंत कुलकर्णी, सदानंद कांबळे , किरण अमृतकर
या सर्व पदावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी योग्य निर्णय घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली, सर्व निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सभासद यांना साई बाबाची प्रतिमा असलेली एक ट्रॉफी आठवण म्हणून देण्यात आली तसेच सर्व सभासद व पदाधिकारी यांना बोलण्याची संधी देण्यात आली प्रत्येकाने आपापली भावना व्यक्त करून सभागृहात वेगवेगळ्या चर्चा केली
निवड झालेल्या सर्व सभासदांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या , काही पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित नसल्यामुळे सर्वानुमते सध्या त्यांना पदे देऊ नये अशी जोरदार मागणी सभागृहातून आल्यामुळे बऱ्याच पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली नाही परंतु नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सर्वांना संधी द्यावी जे आले नाहीत त्यांनाही संधी द्यावी अशी विनंती केली परंतु सभागृहाने जे आले त्यांना पदे देण्यात यावी अशी जोरदार मागणी केल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली नाही
याप्रसंगी पुनश्च एकदा सेवानिवृत्त होऊन ही संघटनेच्या कामांमध्ये सक्रिय राहावे व आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे यासाठी सर्व सभासदांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे यांनी सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले
तसेच यापुढे असणाऱ्या आपल्या अडचणी व मंत्रालय स्तरावर अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागण्या व त्या सोडवण्यासाठी मी सतत तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली
यानंतर सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन सभा समाप्त करण्यात आली व संपूर्ण महाराष्ट्र मधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांनी सर्वांचे निरोप घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली. संघटनेच्या विविध जिल्ह्यातून अनेक सभासद या मीटिंगसाठी हजर झाले होते गडचिरोली पासून ते नांदेड पर्यंत नांदेड पासून ते नंदुरबार पर्यंत या संघटनेचा लोन पसरलेले आहे संपूर्ण राज्यातून आलेल्या सभासद व पदाधिकारी यांचे खरंच कौतुक करावे तेवढे कमी आहे असे उद्गार सरसचिव विवेकानंद येनावार यांनी म्हटले
कोषाध्यक्ष अविनाश धमगाये यांनी संघटनेचा लेखाजोखा सादर केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या गोड वाणीतून गडचिरोली येथून आलेले अजय ठाकरे साहेब यांनी केले तसेच आभार राजेंद्र लिल्लारे गोंदिया इथून आलेले संघटनेचे उपाध्यक्ष यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा