रविवार, १२ जानेवारी, २०२५

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद स्वामी जयंती वृक्षारोपण करून साजरी...साईयोग फाउंडेशन व राहाता नगरपालिकेचा अनोखा उपक्रम..

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद स्वामी जयंती वृक्षारोपण करून साजरी...
साईयोग फाउंडेशन व राहाता नगरपालिकेचा अनोखा उपक्रम..



साईयोग फाउंडेशन व राहाता नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद स्वामी यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.माझी वसुंधरा ५-० अंतर्गत राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खटकळी परिसर राहाता येथे बारा फुटी वड,कडू निंब,पिंपळ व रेन ट्री वृक्षांचे रोपण केले.त्यानंतर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
सुरुवातीला साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.आजपर्यंत साईयोग फाउंडेशनने महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी सामाजिक उपक्रम राबवित साजऱ्या करण्याचा अनोखा पायंडा पाडल्याचा उल्लेख करत यासाठी सर्वच सदस्यांचे अनमोल सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले.
दुसरे जेष्ठ सदस्य प्राथमिक शिक्षक प्रविण खंडीझोड यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले शिवाजी महाराज जन्मला येत नसतात तर ते घडत असतात त्यासाठी जिजाऊ जन्माला याव्या लागतील.तसेच विनाश विध्वंस आणि आतंकवादापेक्षा प्रेम व बंधू भावाच्या संवादाने जग जिंकता येते हा संदेश विवेकानंदांनी जगाला दिला साईयोग फाउंडेशनने हाती घेतलेले पर्यावरण संवर्धनाचे कार्य तरुणांच्या वैचारिक प्रगतीला दिशादर्शक ठरणार आहेत.


तसेच बालशिव व्याखेते धनराज शेटे याने दोन्ही महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांची महती विषद केली.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी जेष्ठ सदस्य मोहन तांबे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे,आरोग्य लिपीक रवी बोठे,वसुली लिपीक अनिल कुंभकर्ण,प्रभाकर नावकर,भाऊसाहेब बनकर,संजय बाबर,मोहन तांबे,ॲड.गोरखनाथ दंडवते,बबलू फटांगरे,विठ्ठल निर्मळ,उमेश लुटे,ज्ञानेश्वर आरणे,नामदेव गवते,परमेश चव्हाण,दीपक गाडेकर,रविंद्र धस,व्यंकटेश अहिरे,नारायण गाडेकर,सुभाष दंडवते,राजेंद्र बांगर,रंगनाथ सदाफळ,संदीप जेजुरकर,बाळासाहेब ठाकरे,ज्ञानेश्वर शेटे,अर्जुन चव्हाण,भानुदास 
जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...