साईयोग फाउंडेशन द्वारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आज सकाळी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त राजेंद्र निकाळे सर,अरुण मोकळ सर,डॉ संजय उबाळे,प्रविण खंडिझोड सर,गोरखनाथ दंडवते, संजय वाघमारे आदी प्रमुख अतिथिंच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.राजेंद्र निकाळे सर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेबरोबरच शैक्षणिक,राजकीय तसेच अर्थव्यवस्थेसंदर्भात भरीव कामगिरी केलेली आहे.त्यामुळे त्यांच्या विचारांना एका चौकटीत न बांधता त्यांच्या बहुगामी पैलूंचा आदर्श ठेवणे हेच खरे अभिवादन ठरेल.अरुण मोकळ सर म्हणाले डॉ बाबासाहेबांनी समाजासाठी,महिलांच्या हितासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारतीय संविधानाची निर्मिती केली म्हणून त्यांना ज्ञानाची प्रतीक असे म्हटले जाते.प्रवीण खंडीझोड सर यांनी डॉ आंबेडकरांच्या विचारांच्या आधाराची आजही देशाला गरज आहे,म्हणून महामानवाने पुन्हा अवतारावे ह्या अर्थाचे अभिवादन मनोगतातून व्यक्त केले.तसेच साईयोग फाउंडेशनने पर्यावरण संरक्षण तसेच मतदार जनजागृती रॅलीतून दिलेला वन ओट=वन व्हॅल्यू चा संदेश देऊन महामानवाचे कार्य पुढे नेण्यास हातभार लावत असल्याचे नमूद केले.
शेवटी साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा