शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

जनमनातील मा. सरपंच दिवंगत डॉ. संजय खर्डे पाटील.


जनमनातील मा. सरपंच दिवंगत डॉ. संजय खर्डे पाटील.

कोल्हारचे माजी सरपंच एक धडाडीचे निर्णय घेणारे व तो निर्णय किती जरी विरोध असला तरी आमलात आननारे अशी ज्यांची ओळख होती असे माझे मित्र डॉ. संजय खर्डे पाटील यांचे नुकतेच पंचविस नोव्हेंबरला पुण्यात मंगेशकर हॉस्पीटल मध्ये निधन झाले.
गेले आठ वर्षा पासुन ते कर्करोगाशी झुंजत होते अखेर मृत्युने त्यांना गाठलेच असो.
डॉ. संजय खर्डे यांच्या बाबतीत खुप काही बोलता येईल त्यांचा कोल्हार मधील सरपंच पदाचा कार्यकाळ हा दहा वर्षापेक्षा जास्त होता त्या नंतर ते2005 ला राहाता पंचायत समितीचे सदस्य होते पंचायत समिती सदस्य असताना देखील त्यांनी उल्लेखनिय काम केले.
कोल्हार ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनिय काम जर कोनते असेल तर त्यांनी विषेश ग्राम सभा बोलाऊन भगवती माता व विठ्ठल मंदिरांची सतरा एक्कर जमीन परत देवालय ट्रस्टला मिळऊन दिली सदर काम करत असताना त्यांना त्यांचे बंधु ऍड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी मोलाची साथ दिली देवालय ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत हरिभाऊ अण्णा खर्डे पाटील यांनी देवालय ट्रस्ट चि जमीन परत मिळऊन दिल्या बद्दल दोन्ही गावचे सरपंच व ग्रामस्थाचे आभार मानले होते डॉ. संजय खर्डे ऍड. सुरेंद्र खर्डे पा. व हरिभाऊ अण्णा यांच्या प्रयत्नातून देवालय ट्रस्टच्या जमीनी परत मिळाल्या या बद्दल दोन्ही गावानी समाधान व्यक्त केले.
डॉ. संजय खर्डे यांच्या प्रयत्नातुन कोल्हारच्या प्रवरा नदिवरील पुला शेजारी जी रीकामी नदिची जागा होती तेथे वृक्षारोपन जेष्ठनागरीकांच्या हस्ते केले आज ते वृक्ष डॉ. संजय खर्डे यांच्या कल्पकतेचि साक्ष देत डौलाने उभे आहेत.
मि.2016 साली अतिशय तिव्र दुश्काळ असताना कोल्हार मधुन बोअरवेलमधील खाजगी पाणि विक्रीसाठी प्रतिबंध म्हणून कम्युनिस्ट पक्षासह सर्व पक्षीय आंदोलन उभे केले सदर आंदोलनात राहाता तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी जातीने लक्ष घालून अनाधिकृत पणि उपसा बंद केला त्या वेळेस तहसीलदार साहेब यांनी डॉ. संजय खर्डे यांना व मला विचारना केली कि ते पाणि देखील दुश्काळी भागात शेतीसाठीच जात आहे तेव्हा डॉ. खर्डे यांनी ते जरी पाणि शेती साठी जात असेल तरी आमचा भागातील भुगर्भातील पाणि पातळी खाली जात आहे हे निदर्शनास आनुन दिले सदर बाबा तहसीलदार साहेब यांना पटली व सदर पणि उपसा तहसीलदार साहेबांनी बंद केला या कामासाठी मला डॉ संजय खर्डे पा. यांनी मोलाची साथ दिली. हे मि कधीच विसरू शकनार नाही.
त्यांच्या सरपंच पदाच्या कार्य काळात त्यांनी अनेक वर्षा पासून थकलेली पाणिपट्टी व घरपट्टी वसुली साठी 20 % सवलत दिली ते साल होते 2012 त्या वेळेस खुप चांगला प्रतिसाद त्या योजनेला मिळाला व ग्रामपंचायतीची चांगली वसुली झाली.
गावच्या पिण्याच्या पाण्याबाबातीत त्यांचे नियोजन खुपच चांगले होते वेळ प्रसंगी स्वःता कितीही रात्र झाली तरी स्वःता उभे राहून ते काम करून घेत होते.
त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे गावात अजून देखील नाव घेतले जाते. असे एक ना अनेक कामे त्यांच्या कार्य काळात झाले.
आज ते आपल्यात नाही परंतु त्यांच्या कामाच्या रूपाने त्यांनि घेतलेले धडाडीचे निर्णय या मुळे ते कायमच स्मरनात राहतील.
संत कबीरने अपणे दोहेमे ऐसा कहाँ है! कि जब बच्चा जन्म लेता है! तो सारे खुशी मनाते है ! मिठाई बाटी जाति है! सारे हँसते है !
कबिर आगे कहते है ! मगर जनम और मृत्यु के बिच तु ऐैसा काम कर के तेरे जाने के बाद सारी दुनिया रोये और तेरी लाश हँसे.
असेच आज माझे मित्र व कोल्हारचे माजी सरपंच डॉ. संजय खर्डे पा. यांच्या बाबतीत म्हणावे वाटते.
मि दिवंगत कॉम्रेड भिमाशंकर पानसरे कुटूंबीयांच्या वतीने त्यांच्या स्मृतिस क्रांतीकारी अभिवादन करतो अखेरच्या लाल सलाम करतो.

कॉम्रेड. सुरेश भिमाशंकर पानसरे
सेक्रेटरी भारतिय कम्युनिस्ट पक्ष.
राहाता तालुका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...