गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

श्री. एकनाथराव ढाकणे सो. यांना केंब्रिज डिजिटल विद्यापीठाची मानद डॉक्टरेट जाहीर

 श्री. एकनाथराव ढाकणे सो. यांना केंब्रिज डिजिटल विद्यापीठाची मानद  डॉक्टरेट जाहीर :-

       

 
      महाराष्ट्रातील  नावाजलेला ग्रामसेवा संदेश या  दिवाळी अंकाचे संपादक , महाराष्ट्रातील ग्रामसेवकांचे राज्याचे अध्यक्ष तथा इंजिनिअरिंग कॉलेज क्षेत्रातील  नावाजलेल्या ढाकणे एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. एकनाथराव ढाकणे यांना  जगभरातील प्रसिद्ध अश्या इंग्लंडमधील  केंब्रिज डिजिटल विद्यापीठाची अतिशय सन्मानाची अशी मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे. सदरचे पत्र मिळताच ढाकणे एज्युकेशन संस्थेच्या सर्व कॉलेजमध्ये  फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
                श्रीमान एकनाथराव ढाकणे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी, जनतेच्या गरजेनुसार जास्तीत जास्त सेवा देतांना त्यांनी आतापर्यंत उच्चांकी काम केले आहे. स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे राबविलीच पण शासनाच्या  स्वच्छता अभियान संदर्भात  बांगला देश दौऱ्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.  ऊसतोड मजुरांच्या दुष्काळग्रस्त परिसरात इंजिनीरिंग कॉलेजेस उभारून ग्रामीण भागातील जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. यामधून हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेवून स्वतः च्या पायावर उभी राहिली आहे. याचबरोबर या दुष्काळी भागात आरोग्याचे विविध कॅम्प घेवून आरोग्य सेवा पुरविल्या आहेत. राज्य, राष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागातील  खेळाडू जाण्यासाठी  मुलांमध्ये विविध  खेळांच्या स्पर्धा वारंवार भरविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचबरोबर वंजारी समाजाचे उत्थानासाठी त्यांची वंजारी समाजाचे राष्ट्रीय जयंती उत्सव समितीवर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवड ही जाहीर झाली आहे. 
                  ढाकणे साहेबांच्या या सर्व  विविध कार्याची दखल  विश्र्वस्तरावर घेतली जावून  केंब्रिज डिजिटल विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देण्याचे घोषित केले आहे. सदरचा दीक्षांत समारोह दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गोवा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 
                       त्यांना घोषित झालेल्या मानद डॉक्टरेट बद्दल ग्रामसेवा संदेश साहित्य परिवार, राष्ट्रीय जयंती उत्सव राष्ट्रीय व  राज्यस्तरावरील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवक बांधव, ढाकणे एज्युकेशन संस्थेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, तसेच अहमदनगर जिल्हा  ग्रामसेवकांची पतसंस्थेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, ग्रामसेवक संघटना DNE 136 अहमदनगर जिल्हा  यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...