साई योग फाउंडेशनच्या मतदार जनजागृती सायकल रॅलीस उदंड प्रतिसाद ...
२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान अंतर्गत राहाता येथील साईयोग फाउंडेशनच्या पुढाकाराने राहाता नगरपालिका,गुड मॉर्निंग ग्रुप व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी विधानसभा मतदार संधाचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे सायकल रॅली काढण्यात आली.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला.विरभद्र मंदिर येथून निघालेली सायकल रॅली गळवंती मार्गाने नवनाथ मंदिर ,ग्रामीण रुग्णालय पासून नगर मनमाड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल समाप्त झाली.तहसीलदार अमोल मोरे,मुख्याधिकारी वैभव लोंढे,पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे तसेच, बाळासाहेब सोनवणे, आदी मान्यवरांच्या प्रमुख सहभाग होता.सायकलला लावलेले पोस्टर व दिलेल्या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
समारोप प्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.गुड मॉर्निंग ग्रुपचे प्रमुख अरुण मोकळ यांनी लोकशाहीचे महत्व विषद करत त्यासाठी मतदान करणे किती गरजेचे आहे ते नमूद केले.तहसीलदार अमोल मोरे व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनीही मतदान करण्याचे आवाहन केले.प्राथमिक शिक्षक प्रविण खंडिझोड यांनी आपल्या कवितेतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.पत्रकार रामभाऊ लोंढे यांनीही लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार वापर करण्याचे आवाहन केले.निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सलिमाठ यांनी दिलेले ७५ टक्के उद्दिष्ट पेक्षा जास्त मतदान घडावून आणण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी नायब तहसिलदार हेमंत पाटील,माहिती अधिकारी सुरेश पाटील,गोरखनाथ दंडवते, दत्तात्रय धनवटे,विलास वाळेकर,भाऊसाहेब बनकर,सर्जेराव मते,सुनील सदाफळ,डॉ.दत्ता कानडे,नामदेव गवते,राजू वायकर,उमेश लुटे,बबलू फटांगरे,व्यंकटेश अहिरे,अनिल सातव,संजय वाघमारे,संजय बाबर,नारायण गाडेकर,राजेंद्र बांगर,संदीप डांगे,रंगनाथ सदाफळ,संदीप जेजुरकर,संतोष बावके,दीपक दंडवते,सिताराम बावके,भागवत वाघमारे,दास कुंभकर्ण,शिवाजी पोटे,अरविंद बावके,केतन कुंभकर्ण,अंकुश गांधी,प्रणव लावर,पंढरीनाथ काकडे,रवी मखाना,पंकज पिपाडा,सदानंद पिपाडा,साईशा चव्हाण,अर्जुन चव्हाण,वेदांत लोंढे,साईश लोंढे,देविदास नागरे,मारुती गायकवाड,अरुण मोकळ,यशवंत आंबेकर,अनिल पवार,सुनील गायकवाड,सचिन बनकर,रामदास काळोखे,बबन कोकाटे,प्रवीण कदम,विनय गिरी,वैभव गोसावी,प्रवीण खंडीजवळ,ज्ञानेश्वर देवरे,सचिन बनकर,सुरेश गाडेकर,परमेश चव्हाण,सागर साळवे,गोरख कदम,संजय शितोळे,मोहसीन शेख,वीरेश रुणवाल,साई गायकवाड,कैलास सदाफळ,अनिल कुंभकर्ण,अनिल पवार,निलेश थोरात तसेच राहता नगरपालिकेचे आरोग्य लिपीक रवी बोठे, स्वच्छता निरीक्षक राहुल खलीपे,अग्निशमन प्रमुख अशोक साठे,लेखापाल अविनाश सा,केशव बोठे,शेख,कुणाल वारुळे,दिलीप दुशिंग,संजय देव्हारे,प्रवीण पगारे,योगेश वैराळ सागर वर्पे,संजय गोयर,अनिल कुंभकर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा