शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

केलवड स्वामी समर्थ सेवा केंद्राचे लोकार्पण

 केलवड स्वामी समर्थ सेवा केंद्राचे लोकार्पण 



 राहाता :-
       राहाता तालुक्यातील केलवड गावात नवीन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुवारी विधिवत पूजा, आरती व सेवा करून सेवेकरी व ग्रामस्थांना सेवेसाठी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहेत .
        गुरुवारी औदुंबर मुंज, मंडल पूजन व वास्तुशांती सेवेक-यांच्या  व जोडपेंच्या सहकार्याने करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यानंतर शुक्रवारी श्रींच्या मूर्तीचे पूजन, महाअभिषेक व महाआरती संपन्न झाली . त्यानंतर स्वामी समर्थ सेवेकरी संतोष जाधव यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले . मार्गदर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
         केंद्रातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून १२ जानेवारी २०२२ रोजी नवीन स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते त्यानंतर सेवेकरी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा केली तर दिल्ली येथील साई भक्त मंडळ व गावातील अनेक ग्रामस्थांनी मोठी वर्गणी दिली, तसेच अनेकांनी मदत करून केंद्रासाठी भरघोस वर्गणी जमा झाली, सर्वांच्या सहकार्याने अतिशय छान असे नवीन श्री स्वामी समर्थ केंद्र सेवेसाठी सुरू झाले आहे.  शहा कारवाडी येथील नावाजलेले स्वामी समर्थ सेवेकरी तथा मार्गदर्शक संतोष जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन ग्रामस्थांना ऐकण्यास मिळाले. केलवड स्वामी समर्थ केंद्राची स्थापना २१ मे २००० रोजी गावातील मारुती मंदिरात झाली त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत तर नंतर केंद्राच्या मालकीच्या जागेत केंद्राची स्थापना झाली.  तेव्हापासून आजपर्यंत रोज सकाळी महाराजांना अभिषेक व संध्याकाळची आरती अशा पद्धतीने महाराजांची रोज नित्यनियमानी सेवा केली जाते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...