सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

साईयोग फाउंडेशन द्वारे नारायण गाडेकर सन्मानित

 साईयोग फाउंडेशन द्वारे नारायण गाडेकर सन्मानित 



साईयोग फाउंडेशन राहाता चे जेष्ठ सदस्य व शारदा इंग्लिश स्कूल कोपरगाव चे जेष्ठ विज्ञान शिक्षक नारायण गाडेकर यांना मागील आठवड्यात जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने कृतिशील विज्ञान अध्यापक पुरस्कार पटेल मंगल कार्यालय अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यानिमित्त आज साईयोग फाउंडेशनच्या वतीने जेष्ठ सदस्या सौ.सुश्मिता परमेश चव्हाण यांच्या हस्ते गाडेकर यांचा श्रीसाई शाल व पुष्पगुच्छ देवून हृदय सत्कार करण्यात आला.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ मार्गदर्शक व पायरंस विज्ञान केंद्र बाभळेश्वर चे जेष्ठ वैज्ञानिक भरत दवंगे यांनी मनोगत व्यक्त करतांना नारायण गाडेकर यांच्या कार्याचा गौरव करत ते साईयोग फाऊंडेशनचे सदस्य असल्याचा अभिमान असल्याचे नमूद केले.ते म्हणाले नारायण गाडेकर गेली १८ वर्षांपासून शारदा इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक क्षेत्राचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे.श्री स्वामी समर्थ केंद्र राहता अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये ते अग्रेसर असतात. संस्कृत विषयाचे देखील ते गाढे अभ्यासक आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक विद्यार्थी विविध सरकारी निमसरकारी कार्यालयात उच्च पदावर कार्यरत आहेत.त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नारायण गाडेकर म्हणाले साईयोग फाउंडेशन द्वारे राबवित येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी झाल्यामुळे निर्माण झालेल्या निस्वार्थ व समर्पित भावनेचे प्रतीक हा पुरस्कार आहे.सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी प्रास्ताविक करून शेवटी सर्वांचे आभार मानले.यावेळी साई योग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य व लायन्स क्लब राहाता चे संस्थापक अध्यक्ष दिपक दंडवते यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी साई योग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,ॲड गोरखनाथ दंडवते,भाऊसाहेब बनकर,संजय बाबर, विष्णु गाडेकर,संजय वाघमारे,बबलू फटांगरे,प्रकाश पुंड,रंगनाथ सदाफळ,सिताराम बावके,बाळासाहेब तारगे,सुश्मिता चव्हाण,दशरथ तुपे,रविंद्र धस आदी मान्यवर उपस्थित होते.



दहशत कुठे आहे एकदा तुलना होऊन जाऊ द्या - आमदार बाळासाहेब थोरात


धांदरफळ येथील घटनेला तुम्हीच जबाबदार आहात - आमदार बाळासाहेब थोरात


दहशत कुठे आहे एकदा तुलना होऊन जाऊ द्या - आमदार बाळासाहेब थोरात


प्रवरेची वाघीण विधानसभेत गरजणार -  खा.निलेश लंके


प्रवरा परिसरातील दहशत कायमस्वरूपी संपवा  - खा.निलेश लंके

लोणी खुर्द येथील सभेतून आ.थोरात व खा.लंके यांचा हल्लाबोल

राहता ( प्रतिनिधी )

     धांदरफळ खुर्द येथील डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यावर झालेली टीका ही एकटीवर नसून तमाम माता भगिनींवर आहे. ज्यांनी टीका केली ते यांचा पट्टा बांधून फिरत आहेत. ते बोलताना तुम्ही टाळ्या वाजवत होता. नेत्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे समोरील लोक टाळ्या वाजवतात या घटनेला तुम्हीच जबाबदार असून दहशत खरी राहता तालुक्यात आहे .एक वेळ विकासाबाबत आणि दहशतीबाबत तुलना होऊन जाऊ द्या असे खुले आवाहन काँग्रेस  पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून राहता परिसरातील दहशत कायमस्वरूपी गाडा  असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले आहे.

लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर परिसरात सौ प्रभावती ताई घोगरे यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा.निलेश लंके, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.प्रभावती ताई घोगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड.नारायण कारले, सरपंच जनार्दन घोगरे,राजेंद्र घोगरे, विजय दंडवते, शीतल लहारे,सचिन चौगुले,सुधीर म्हस्के,सिमोन जगताप, गणपतराव सांगळे, उत्तम आहेर,सौ. लताताई डांगे, राजेंद्र घोगरे, डॉ.एकनाथ गोंदकर, राजेंद्र निर्मळ चंद्रभान धनवटे, शिवसेनेचे सुहास वहाडणे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या राज्याचे लक्ष हे संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आनंद निर्माण करण्यासाठी ही लढाई आहे. धांदरफळ येथील सभेमध्ये वसंत देशमुख वाईट बोलला. त्याने डॉ.जयश्रीताई थोरात यांचा अपमान केला तेव्हा ते टाळ्या वाजवत होते म्हणून या घटनेला तुम्ही जबाबदार आहात.

तुम्ही वसंत देशमुखला म्हणतात आमचे नेते, तुम्हाला वेळ कमी पडला पुढे वेळ वाढून देतो, ही कोणती प्रवृत्ती आहे. महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या तुमच्या प्रवृत्तीला आमच्या महीलांनी जाब विचारला तर तुम्ही पळून गेला. त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांना विसरले. तुम्ही मर्द होता तर का लपून पळाले आणि त्या सभेमध्ये स्थानिक कुणीही नव्हते सगळे राहता मतदार संघातील मंडळी होती.

अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली. पण जयाताई रडली नाही. संगमनेर तालुका चळवळीचा आहे. रागावत नाही आणि रागावला तर काय होते हे तुम्ही पाहिले आहे. संगमनेरच्या नादाला लागू नका. अंभोरे येथील सभेत नाटकी भाषणे सर्वांनी पाहिली आहेत. दहशतीचे आरोप आमच्यावर करतात खरी दहशत कुठे आहे एकदा जनतेच्या न्यायालयात समोरासमोर होऊन जाऊ द्या असे आव्हान देताना तुम्ही विरोधी बोलले म्हणून अनेकांची हातपाय मोडले. अगदी फ्लेक्स सुद्धा लावू दिले जात नाही इतकी तुमची दहशत आहे.

संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे परंतु तेथील साखर कारखाना, दूध संघ, गाव पातळीवरील संस्था या सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही चालवतो.वेगवेगळ्या समाजाला संधी दिल्या. मानाची पदे दिली. अगदी तुम्हाला दोन वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिले. तुम्ही कृतघ्न निघालात. जिकडे सत्ता तिकडे तुम्ही जाता सत्तेसाठी काही पण अशी तुमची वृत्ती आहे.

महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी मी वाटल्या. निळवंडे धरण पूर्ण करून पाणी मी आणले तुम्ही फक्त पाणी सोडले अगदी ज्यांनी या कामात मदत केली त्या ज्येष्ठ नेते पिचड साहेबांना तुम्ही धरणावर सुद्धा नेले नाही अरे हा किती कृतघ्नपणा आहे.

संगमनेर तालुक्यातील विरोधक सुद्धा आमचा आदर करतात. आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. गणेश कारखाना आम्ही चांगला चालवला ३००० रुपये भाव दिला तुम्ही प्रवारानगर कारखान्यात मागील दहा वर्ष काय भाव दिला ते जनतेला सांगा असे सांगताना मी डॉ.जयश्रीताई चा बाप आहे तसा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे हे विसरू नका असा इशारा त्यांनी दिला.

तर खा.निलेश लंके म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांना ओळखले जात आहे.प्रवरा परिसरात त्यांची मोठी दहशत आहे. ही दहशत कायमची काढण्यासाठी सर्वांनी प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांची यंत्रणा ही फुटीर आहे. या प्रवृत्तींचे विचार घाणेरडे आहेत. हे कसले टायगर. मांजरीने वाघाचे कातडे पांगरले म्हणून टायगर कोणी होत नाही. 23 नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे तेव्हा प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका. दडपशाही करू नका अन्यथा उलटी गिनती आम्ही करू शकतो. खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांचे संस्कार आमच्यावर आहेत म्हणून विनंती करतो की वाईट वागू नका.

तर सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, या परिसरातील हुकूमशाही संपवण्यासाठी मी गृहिणी उभी आहे. हे लोक संगमनेर मध्ये जाऊन ओरडून भाषणे करतात.पण इथे किती दहशत आहे.ती या सामान्य जनतेला विचारा सरकार लाडक्या बहिणी म्हणते. मात्र या बहिणीची सुरक्षितता सरकार करत नाही. या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्वांनी आशीर्वाद द्या शेतकऱ्याची लेक, भिडणार थेट असे म्हणून त्यांनी विखे यांना आव्हान दिले.

तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये यावेळी परिवर्तन नक्की होणार आहे. तर मा.आमदार डॉ.तांबे म्हणाले की, राज्यातील तमाम महिला भगिनींनी महाविकास आघाडीला साथ देत महिला व बालिका यांना असुरक्षित करणाऱ्या महायुतीला पराभूत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
राहता तालुका दहशत मुक्त करून स्वतंत्र व समृद्ध करू
साठ वर्षांमध्ये मंत्री, खासदार, आमदार ही सर्व पदे असताना नगर मनमाड रस्ता करता आला नाही .निवडणुका जवळ आल्या की अगदी डांबरावर सुद्धा मुरूम टाकतात. असे सांगताना एमआयडीसी ही फक्त निवडणुकीसाठी आहे. आयटी पार्क हवेत विरला आहे. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सर्वसामान्य माणूस महाविकास आघाडी सोबत असून राहता तालुका दहशतमुक्त करून येथे सर्वांना स्वातंत्र्य व समृद्धीचे जीवन जगता येईल असे वातावरण निर्माण करावयाचे असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले

निधन वार्ता

निधन वार्ता 




भावपूर्ण श्रद्धांजली


कै.किरण भिकाजी लबडे
मृत्यु - बुधवार दिनांक 23-10-2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 01-11-2024 रोजी गणपती घाट राहुरी, तालुका - राहुरी, जिल्हा - अहील्यानगर येथे होणार आहे.
 आई, पत्नी, 1मुलगा, 1 बहीण, भाऊ, भावजई, पुतणी, पुतणे तसेच बापूसाहेब लक्ष्मण जोरे राहणार एकरुखे  , तालुका - राहता , जिल्हा - अहिल्यानगर यांचे ते मेहुणे होते   व 
*प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश भिकाजी लबडे यांचे मोठे बंधू होते

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

राहता येथे महाविकास आघाडीचा मेळावा ...

राहता येथे महाविकास आघाडीचा मेळावा ...


 राहाता 


 गणेश साखर कारखाना , राहुरी साखर कारखाना ,श्रीरामपूर दूध जिल्हा संघ अशा चांगल्या चालणाऱ्या संस्था यांनी बंद पाडल्या. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक पक्ष बदलले. परंतु गणेश कारखाना निवडणूक व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आपण यांच्या दहशतीचे झाकण उडवले आहे. आता उर्वरित दहशत संपविण्याची काम या निवडणुकीत सर्वांनी मिळून करायचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजीमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केली



शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्या त आमदार थोरात बोलत होते. या मेळाव्यात कृषीभूषण व लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी  भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे,  जयंत वाघ, गणेशचे माजी अध्यक्ष एड. नारायणराव कार्ले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, संजय शिंदे, निळवंडे कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, लताताई डांगे, राजेंद्र निर्मळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


यावेळी मार्गदर्शन करताना  थोरात म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखाना, राहुरी कारखाना व बाभळेश्वर दूध संघ यासारख्या चांगल्या संस्था का बंद पडल्या ? स्वतःच्या फायद्यासाठी विरोधकांनी पक्ष बदलले.  चांगल्या चाललेल्या सहकारी संस्था मोडकळीस आणल्या; परंतु यावेळेस परिवर्तन नक्कीच होणार आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील महायुतीच्या सरकारला धडा शिकवून महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. शिर्डी मतदार संघातील जनतेला गुलामी व दहशतीच्या राजकारणातून मुक्त करायचे आहे. 


संगमनेर तालुक्यात आम्ही कधीही विरोधकांना त्रास दिला नाही. विरोधकांच्या संस्थांनाही कधी आडकाठी घातली नाही. संगमनेर तालुका कधीही दहशतीखाली नव्हता आणि राहणार नाही. आम्ही राजकारणाला राजकारणाच्या जागेवर ठेवतो. विनाकारण कुणाला वेठीस धरणे आम्हाला जमत नाही. असे सांगून आमदार थोरात पुढे म्हणाले, आज विरोधक शिर्डीला एमआयडीसी करणार असे सांगतात परंतु त्यांच्याच कुटुंबाकडे मागील साठ वर्षे सत्ता होती. आजोबा खासदार, तुम्ही आमदार, मंत्री होते मग का एमआयडीसी झाली नाही ? आयटी पार्कच्या आश्वासनाचे काय झाले. नगर दक्षिण मतदार संघात जर त्यांचे इतके मोठे काम होते तर तेथील जनतेने लोकसभेत यांना का नाकारले? याचे चिंतन विरोधकांनी कुठेतरी केले पाहिजे. 


नगर मनमाड रोड किती वर्ष नादुरुस्त आहे.अपघातात अनेक प्रवासी अपंग झाले तर अनेक जण प्राणास मुकले. याला जबाबदार कोण? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार का पळून जायचे त्यांना कोणाचा त्रास होता? 

महाराष्ट्र शेती महामंडळाची जमीन मी महसूल मंत्री असताना वाटप करून दिली ते काम ६० वर्षे प्रलंबित होते. या कामातही आडवा आडवी झाली. 

या भागाला निळवंडे धरणाचे पाणी आले आहे. त्यामुळे आता समृद्धी आली आहे. निळवंडे धरण व कालव्याच्या कामात यांची कवडीची ही मदत नाही. उलट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर यांनी लाठीचार्ज केला. यांनी राबवलेले वाळू धोरण सपशेल फसले आहे. जमीन व्यवहारात किती भ्रष्टाचार आहे हे जनतेला समजले आहे असे थोरात यांनी म्हटले आहे 

याप्रसंगी भाऊसाहेब वाकचौरे,  डॉ. तांबे, एड. नारायणराव कार्ले, प्रभाताई घोगरे, संजय शिंदे आदींची भाषणे झाली




आयटक संघटनेच्या क्रियाशिल सदस्य सौ ज्योती थोरात ( पडोळकर ) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराच्या तिव्रधक्याने आपली सेवा बजावत असताना दुःखद निधन झाले आहे.


 

  आयटक संघटनेच्या क्रियाशिल सदस्य सौ ज्योती थोरात ( पडोळकर ) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराच्या तिव्रधक्याने आपली सेवा बजावत असताना दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंतविधी आज सायंकाळी पाच वाजता वैकुंठद्वार स्मशानभुमी कोल्हार बु | मारुती मंदीरा जवळ होनार आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनच्या दुःखात राहाता तालुका आशा कर्मचारी. संघटना
प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हार
तालुका आरोग्य विभाग राहाता. 
गट प्रवर्तक भगीनी सर्व सहभागी आहोत. या प्रसगी आशा कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य अधिकारी डॉ. निलेश पारखे यांनी श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी कोल्हार मधील आशा कर्मचारी आशा सुपरवायझर आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थीत होते.
अहिल्यानगर आशा कर्मचारी संघटना अहिल्यानगर.


शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

कृषी क्षेत्र हे परिपूर्ण विज्ञान आहे... प्रशांत नाईकवाडी


कृषी क्षेत्र हे परिपूर्ण  विज्ञान आहे... प्रशांत नाईकवाडी

लोहगाव
कृषी क्षेत्र हे परिपूर्ण विज्ञान आहे. या ठिकाणी ज्ञान दानाचे  काम अतिशय स्तुत्य असते. असे विचार कृषीभूषण पुरस्कार विजेते व सेंद्रिय शेती राज्य सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी व्यक्त केली. 
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे गुरुकृपा ॲग्रो ट्रेडर्स यांच्या संकल्पनेतून रब्बी हंगाम शेतकरी बंधू स्नेहसंमेलन व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच बाबासाहेब भाऊराव चेचरे यांच्या वस्तीवर संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुलजी पवळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज. बळीराजाची प्रतिमा  व स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.    
 प्रमुख पाहुण्यांच्या यावेळी सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रशांत नाईकवाडी  म्हणाले की आज शेतकऱ्यांची परिस्थिती फार भयंकर आहे. अस्मानी संकट मातीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्य देखील बिघडत चाललेले आहे. मातीचा सामो हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. मातीचा सामो हा सहा ते सात पर्यंत पाहिजे परंतु तो आता आठ पर्यंत पोहोचल्यामुळे . क्षारयुक्त जमीन प्रमाण वाढले कीड व रोगाचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेले आहे. जमिनीत अन्नद्रव्य टिकून ठेवण्याची कॅपिशिटी आता फार कमी झालेले आहे .आज आपण प्रचंड रासायनिक खते टाकतो. किड व आळी मारण्यासाठी आपण अतिशय घातक विषारी औषधे फवारणी करतो त्यामुळे पिकांवर पडलेली आळी मरते परंतु जी आळी पशुपक्षी खातात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात इजा होऊन तेही मृत्युमुखी पडतात ..त्यामुळे चिमण्या. माशांचे  प्रमाण व पशुपक्षी आज कमी होत चाललेली आहे .


त्याचे कारण की विषारी औषधी फवारणीमुळे पशु पक्षांप्रमाणे मानवालाही मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे. प्रत्येक नागरिकांना विषमुक्त अन्न मिळालेच पाहिजे हा त्याचा अधिकार आहे. आज विषारी औषधे फवारणी केलेले फळभाज्या आपण खाल्ल्या तर कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. 
२०२५ पर्यंत  याचे प्रमाण १२% पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .याला कारणीभूत कृषी रासायनीक खते व औषधे आहे. आता मातीच्या आरोग्याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी पदवीधर असणाऱ्या कडूनच रासायनिक खताची खरेदी आपण केली पाहिजे पिकांसाठी योग्य असे सल्ला  त्यांच्याकडून मिळतो व सेंद्रिय शेतीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होण्याची आज नितांत गरज आहे. 
सौ शैलेजा नावंदर म्हणाले की सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे ही काळाची गरज आहे. काळाची नव्हे तर देशाची व जगाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचा रिझल्ट हळूहळू मिळतो. परंतु आता आपल्याला रासायनिक शेतीचा पगडा आहे . जमीन ही आपली आई आहे तिच्याकडून पाहिजे तीतकेच घ्यायला. अति विषारी फवारणीमुळे शेती नापीक होत चाललेली आहे.  रासायनिक खते विषारी औषधे यामुळे  शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती उपजात ठेवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती केलीच पाहिजे‌ रासायनिक शेती मुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तुमच्या पुढील चार पिढ्यांना आपल्याला सजीव शेती आपल्याला द्यायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना सेंद्रिय शेतीच करावी लागेल. मी स्वतः ८०% पर्यंत सेंद्रिय शेतीच करते .पण फारच प्रॉब्लेम आला तरच कीटकनाशकाचा फवारणी करते. शेतीवरील खर्च आपणास कमी करायचा आहे. जर शेतीवरील खर्च वाढला तर होणाऱ्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती उत्पन्न मिळते पण त्याला फार हळूहळू रिझल्ट मिळतो असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी राहुलची पवळे .ऋषिकेश काळे .कैलास दिवटे .अनिल हारदे अनिकेत झावरे व प्रशांत उंबरकर यांनीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण चेचरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत  अक्षय चेचरे यांनी मानले.आभार प्रशांत उंबरकर यांनी मानले.

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन...




चांगल्या कार्यासाठी ईश्वरी शक्ती पाठीशी सदैव उभी राहते.... गोरक्षनाथ गाडिलकर...



शिर्डी प्रतिनिधी  
स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,
संवर्धन, शिरडी परिक्रमा, पर्यावरणपूरक गणपती,विषमुक्त भाजीपाला, परिक्रमा प्रेरणास्थळांची विषयावर सातत्याने दहा वर्ष काम करणे तप पुरतीकडे वाटचाल आहे. या कमी निश्चितपणे आपल्या पाठीशी ईश्वरी शक्ती आहे. चांगले सामाजिक काम करताना आपल्याला त्रास होतो. परंतु टीकाकारांची परवा न करता आपण सातत्य ठेवलं पाहिजे. चांगले कार्य करत रहा. समाज नक्कीच पाठीशी उभा राहतो. ग्रीन अँड क्लीन शिर्डी या सामाजिक संस्थेचा दशक वृत्ते सोहळा शिर्डी बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवून पार पडला. याप्रसंगी श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यावेळी वरील प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात केले.
 गेले दहा वर्षापासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन प्रमाणे विविध सामाजिक समाज उपयोगी उपक्रम अविरतपणे करत आहे. शिर्डी शहर व परिसरात 11000 वृक्ष लावून त्यांचे संवर्धन देखील केले आहे. त्याचप्रमाणे शिर्डी परिक्रमा हा एक धार्मिक उत्सव गेल्या पाच वर्षापासून अतिशय धार्मिक व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा होत आहे. याप्रसंगी संस्थेचे प्रमुख अजित पारख यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. गेली दहा वर्षातील प्रवासादरम्यान  संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले. व्हीजन हाऊस कीपिंग व शिर्डी नगरपरिषद  आदी संस्थांनी सहभाग नोंदवला


 याप्रसंगी बस स्थानक बनकर साहेब सचिन सोमवंशी, सचिन तांबे, जितेंद्र शेळके संजय शिरडीकर अनिल शेजवळ डॉ. धनंजय जगताप, दिलीप जगताप, किशोर बोरावके, भारत चांदोरे, प्रा. रघुनाथ गोंदकर, प्रा. डॉ. विशाल तिडके,तुकाराम गोंदकर, प्रदीप बाफना, डॉ. दीपक जानी, गवारे साहेब, राजनीताई गोंदकर, ईश्वर तरकसे , किशोर तरकसे, नारायण जारडे, दर्शन वैद्य व लिओ ची टीम तसेच दीपक उत्तराधी यांची स्वच्छता कर्मचारी....    आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिलालजी पटेल व ताराचंद कोते यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

साईसंस्थान पतपेढी करणार सभासदांची दिवाळी गोड

साईसंस्थान पतपेढी करणार सभासदांची दिवाळी गोड


शिर्डी 

साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीतर्फे दिवाळीनिमित्त सभासदांना १५ टक्के डिव्हीडंट आणि ठेवीवर नऊ टक्के व्याज, असे मिळून दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम कामगारांना दिवाळी भेट स्वरूपात दिली जाईल. त्याचबरोबर भिंतीवर घड्याळ, पाच लिटर तेलाचा डबा, प्रत्येकी एक किलो फरसाण व एक किलो मिठाई, तसेच ५० किलो साखर देऊन संस्थेच्या सुमारे अठराशे सभासदांची दिवाळी गोड केली जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिली.

ते म्हणाले, येत्या गुरुवारी (ता.१७) साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, महंत रामगिरी महाराज व महंत काशिकानंद महाराज यांच्या उपस्थितीत दिवाळी भेट वितरणास प्रारंभ केला जाईल. संस्थेचे सभासद शिर्डी परिसरातील १५ ते २० गावांत वास्तव्यास आहेत. सभासदांच्या घरातील महिलांनी केलेल्या मागणीनुसार दिवाळी भेट वस्तू त्यांच्या गावापर्यंत पोहोच करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. साईसंस्थानच्या सहकार्यामुळे संस्थेला भाविकांसाठी विविध सेवा पुरवविण्याची संधी मिळते. त्यामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल दीडशे कोटी रुपयांपर्यंत वाढली. भाविकांना वाजवी दरात दर्जेदार वस्तू मिळाव्यात संचालक मंडळाने ठोस पावले उचलली.

पूर्वीच्या तुलनेत भाविकांसाठी दर्जेदार पेढा उपलब्ध करून देण्यात आला. संस्थेतर्फे साईतीर्थ नावाने लवकरच बाटलीबंद शुध्द पाणी विक्रीसाठी आणले जाईल. संस्थेच्या सर्व स्टॉलवर भाव फलक लावण्यात आले. तेथे लवकरच गुगल व फोन पेची सुविधा दिली जाईल. डिजिटल लॉकर सिस्टिम कार्यान्वित केली जाईल. डोळ्याद्वारे येथील लॉकर उघडले जातील आणि बंद ही केले जातील, त्यावर काम सुरू आहे. 

चौकट -
नवे संचालक मंडळ सत्तारूढ होऊन जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी झाला. याकाळात बरच महत्त्वाचे आणि पारदर्शी निर्णय घेतले. भाविकांना दर्जेदार सेवा आणि संस्थेच्या नफ्यात ही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते. गेल्या सहा महिन्यांत संस्थेने सुमारे चार 'कोटी रुपये नफा मिळविला. मागील काही वर्षांच्या तुलनेत तो जवळपास दुप्पट आहे.
-विठ्ठल पवार, अध्यक्ष, साईसंस्थान नोकरांची पतपेढी

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यात सहकाराचा मोठा वाटा - पराग संधान वसंतदादा मल्टीस्टेट कोपरगाव शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न

कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यात सहकाराचा मोठा वाटा - पराग संधान 
 वसंतदादा मल्टीस्टेट कोपरगाव शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी 

 सहकारी बँका व्यवसायिकांना वेळेवर अर्थसाहाय्य करतात म्हणून कोपरगाव शहरातील बाजारपेठ फुलविण्यात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे मत शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक, अमृतकेन शुगरचे चेअरमन पराग संधान यांनी व्यक्त केले. नुकताच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या कोपरगाव शाखेचा स्थलांतर सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक तर अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर उपस्थित होते.


वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त कोपरगाव शाखा नुकत्याच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या मुख्य बाजारपेठेत प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण पूजा केली. शहरातील अनेक प्रमुख मान्यवरांनी व ग्राहक सभासदांनी दिवसभर शाखेत भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. यावेळी बँकिंग निगडित संस्थेच्या सर्व डिजिटल सेवांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यानंतर संचालक मंडळाच्या वतीने शाखेतील कुशल कर्मचारी यांची मिटिंग घेऊन प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक सर्वश्री दीपक धट, किशोर परजणे, पुरुषोत्तम पगारे सर यांच्यासह प्रशांत होन, विष्णू पाडेकर, सतीश गुजराथी, रंजन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक गणेश वाळुंज, कर्जविभागप्रमुख अनिल कापसे, शाखा व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे, सहव्यवस्थापक आशुतोष शिंदे, कॅशिअर अक्षय लोखंडे, मदतनीस अमोल आदमने आदींनी मेहनत घेतली.

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहाता उपखंड यांचा विजयादशमी निमित्त कार्यक्रम आयोजित

राहता

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहाता उपखंड समितीच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दि.१३/१०/२०२४ रोजी संध्या. ठिक ४.३० वाजता साई विठ्ठला मंगल कार्यालय चितळी रोड राहाता येथे संघाच्या सहा मुख्य उत्सवापैकी एक विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आले आहे. उत्सवाचे स्वरूप हे पुढील प्रमाणे राहील.
मंगल कार्यालयातून सघोष पथ संचालन हे संपूर्ण राहाता शहरातून होईल व पुन्हा उत्सवाच्या ठिकाणी येतील त्यानंतर शस्त्र पूजन व शाखेवर होणारे खेळांचे प्रात्यक्षिक होतील.
   सदर विजयादशमी उत्सवासाठी प्रमूख अतिथी श्री मेघश्यामजी डांगे पाटील निवृत्त पोलिस निरीक्षक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व प्रमूख वक्ते म्हणून श्री प्रमोद जी कुलकर्णी नाशिक विभाग कार्यवाह,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी राहाता तालुक्यातील नागरिकांनी विजया दशमीच्या उत्सवास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहाता तालुका संघचालक श्री रावसाहेब मुरलीधर गोंदकर व राहाता उपखंड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

गावच्या प्रवेशद्वारा समोरून गावापर्यंत टाकण्यात आलेले डिव्हाडर काढून घेण्यात यावी ....माजी सरपंच गणेश चेचरे

    गावच्या प्रवेशद्वारा समोरून गावापर्यंत टाकण्यात आलेले डिव्हाडर काढून घेण्यात यावी ....माजी सरपंच गणेश चेचरे
तालुक्यातील लोहगाव येथील गावाच्या प्रवेशद्वारापासून तर गावापर्यंत जे डिव्हायडर टाकले आहे ते सर्वसामान्यांना मनस्ताप ठरत आहे.
तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायत  काढून घ्यावे अशी मागणी माजी सरपंच गणेश चेचरे यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायत डिव्हायडर टाकून रस्ता बनविला परंतु त्या रस्त्याच्या एका बाजूला  वाहतूक बंदच आहे . त्या बाजूने बेकायदेशीर काही माणसे वाहन उभी करतात तर काही बांधकाम साहित्य आणून टाकतात.
 त्यामुळे एका बाजूचा हा रस्ता  पूर्णपणे बंद आहे. 
त्यामुळे एका बाजूने सुरू असलेल्या रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे ह्या रस्त्यावरून गावांमध्ये शाळा व गावाचा एकमेव प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते शेतकरी वर्ग         दूध उत्पादक शेतकरी कामगार वर्ग सकाळी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते   रस्त्याने जात येत असल्यामुळे गावचा प्रमुख रस्त्यावरच   डिव्हायडर मुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायतने काढून रस्त्याला मोकळा श्वास निर्माण व्हावा आशा    मागणी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे ग्रामपंचायत सदस्य बळीराम चेचरे सोसायटी सदस्य किरण चेचरे माजी  सरपंच गणेश चेचरे.  गणपत चेचरे. यांनी केली आहे.

चौकट
डिव्हायडर मुळे अपघात होण्यास ची शक्यता नाकारता येत नाही. डिव्हायडर मुळे रस्ता झाला अरुंद वाहतुकीची कोंडी सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप
 डिव्हायडर झाल्यापासून एका बाजूचे रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद आहे


.चौकट...          युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पाटील हे लोहगाव येथील एका कार्यक्रमा निमित्त आले असतात त्यांच्या कानावर सदर डिव्हायरडचा विषय घातला असता त्यांनी सदर डिव्हायडर काढण्याच्या सूचना केलेल्या आहे.

चांगल्या कार्यास सहकार्य करने मानसांच्या जिवनात आनंद निर्माण करने हाच आपला. हेतु आहे आमदार- श्री बाळासाहेब थोरात

राहता 
चांगल्या कार्यास सहकार्य करने मानसांच्या जिवनात आनंद निर्माण करने हाच आपला. हेतु आहे
आमदार- श्री बाळासाहेब थोरात


चांगल्या कार्यास सहकार्य करणे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच आपला हेतू आहे.  बँकेच्या उद्घाटनाच्या  कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थिती आहे.  असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या राहता शाखेच्या उद्घाटन  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, गणेशचे माजी अध्यक्ष ऍड. नारायणराव कार्ले, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, डॉ. राजेंद्र पिपाडा, प्रभाताई घोगरे, लताताई डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष ऍड. नानासाहेब शिंदे, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, सुरेश थोरात, शिवाजीराव लहारे, सुरेंद्र खर्डे, विक्रांत दंडवते, भगवानराव टिळेकर, धनंजय गाडेकर यांच्यासह संजीवनी, गणेश व संगमनेर साखर कारखान्याचे संचालक, अमृतवाहिनी बँकेचे संचालक मंडळ ,परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 


यावेळी आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी सहकारी बँकेची उत्कृष्ट पद्धतीने वाटचाल सुरू असून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी बँकेकडे आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी ही बँक स्थापन केली. आज बँकेचा व्यवहारात खूप मोठी वाढ झाली असून एनपीए हा अत्यंत कमी आहे. बँकेचे कार्य हे अत्यंत उत्कृष्ट असून संगमनेर तालुक्याच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. संगमनेर साखर कारखाना, संगमनेर तालुका राजहंस दूध संघ, बाजार समिती, विविध सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था यांच्यामुळे संगमनेरचा सहकार हा राज्यात आदर्श ठरला आहे. मेडिकल, इंजीनियरिंग व  विविध कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आपले भविष्य घडवीत आहे . समृद्ध अर्थव्यवस्था संगमनेर तालुक्यामध्ये  निर्माण झाली आहे. आपल्या राजकारणाचा उद्देश हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच असून गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांची जीवनातील वाटचाल यशस्वी करणे हीच राजकीय भूमिका सातत्याने घेऊन वाटचाल सुरू आहे असे सांगून थोरात पुढे म्हणाले, पूर्वी गणेश कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती. परिसरात पेरूच्या बागांची समृद्धी होती. हजारो ट्रक भरून जात होत्या परंतु कालांतराने पाणी कमी झाले. परिस्थिती बदलली सभासदांनी कारखाना ताब्यात दिला परंतु आज गणेश कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याच्या कोणीही कर्ज पुरवठा करण्यास तयार नाही या सर्व आर्थिक अडचणीतून कारखान्याची वाटचाल सुरू आहे पहिल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक उतारा मिळवीत सव्वा दोन लाख टन उसाचे गाळप केले. येणाऱ्या गळीत हंगामात देखील आर्थिक अडचणींवर मात करून गणेश चांगले गाळप करेल असे त्यांनी सांगितले.



याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एड. नारायणराव कार्ले सुधाकरराव जोशी यांची देखील भाषणे झाली.शशीकांत लोळगे,सचिन चौगुले,ॲड. पंकज लोंढे,सचिन सदाफळ, गणेश सोमवंशी,शिमाॅन जगताप, राजेंद्र अग्रवाल, अनिल जगताप, बाबासाहेब डांगे, घोरपडे यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने हजर होते...*

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

शिरडी-
 प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला.

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

निळवंडे वितरण व्यवस्थेसाठी मोठा निधी - खासदार भाऊसाहेब वाकचौरे

निळवंडे वितरण व्यवस्थेसाठी मोठा निधी - खासदार भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी 

निळवंडे धरणाच्या कालव्याचे व पोटकालव्यांचे अस्तरीकरणाची कामे निधी अभावी रखडलेली होती, यासाठी जून - 2024 मध्ये शिर्डीचे महाविकास आघाडीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याला नुकतेच गोड फळ आले असून केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी नाबार्ड बँकेकडून 800 कोटीची आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे, त्यामुळे निळवंडे कालवा कृती समिती व लाभधारक शेतकरी यांनी समाधान व्यक्त करत जल्लोष केला आहे.



 सविस्तर वृत्त असे कि, उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी 14 जुलै रोजी 54 वर्षे उलटले आहे. दरम्यान हा प्रकल्प 7.93 कोटी वरून पाचव्या सु.प्र.मा. 5 हजार 177 कोटींवर गेला आहे. यात प्रारंभीपासून निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील कालवा कृती समितीने न्यायिक व आंदोलनात्मक पण महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या 17 पैकी 14 मान्यता मिळवून देण्यात 2014 पूर्वी अहम भूमिका निभावली होती. त्यानंतरच्या पुढील तीन मान्यता उच्च न्यायालयातून मिळवण्यात अड.अजित काळे यांच्या माध्यमातून समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे, गंगाधर राहाणे, विक्रांत काले यांच्यासह निळवंडे कालवा कृती समितीने यशस्वी निभावली आहे. आता मात्र हा कालवा अस्तरीकरणाची कामे पूर्ण न झाल्याने अडचणीत सापडला होता. त्यामुळे नव्याने 2024 मध्ये झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडून येताच तात्काळ प्रलंबित निळवंडे कामासाठी परत पाठपुरावा सुरू केला आणि केंद्रीय जलसंधारण मंत्री श्री. पाटील यांच्यामार्फत नाबार्ड बँकेकडून रुपये ८०० कोटींची आर्थिक तरतूद करून घेतली आहे. त्यामुळे आता लवकरच निळवंडे क्षेत्रातील लाभधारकांना आपले हक्काचे पाणी मिळणार आहे.
 निळवंडी धरणाबाबत कायम राजकारण केले गेले असून खासदार वाकचौरे मात्र जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देत आले आहे. कुठल्याही श्रेयवादात न जाता हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात आणून दिली होती. त्यानंतर श्री. पाटील यांच्या सूचनेनुसार नाबार्डच्या केंद्रीय समितीने निळवंडे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली व तात्काळ अंतर्गत आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे निळवंडे प्रकल्पास आता निधीची चणचण भासणार नाही व कालव्याच्या अस्तरीकरणासह नलिका वितरण व्यवस्था पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, नानासाहेब गाढवे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, माजी अध्यक्ष गंगाधर गमे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी सदर निर्णयाचे स्वागत केले तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे राजेंद्र झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंद सिनगर, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे आणि काँग्रेसचे नितीन शिंदे आदींनी खा.वाकचौरे यांचे लाभधारक 

शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

ग्रीन फांऊंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी अमेयजी अग्रहारकर यांची निवड

ग्रीन फांऊंडेशनच्या छत्रपती  संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी अमेयजी अग्रहारकर यांची निवड

शिर्डी प्रतिनिधी : ,(संजय महाजन)


 छत्रपती संभाजीनगर- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाअध्यक्ष पदी सामाजिक कार्या मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे  अमेयजी अग्रहारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष अमित जगताप व सचिव प्रतिक कोळपे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. पर्यावरण संरक्षण करणे, जनजागृती करणे, वृक्ष लागवड करणे, वृक्षाचे संवर्धन करणे, एक कुंटूब, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्ष राबविणे. डोंगर परिसर,गायरान, शाळांमध्ये, महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन तसेच निंबंध स्पर्धा , वत्कत्व स्पर्धा,किल्ले स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संलक्षाणासाठी विविध उपाययोजना करणे,झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष चळवळ लोक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असे अमेयजी अग्रहारकर यांनी सांगितले

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

पुणे येथील राष्ट्रीय संघटन मंत्री राजेशजी अग्रवाल यांची राहाता येथे भेट

पुणे येथील राष्ट्रीय संघटन मंत्री राजेशजी अग्रवाल यांची राहाता येथे  भेट



राहता 
राहता येथील शैलेश अग्रवाल यांचे फर्म मध्ये पुणे येथील अग्रवाल समाज राष्ट्रीय संघटन मंत्री राजेशजी अग्रवाल यांनी भेट दिली. अहमदनगर जिल्ह्यातील अग्रवाल समाजाबद्दल विविध विषयावर चर्चा केली जिल्हाध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी अग्रवाल समाजाचे राज् न अग्रवाल, उमेश अग्रवाल , राहता येथील लायन्स क्लब चे  डॉक्टर उबाळे सर , पत्रकार ज्ञानेश्वर जोरे उपस्तीत होते. तसेच अग्रेसण जिल्हा अध्यक्ष अहमदनगर अग्रवाल समाज शैलेश अग्रवाल यांनी राजेशजी अग्रवाल व कार्यकर्त्यांचे आभार मानले


राहाता येथे अग्रवाल परिवार च्या वतीने महाराज अग्रसेन यांची जयंती साजरी

राहाता येथे  अग्रवाल परिवार च्या वतीने महाराज  अग्रसेन यांची जयंती साजरी 

राहाता 
     अश्विन शुद्ध शारदीय नवरात्री उत्सव,घट स्थापन, आणि अग्रवाल कुल संस्थापक महाराज अग्रसेन जी यांची  जयंती राहाता येथे साजरी केली गेली या वेळी अग्रवाल परिवार च्या वतीने,दीप प्रज्वलन करुन अग्रसेन महाराज यांचे पूजन आणि आरती केली गेली, प्रसाद वितरित् केला, या वेळी जिल्हा अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी  आपले मनोगत व्यक्त केले आज देशाला अग्रसेन महाराज यांचे विचार  खुप मार्गदर्शक ठरू 
शकता,आणि जेथे समाज खुप आहे तेथे जयंती खुप मोठ्या प्रमाणत साजरी केली जाते तसेच अग्रेसण महाराज यांची जयंती साजरी करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचले पाहिजे यासाठी अग्रवाल बंधुणी घराघरात जयंती साजरी केली पाहिजे, 



यावेळी  अग्रवाल परिवार, राजेश अग्रवाल, आशीष अग्रवाल, अमोल, अमित , शांतनु ,पानु ,सोनू, जिया, कमलेश, सरिता, दीपा 
,स्नेहल, राधा अग्रवाल उपस्थित होते


रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

सेवाधाम हाऊसिंग सोसायटी नवरात्र उत्सव आरती रमेश कुमावत व सौ आशा कुमावत यांच्या हस्ते

सेवाधाम हाऊसिंग सोसायटी नवरात्र उत्सव आरती रमेश कुमावत व सौ आशा कुमावत यांच्या हस्ते
शिर्डी प्रतिनिधी 

शिर्डी सेवा धाम हाउसिंग सोसायटी मित्र मंडळ कर्मचारी निमगाव शिर्डी नवरात्र उत्सव आजची आरती मान्यवर कॅन्टीन विभाग कर्मचारी रमेश कुमावत व सौ आशा कुमावत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मंडळाला साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व राष्ट्रवादीचे नेते निलेश दादा कोते यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी संदीप साळुंखे गणेश डोके करण मातंग अमोल सोनवणे वरून गायकवाड गौरव गायकवाड गणेश रोकडे व सेवाधाम हाउसिंग सोसायटीचे कर्मचारी बांधव व देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

साकुरी येथे बुद्धविहार इमारत बांधकामाचे भूमिपूजन

साकुरी येथे बुद्धविहार इमारत बांधकामाचे भूमिपूजन


राहाता, 
- राहाता तालुक्यातील सर्व गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 
राहाता तालुक्यातील साकुरी येथील बुद्धविहार इमारत बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , उप विभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, आर पि आय जिल्हा प्रमुख प्रदीप बनसोडे, ,सतीश बावके, स्वप्नील बावके,मोगलराव बनसोडे,सचिन बनसोडे,रावसाहेब बनसोडे,
मा.श्री.दिपकआबा रोहम  मा.श्री. रमेशभाऊ गायकवाड व मा.श्री.  युवा नेते मा.श्री.सुनीलभाऊ बनसोडे व साकुरी गाव चे माजी सरपंच  मा.श्री.सचिनभाऊ बनसोडे व मा.श्री.कानिफभाऊ बावके मा.श्री.लालाभाऊ बनसोडे  यांच्या प्रमुक उपस्तिती मधे नामदार.मा.श्री.संजयजी बनसोडे, नामदार.मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्तिती मध्ये कार्यक्रम ,संपन्न झाला, तसेच श्री.रमेशभाऊ गायकवाड यांनी आभार मानले

 श्री.विखे पाटील म्हणाले, साकुरी गावातील सर्व समाज मंदीर व सभागृहासाठी शासनाने ५० कोटी रूपये किंमतीच्या जमीनी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत‌. 
यावेळी बोलतांना क्रीडा श्री.बनसोडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मंत्र समाजाला दिला आहे. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे काम शासन करत आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसस्पर्श लाभलेल्या ठिकाणांवर आंतरराष्ट्रीय स्मारके करण्यासाठी शासन निधी‌ उपलब्ध करून देत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिकह् विकास कार्यक्रम २०२४-२५ च्या निधीतून साकुरी बुद्धविहाराच्या बांधकामाला निधी उपलब्ध झाला आहे.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

संगमनेर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी दगडू साळवे यांची नियुक्ती...

संगमनेर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी दगडू साळवे यांची नियुक्ती...


आश्वी (प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते. आमदार.बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे व गेले अनेक वर्ष आमदार थोरात यांच्या सोबत निष्ठेने  व प्रामाणिक काम करणारे दगडू साळवे यांच्या कामाचे दखल घेऊन नुकतीच आ.बाळासाहेब थोरात यांनी त्यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका कार्याध्यक्ष पदाचे नियुक्त पत्र देऊन त्यांचा सत्कार केला पुढेही जोमाने त्यांना काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली यावेळी समवेत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, युवक काँग्रेसचे आश्वी गटप्रमुख किशोर जोशी , विनोद गायकवाड, सोमनाथ जोशी,सुरेश कहार इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते  यांची उपस्थित होती
 यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जयश्री थोरात, राजहंस सहकारी  दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे आदींनी केले.

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

कोपरगाव ते नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार - खासदार भाऊसाहेब वाकचौरे

कोपरगाव ते नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार - खासदार भाऊसाहेब वाकचौरे


राहाता 
   शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिल्यानंतर गेल्या शंभर दिवसांत लोकसभेची दोन अधिवेशने झाली. त्यात विविध विषयांवर सत्तावीस प्रश्न विचारले. बिबट्यांनी उच्छाद मांडल्याने जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांच्या ग्रामीण भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. शिर्डी विमानतळ केंद्राकडे दिल्याशिवाय त्याचे रडगाणे संपणार नाही. कोपरगाव ते नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत, अशी माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्या शंभर दिवसांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकारांसमवेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सरस्वतीताई वाकचौरे व वसंतदादा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव शिनगर उपस्थित होते.

यावेळी खासदार वाकचौरे म्हणाले की, गोदावरी, प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक आहे. तेथे बिबट्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. संख्या वाढल्याने त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला. ग्रामीण भागात सायंकाळनंतर शेतकरी शेतात जाणे बंद झाले. बिबट्यांच्या हल्ल्यात बळींची संख्या वाढते आहे. लोक मोठ्या संख्येने या तक्रारी घेऊन आपल्याकडे येतात. हे बिबटे पकडून त्यांना संरक्षित जंगलात सोडणे गरजेचे आहे. दिवसागणिक हे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. शिर्डी विमानतळावरील विमानांचे तिकीट अन् शेजारच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील

विमानांचे तिकीट यात मोठी तफावत जाणवते. उडाण योजनेत शिडों विमानतळ सहभागी करून घ्यावे, तसेच हे विमानतळ केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करावे. यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. पुणतांबे ग्रामस्थांनी रेल्वेच्या प्रश्नाबाबत आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करीत
आहोत. कोपरगाव-झगडेफाटा - संगमनेर या महत्त्वाच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, पेन्शनर मंडळींच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम त्वरित मिळावी, पुणे ते संगमनेर- नाशिक व श्रीरामपूर ते गेवराई नियोजित रेल्वेमार्ग व्हावा. गेल्या पंचवीस वर्षांपासून सावळीविहीर ते नगर राष्ट्रीय महामार्गाचे रडगाणे अद्यापही सुरू आहे. याकडे आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधणार आहोत. पश्चिमेचे पाणी पूर्वेला गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला गती द्यावी. निळवंडे कालवे आणि वितरिकांची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध व्हावे या मागण्यांसाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली

वारकरी संप्रदायाचा प्रामाणिक वारसा जोपासणारे मुक्तछंदी मुक्त विद्यापीठ* . ह.भ.प.स्व. मुक्ता पाटील पानगव्हाणे

*वारकरी संप्रदायाचा प्रामाणिक वारसा जोपासणारे मुक्तछंदी मुक्त विद्यापीठ* .  
 *ह.भ.प.स्व.  मुक्ता पाटील* *पानगव्हाणे ---* 
 *जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव* 
          कोपरगाव तालुका पठारी प्रदेश संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती असून या परिसरात देव दैत्य, प्रभु रामचंद्र, मुनी वर्य शुक्राचार्य महाराज,श्री  साईबाबा,संत रामदासी महाराज श्री जंगलीदास माऊली संत जनार्दन स्वामी आदी हजारो संत, महात्मे, ऋषी मुनीं , समाज सुधारकांची कर्मभूमी आहे.  या प्रदेशातील दोनशे किलोमीटर अंतरात प्राचीन अर्वाचिन तीर्थक्षेत्रे,  पर्यटन स्थळे आहेत. 
            अशा पावन भुमीत धार्मिक रूढी परंपरेत भगवंत विठोबा रखुमाई भक्ती रसांचे बाळकडू लाभलेले मुक्ता पाटील पानगव्हाणे खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी मुक्तानंदी जिवन एकट्यानेच जगले नाही तर बिनधास्त  अनमोल जनसेवी मानवी जीवन कसे सर्वार्थाने हसतमुखाने जगायचे हे मुक्ता पाटील यांच्या सहवासात राहिल्यानंतर आमच्या सारख्या लाखो जनतेच्या आपोआप अंगवळणी पडले .
             कोपरगांव तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही तणावास ते स्वभाव गुणांमुळे बळी पडले नसल्याने त्यांच्या कपाळावर कधीच आठ्या पडल्या नाही तर ते रागानेच लालबुंद  झालेल्या माणसाला कधी हसवायला लावयाचे हे कधीच कोणाला कळत नव्हते नव्हते., 
    कोणत्याही चर्चेला अथवा उत्तराला बंधन नाही अशा ग्रामीण वळणावरील सतत पोट धरून मनमुराद हसवणाऱ्या
मुक्ता पाटील यांचा सर्व समावेशक स्वभाव, आबालवृद्धांशी सर्वांना आपले वय, प्रतिष्ठा विसरायला लावत  मोकळ्या संवादशैलीमुळे आपलेसे करण्याच्या हातोटीने ते  सर्वांचे मित्र, कौटुंबिक सदस्य बनले. चावडीवरील चर्चेच्या अघळपघळ गप्पा, राजकिय , सामाजिक, आर्थिक , कौटुंबिक, परिस्थितीवर सडेतोड,  पारदर्शक,मार्मिक, मार्गदर्शक निर्भिडतेतून मिळणारा  सहवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मानवी अळणी जीवनात मिळणारा मुक्ता  पाटील यांचा कौटुंबिक सहवास  आयुष्यभर पिडीत वंचित , खचलेल्या तणावात त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला  कायम मोफत विनासायास लाभला. कोणत्याही स्वरूपातील धार्मिक, सामाजिक,लग्न समारंभ, दशक्रिया विधी कार्यक्रम प्रसंगी ते हिरारीने धोतर खोचून सहभागी होतांना आपल्या मार्मिक, विनोद शैलीतील मुक्ताफळांनी या समारंभाला आगळयावेगळ्या उंचीवर नेतो.
     सर्व सामान्य माणसाला आनंदी ठेवणाऱ्या आणि  कोणत्याही तणाव व समस्येतून मुक्त करणाऱ्या धडाडीने  त्यांच्या जीवनातील आत्मियता, निस्वार्थी, नितळ तळमळीचा वैशिष्ट्यपूर्ण गुण सर्वसामान्यांच्या जीवनात कायम आनंद उधळीत राहिला. 
    मुक्ता पाटीलांची  खासियत अशी होती की आपल्या सत्तर वर्षांच्या जीवनात एकही आंदोलन, मोर्चा, सर्व सामान्य जनतेच्या समस्या वरील बैठका, विविध सभा सहकारी संस्था,  कारखान्यांच्या वार्षिक  सर्वसाधारण सभा , जाहीर सभा, पाट पाण्याचे आणि शेती समस्या   अथवा प्रश्नावरील चर्चा , शासन आयोजित बैठकात  कोणत्याही परवानगीची वाट न पाहता केवळ पोटतिडकीने ते मार्मिक , निर्भयतेने संबंधित चर्चेत आपली सडेतोड भाषणात दोषी अधिकारी, लोक प्रतिनिधी यांना जाब विचारून या समस्या सोडवण्यासाठी प्रवृत्त करीत यातून कधीच माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे, माजी मंत्री स्व .शंकरराव काळेसाहेब , आणि शंकरराव कोल्हे साहेब, माजी खासदार स्व. सुर्यभानजी वहाडणे साहेब, माजी विधानपरिषद माजी सभापती स्व. प्रा.ना.स.फरांदे, स्व‌.नामदेवरावपरजणेनामदार राधाकृष्ण विखे कधीच , आमदार खासदार मंत्री वरिष्ठ अधिकारी सुटले नाही. या नेत्यांना धारेवर धरल्याने अनेक वेळा टिंगल टवाळी, अपमानास्पद वागणूक मिळत असताना ते कधीच मागे हटले नाही.  फक्त जनसमस्यांचे प्रश्न  निस्वार्थी पणे  मांडत असल्याने ते  कायम सर्वांना  महत्वाचे  ठरले .                       आपल्या बालपणा 
पासून वारकरी संप्रदाय संस्कारातून त्यांनी दरवर्षाची पंढरपुरी वारी कधीच चुकवली नाही. याच पंढरपुरी वारीत  मनमाड येथील ह.भ.प.स्व. रामदास  कैकाडी महाराज यांचे पटशिष्य बनून प्रत्येक वारीचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातील. विविध कार्यालयांत जावून गावोगावी जाऊन ते ओळखीतील संपर्कातून वारी खर्चासाठोआर्थिक निधी दरवर्षी उभारण्यात त्यांनी न थकता सर्वस्व
पणाला लावले या कामात त्यांचेवर कधीच गैरसमज,गैर आरोपांच्या कलंकाचै डाग त्यांच्या बिगर निळीच्या,चुरगाळलेल्या कपड्यावर पडले नाही. पंढरीतील कैकाडी महाराज वारकरी संस्था नावारूपाला आणण्यात ते यशस्वी ठरले. याचमुळे अहिल्या नगर जिल्ह्यात व  पंढरपुरी ह.भ.प.रामदास कैकाडी महाराज पालखीने एक आगळे वेगळे स्थान निर्माण झाले. 
   आमच्या मातोश्री स्व.किरण देवी खेमचंद अग्रवाल यांना पंढरपुरी विठाई रूक्मिणी भेटीची ओढ जेष्ठ मराठी महिन्यांपासून  लागायची परंतु स्वतःच्या आरोग्य क्षमता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मुळे त्यांना पंढरपुरी कायम जाणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत त्या भर तळपते ऊन, पाऊस याची तमा न बाळगता नगर -मनमाड रोडवरुन पंढरपुरी जाणाऱ्या पालख्यातील व इतर वारकऱ्यांना तहानभूक लाडू,चहा, पिण्याच्या पाण्याची सोय करीत. याच सेवेतून स्व. रामदास कैकाडी महाराज,स्व. मुक्ता पाटील यांचा घरोबा वाढला. याचमुळे गेल्या 30 वर्षांपासून कोणत्याही स्वरूपात कोरोना काळ वगळता कधीच खंड न पाडता आजपर्यंत आमच्या अग्रवाल कुटुंबियांकडून स्वतःच्या घरी कोपरगांव तालुक्यातील वारकरी, सर्व जाती धर्माच्या सर्व स्तरातील जनसहभागातून स्व.कैकाडी महाराज पालखी सोहळ्यात रात्रीचा एक मुक्काम पार पाडला जातो. यामध्ये कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या तीन पिढ्यांतील सर्वं कुटुंबियांच्या सहभागातून पंढरपुरी वारीत एक दिवस रात्रीचा विसावा भजन कीर्तन सोहळ्याने पार पडतो याप्रसंगी स्व. मुक्ता पाटील यांचे सर्वाधिक सहकार्य कायम लाभले. 
  परमेश्वराने हा एक असा अवलिया जन्माला घातला की,
  एक निडर , बिनधास्त, निस्पृह, निरागस निगर्वी स्पष्टवक्तेपणा , कायमस्वरूपी कोणत्याही स्वरूपात राग लोभाची पर्वा न करता मैत्री मजबूत करीत जनसंपर्कात येणाऱ्याला आपलेसे करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकले नाही.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा माणूस राग, लोभ, अहंकार, द्वेष, संशयास्पद वर्तन, तणाव, मानापमान मुक्त  आदी थोर संत सगुण वारसा आयुष्य भर त्यांनी जोपासल्याने ते खऱ्या अर्थाने लोकमान्य ठरले व त्यांनी मुक्ता पाटील हे नाव सार्थ ठरविले अशा थोर व्यक्तींचे चरणी भावपूर्ण श्रद्धांजली !!! तसेच त्यांचा हा वारसा प्रामाणिकपणे त्यांचे चिरंजीव डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे व त्यांचे कुटुंबीय राहाता आणि शिर्डी परिसरात साईयोग फौंडेशनच्या वतीने चालवत आहेत त्यांच्या या महान कार्यात सर्व प्रकारचे पाठबळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
-- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न . नेत्रसेवा हीच साईसेवा

 साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर  संपन्न .  नेत्रसेवा हीच साईसेवा

शिर्डी प्रतिनिधी 

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने  सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री.डॉ प्रकाश पाटील व बंगलोर येथील डॉ. सौ. रेणुका व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
29 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 845 रुग्णांची मोफत तपासणी होऊन 70 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मुंबई येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच कल्याण, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , येवला, जालना, संगमनेर मालेगाव,जळगाव, श्रीरामपूर, नाशिक, नेवासा,राहाता, कोपरगाव,आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 6200 गरजू व वयोवृद्ध  रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत  550 पेशंट ची  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे  यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच  भारतात नावारूपास येत आहे. अशा  प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील व  24 नोव्हेंबर 2024 रोजी सुद्धा आठवे मोफत शिबीर आयोजित केले असून याचा फायदा देशातील अनेक  गरजूंनी घ्यावा असे आवाहन  ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील केले. 
कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांची रोजी-रोटी वाचविण्याचा आणि चुल कायमस्वरुपी पेटवण्याचा प्रामणिक प्रयत्न - डॉ.राजेंद्र पिपाडा

 शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांची रोजी-रोटी वाचविण्याचा आणि चुल कायमस्वरुपी पेटवण्याचा प्रामणिक प्रयत्न 
           
- डॉ.राजेंद्र पिपाडा

महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन



        शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांची रोजी-रोटी वाचविण्याचा आणि चुल कायमस्वरुपी पेटवण्याचा प्रामणिक प्रयत्न डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केला कुठलेही राजकारण अथवा श्रेयवाद घेण्यासाठी नव्हे तर सर्व सामान्य कुटुंबाविषयी असलेली तळमळ व त्यांच्या समस्यांची जाणिव यामुळे या लढ्याला त्यांनी न्यायालयात तसेच सतत शासन दरबारी मांडुन प्रसंगी आंदोलनाचे इशारे देवुन हा प्रश्न तळमळीने सोडविल्यामुळे पिपाडांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. अशी भावनीक प्रतिक्रिया कामगारांच्या परिवाराच्या वतीने दिपाली आहेर यांनी डॉ.राजेंद्र पिपाडा यांचा 598 कामगारांच्या वतीने सपत्नीक सत्कार करताना जाहीरपणे भाषणातुन व्यक्त केली.  
सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.राजेंद्र पिपाडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजिक केला होता. राहाता शहरातील व परिरातील सर्व महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.
       यावेळी राहाता शहरातुनच नव्हे तर परिसरातील सर्वच भागातुन महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या उत्साहाने हजेरी लावली होती. विषेष करुन संस्थानच्या कामगारांच्या गृहीणींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ब-याच वर्षांनंतर  कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने त्या महिलांमध्येही मोठे उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी आवर्जुन पिपाडा दाम्पत्याचा सत्कार कऱण्याची संधी सोडली नाही. त्यातील एका महिलेने आपले मनोगत व्यक्त केले अतिशय भावुन अंतकरणाने आपल्या भावना मांडताना ते महिला पुढे म्हणाली की,पिपाडा दाम्प्त्याने आमचा फुल न फुलाची पाकळी म्हणुन आमचा सत्कार स्विकारला याबद्दल आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत त्यांनी कर्मचा-यांच्या बाबतीत कधीही राजकारण केले नाही. त्यांचा कुटुंबाचा उदर निर्वाह चांगल्या पद्धतीने व्हावा व वर्षावुवर्षे या कामगारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक पणे प्रयत्न केले. आम्ही सर्वजण मानसिक खचलेलो असताना डॉ.राजेंद्र पिपाडांनी विश्वासाचा हात याकामगारांच्या पाठीवर ठेवला व त्यांना नेहमी प्रोत्साहीत कऱण्याचे काम केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुप वेळा त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले.
        डॉ.राजेंद्र पिपाडा यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ते बोलताना म्हणाले की, मी संस्थानच्या कामगारांचा प्रश्न सुटला आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले याचे आम्हाला खुप मोठे समाधान आहे. एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करुन 598 कामगारांच्या परिवारासह आमचा सत्कार सन्मान केला हे पाहुन भारावुन गेलो. महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिला येवु नये यासाठी विरोधकांची यंत्रणा संक्रिय होती त्यांचा  कार्यक्रम हानुन पाडण्याचा हा डाव नारीशक्तीने यशस्वी होवु दिला नाही.
        यावेळी सिने अभिनेता क्रांतिनाना माळेगावकर यांनी महिलांसाठी विविध मनोरंजणाचे कार्यक्रम घेतले विविध खेळ व स्पर्धा घेतल्या. महिलांनी हिरीहरीने सहभाग घेवुन बक्षिसे पटकावली. लकी ड्रॉच्या कुपनच्या माध्यमातुन विविध बक्षिसेही महिलांना मिळाले. असे नवनवीन उपक्रम आपण यापुढेही राबवत रहावा असा महिलांमधुन सुर आला. आ.प्रशांत बंब यांची कन्या व पिपाडा परिवाराच्या सुन श्रृती पिपाडा यांनी आलेल्या सर्व महिलांचे आभार व्यक्त करुन आपले मनोगत व्यक्त केले.



मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

रिपाई च्या उत्तर नगर जिल्हा संघटक पदी गणेश साळवे

रिपाई च्या उत्तर नगर जिल्हा संघटक पदी गणेश साळवे


शिर्डी प्रतिनिधी : 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगर जिल्हा संघटकपदी शिर्डी येथील गणेश साळवे यांची निवड करण्यात आली.
       राहता येथे रिपाई कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली  यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी  साळवे यांच्या निवडीची घोषणा केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले व राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या वर निष्ठा ठेवत साळवे यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
   यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजयरावं  वाकचौरे, राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष  पप्पू बनसोडे, उत्तर महाराष्ट्र संघटक रमेश शिरकांडे, राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
        गणेश साळवे यांचे अकोले मूळ गाव असून व्यवसाया च्या निमित्ताने शिर्डी येथे वास्तव्य आहे. युवकामध्ये त्यांचे संघटन आहे. त्यांचे नेतृत्व कौशल्य पाहून जिल्हा कार्यकारणी मध्ये संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
       भविष्यकाळात रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश साळवे यांनी सांगितले . यावेळी अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते. 
त्यांच्या या निवडीचे ना. रामदास आठवले, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी अभिनंदन केले.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...