गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

राहता येथे महाविकास आघाडीचा मेळावा ...

राहता येथे महाविकास आघाडीचा मेळावा ...


 राहाता 


 गणेश साखर कारखाना , राहुरी साखर कारखाना ,श्रीरामपूर दूध जिल्हा संघ अशा चांगल्या चालणाऱ्या संस्था यांनी बंद पाडल्या. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक पक्ष बदलले. परंतु गणेश कारखाना निवडणूक व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आपण यांच्या दहशतीचे झाकण उडवले आहे. आता उर्वरित दहशत संपविण्याची काम या निवडणुकीत सर्वांनी मिळून करायचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजीमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केली



शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्या त आमदार थोरात बोलत होते. या मेळाव्यात कृषीभूषण व लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी  भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे,  जयंत वाघ, गणेशचे माजी अध्यक्ष एड. नारायणराव कार्ले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, संजय शिंदे, निळवंडे कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, लताताई डांगे, राजेंद्र निर्मळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


यावेळी मार्गदर्शन करताना  थोरात म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखाना, राहुरी कारखाना व बाभळेश्वर दूध संघ यासारख्या चांगल्या संस्था का बंद पडल्या ? स्वतःच्या फायद्यासाठी विरोधकांनी पक्ष बदलले.  चांगल्या चाललेल्या सहकारी संस्था मोडकळीस आणल्या; परंतु यावेळेस परिवर्तन नक्कीच होणार आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील महायुतीच्या सरकारला धडा शिकवून महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. शिर्डी मतदार संघातील जनतेला गुलामी व दहशतीच्या राजकारणातून मुक्त करायचे आहे. 


संगमनेर तालुक्यात आम्ही कधीही विरोधकांना त्रास दिला नाही. विरोधकांच्या संस्थांनाही कधी आडकाठी घातली नाही. संगमनेर तालुका कधीही दहशतीखाली नव्हता आणि राहणार नाही. आम्ही राजकारणाला राजकारणाच्या जागेवर ठेवतो. विनाकारण कुणाला वेठीस धरणे आम्हाला जमत नाही. असे सांगून आमदार थोरात पुढे म्हणाले, आज विरोधक शिर्डीला एमआयडीसी करणार असे सांगतात परंतु त्यांच्याच कुटुंबाकडे मागील साठ वर्षे सत्ता होती. आजोबा खासदार, तुम्ही आमदार, मंत्री होते मग का एमआयडीसी झाली नाही ? आयटी पार्कच्या आश्वासनाचे काय झाले. नगर दक्षिण मतदार संघात जर त्यांचे इतके मोठे काम होते तर तेथील जनतेने लोकसभेत यांना का नाकारले? याचे चिंतन विरोधकांनी कुठेतरी केले पाहिजे. 


नगर मनमाड रोड किती वर्ष नादुरुस्त आहे.अपघातात अनेक प्रवासी अपंग झाले तर अनेक जण प्राणास मुकले. याला जबाबदार कोण? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार का पळून जायचे त्यांना कोणाचा त्रास होता? 

महाराष्ट्र शेती महामंडळाची जमीन मी महसूल मंत्री असताना वाटप करून दिली ते काम ६० वर्षे प्रलंबित होते. या कामातही आडवा आडवी झाली. 

या भागाला निळवंडे धरणाचे पाणी आले आहे. त्यामुळे आता समृद्धी आली आहे. निळवंडे धरण व कालव्याच्या कामात यांची कवडीची ही मदत नाही. उलट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर यांनी लाठीचार्ज केला. यांनी राबवलेले वाळू धोरण सपशेल फसले आहे. जमीन व्यवहारात किती भ्रष्टाचार आहे हे जनतेला समजले आहे असे थोरात यांनी म्हटले आहे 

याप्रसंगी भाऊसाहेब वाकचौरे,  डॉ. तांबे, एड. नारायणराव कार्ले, प्रभाताई घोगरे, संजय शिंदे आदींची भाषणे झाली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...