रविवार, १ सप्टेंबर, २०२४

गोदावरी कालव्यातून ओव्हरफ्लो च्या पाण्याने गणेश परिसरातील बंधारे भरून द्यावे

राहाता (वार्ताहर) गोदावरी नदीला सुरू असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातील गणेश साखर कारखाना परिसरातील गणेश बंधारे, छोटे मोठे इतर बंधारे, गाव तळी, नाले जलसंपदा विभागाने भरुन द्यावेत अशी मागणी गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी केली.

 तालुक्यात भीज पाऊस झाला. परंतु शेतातून पाणीही निघालेले नाही. जमिनीतील पाणी पातळी वाढलेली नाही रस्त्याच्या कडेच्या साईड गटार तसेच अन्य ठिकाणी अजूनही पाणी साठलेले दिसून येत नाही. पावसाचे प्रमाण कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात दारणा, गंगापूर, पालखेड धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले आहे. यामुळे धरणं तुडूंब भरून जायकवाडीला गोदावरीतून जवळपास ३५ टिएमसी पाणी वाहिले. त्यामुळे जायकवाडीचा समन्यायी प्रमाणे ६५ टक्क्यांचा कोठा पूर्ण होवून अजूनही पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. मात्र गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात परिस्थिती वाईट आहे. पावसाने लाभक्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले. परंतु विहिरी अथवा विंधन विहीरी यांना मात्र पाणी वाढले नाही. त्यामुळे निळवंडे व गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिवाळीनंतर पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. यासाठी गोदावरी कालव्यातून ओव्हरफ्लोच्या पाण्याने गणेश परिसरातील बंधारे भरून द्यावेत. ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे गोदावरी कालव्यांचे पाणी सोडण्यात यावे.

हे बंधारे भरल्यास विहिरींना पाझर निर्माण होईल. यामुळे दोन ते तीन महिने पुढे पाणी टिकेल. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटू शकेल. शिवाय उभ्या पिकांना, जनावरांच्या हिरवा चारा शेतात उभा राहून दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. गणेश परिसरातील ऊस, फळबागा तसेच चारा पिकांना याचा फायदा होईल.

निळवंडे कालव्याचे पाणीही गणेश परिसरातील जिरायती टापूतील गावांमध्ये सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निळवंडेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये असणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये निळवंडेचे पाणी सोडण्यात यावे, यासंदर्भात गणेशचे मार्गदर्शक आ. बाळासाहेब थोरात यांना तसेच गोदावरी कालव्यांचे पाणी बंधाऱ्यामध्ये सोडण्यासाठी संजिवनीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनाही साकडे घालण्यात आले आहे असे अध्यक्ष लहारे व उपाध्यक्ष दंडवते यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...