रविवार, १ सप्टेंबर, २०२४

नेहमी संघटनेच्या अडचणीच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे असणारे - डॉ ओमप्रकाशजी शेटे साहेब

नेहमी संघटनेच्या अडचणीच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे असणारे - डॉ ओमप्रकाशजी शेटे साहेब
शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे व्हाईस ऑफ मीडिया राज्यस्तरीय शिखर अधिवेशनानिमित्त माननीय डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब प्रमुख आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र तथा माजी विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे व्हॉइस ऑफ मीडिया राज्यस्तरीय शिखर अधिवेशनास निमित्त आले असता ऑल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी अधिकारी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संघटनेच्या कामकाजाबद्दल चर्चा केली व  साहेबांचा सन्मान केला 
ऑल इंडिया लॅबोरेटरी ऑफिसर असोसिएशन चे झोनल सेक्रेटरी श्री रामेश्वर जी लांडगे साहेब यांनी संघटनेचे पदाधिकारी यांना कल्पना दिली व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घनगाव ,कार्याध्यक्ष सुरेश जेजुरकर यांनी शिर्डी येथे जाऊन माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेब यांचा  सत्कार केला व अडीअडचणी बाबत सखोल चर्चा केली ,
 नेहमी संघटनेच्या  अडचणीमध्ये खंबीरपणे आमच्या पाठीशी  उभे असणारे माननीय डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब होय, *माणुसकी ही जात आणि मानवता हाच धर्म * असे मानणारे व सदैव रुग्णसेवीशी तत्पर असणारे शेटे साहेब नेहमीच संघटनेला मदत करत असतात आमचे प्रश्न तळमळीने मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत पाठपुरावा करून संघटनेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे असे आमचे आधारस्तंभ आमच्या संघटनेला नेहमीच मदत करतात  संघटनेचे नॅशनल झोनल सेक्रेटरी रामेश्वर जी लांडगे व  प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय उबाळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत,
अखिल भारतीय अधिकारी संघटनेच्या दिल्ली येथे होणाऱ्या 43 व्या नॅशनल कॉन्फरन्स साठी डॉ.ओमप्रकाशजी शेट साहेब सर्वतोपरी मदत  करत आहेत त्यामुळे कॉन्फरन्स यशस्वी होईल यात कुठलीही शंका नाही या कॉन्फरन्स साठी ऑल इंडिया लॅबोरेटरी अधिकारी असोसिएशनचे नॅशनल ट्रेझर अमोलजी पाटनी, नॅशनल सेक्रेटरी रामेश्वरजी लांडगे ,अविनाशजी धमगावे सहकोषधक्ष     , राज्य सेक्रेटरी कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे व दिल्ली येथे होणाऱ्या कॉन्फरन्स साठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय अधिकारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे नॅशनल सेक्रेटरी रामेश्वरजी लांडगे व सर्व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...