रविवार, १ सप्टेंबर, २०२४

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेचा राहाता येथील महविकास आघाड़ीचे वतीने निषेध

राहाता (वार्ताहर) महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून  सरकारचा निषेध करण्यात आला  
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेचा निषेध म्हणून राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या जवळ महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडोमारो आंदोलन करण्यात आली. सरकारच्या विरोधात घोषणा देऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलकांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा. तसेच 
महाविकास आघाडी कार्यकर्ते, पदाधिकारी,शिवप्रेमी यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.
यावेळी प्रभावती घोगरे, सचिन गुजर, ऍड. पंकज लोंढे, गणेश सोमवंशी, सोमनाथ गोरे, धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, सचिन चौगुले, रणजित बोठे, उत्तमराव घोरपडे आदींची भाषणे झाली.
या आंदोलनात प्रभावती घोगरे, ऍड. पंकज लोंढे,  सचिन गुजर,सोमनाथ गोरे, धनंजय गाडेकर,विजय दंडवते,भगवानराव टिळेकर, संपत हिंगे  शशिकांत लोळगे  अनिल बोठे, निलेश कार्ले, रणजित बोठे, नितीन सदाफळ, उत्तमराव घोरपडे सचिन चौगुले,निलेश डांगे, मच्छिंद्र गुंजाळ, प्रभाकर डांगे, संतोष वाघमारे,सदाशिव गाडेकर, साहिल मस्के, शिवप्रसाद आहेर,जाकीर शेख, संदीप कोकाटे, सोमनाथ जेजुरकर, जाईद दारुवाले,भानुदास कातोरे, सुनील परदेशी,गोकुळ ठुबे,कुणाल गोरे, मच्छिंद्र भवर,अमोल आराणे,अमोल गोर्डे,अजय त्रिभुवन, साहिल खर्डे, सागर कडू तसेच असंख्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...