शारदा शैक्षणिक संकुल राहता आयोजित थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय कारभारी लक्ष्मण शिंदे पाटील स्मृती पित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेतील विद्यार्थीनी गौरी किरण घोगळ हिने लहान गटामध्ये *महाराष्ट्रातील जडणघडणीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे योगदान* या विषयावर भाषण करून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील, अण्णासाहेब कोते पाटील,दादासाहेब गाढवे पाटील, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिलकाका गाढवे पाटील,रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपान कासार , उपसरपंच नीलिमाताई राजेंद्र गाढवे पाटील ,श्री जयाभाऊ कालेशेठ , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गाढवे पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय वसावे के .के.सर व सर्व सेवक यांनी अभिनंदन करून कौतुक केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा