शुक्रवार, २८ जून, २०२४

त्रिशा फाउंडेशन ठाणे यांची मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक सावळविहीर बुद्रुक शाळेस लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप व शालेय साहित्य विद्यार्थ्याना वाटप

त्रिशा फाउंडेशन ठाणे यांची मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक सावळविहीर बुद्रुक शाळेस लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप 
राहाता प्रतिनिधी…
*त्रिशा फाउंडेशन ठाणे यांच्यामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळविहीर बुद्रुक शाळेत आज शाळेसाठी लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप ,इयत्ता पहिलीच्या मुलांना स्कूल बॅग, इयत्ता दुसरीच्या मुलांना रायटिंग पॅड, इयत्ता तिसरी, चौथीच्या मुलांना पेन पाऊच पॅक याप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, मागील वर्षी देखिल त्यानी खुप शैक्षणीक साहित्य वाटप केले होते, आज न्यू इंग्लिश स्कूल मध्ये देखिल त्यांनी आठवी ते दहावी वर्गातील सर्व मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप करून आरोग्याच्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी यावेळी असे सांगीतले की श्री साईबाबांच्या दर्शनाला आलो आणि त्यांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेउन समाजसेवेचे व्रत हाती घेतले, अजुन खुप काही शाळेच्या मुलांना देणार आहे, मोफत सेमिनार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ऑनलाईन शिक्षणं मिळण्यासाठी जास्तीत जास्त भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.यावेळी शाळेचे अहवाल वाचन श्री दत्ता गायकवाड सर यांनी केले.मुख्याध्यापक श्री नानासाहेब मेहेत्रे सर यांनी शाळेतील अडीअडचणी सांगितल्या, कार्यक्रम सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार श्रीमती विद्या गोर्डेयांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती रुपाली मंद्रे, सविता सानप, सुचित्रा चवाळे, संगिता याईस, सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले.त्यावेळी त्रिशा फाउंडेशनचे श्री जयेश बेहेडे सर, आणि सौ मिलन बेहेडे मॅडम, कुमारी त्रिषा बेहेडे,केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री सोमनाथ जावळे सर, त्याचप्रमाणे शिर्डी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हारून शेख सर, सावळविहीर बुद्रुक शाळेचे केंद्र मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ, विद्यार्थी उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...