शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ या ठिकाणी दिवंग्याचे आराध्य दैवत डॉक्टर हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे विशेष शिक्षक गणेश सातपुते सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर. व वस्तीग्रह अधीक्षक मल्लिनाथ पटणे हे होते डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान गटात बादलीत बॉल टा कने. मोठ्या गटात लंगडी खेळणे. तो बोल अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील क्रीडा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश सातपुते सर यांनी डॉक्टर हेलन केलर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली स्वतः दिव्यांग अजून त्या दिव्यांगा वर मात करून दिव्यांग शिक्षणासाठी डॉक्टर हेलन केलर सतत झटत राहिल्या दिव्यांगाचे शिक्षण त्यांनी पूर्ण करून दिव्यांगासाठी एक मोलाचे योगदान दिव्यांगासाठी दिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा