गुरुवार, २७ जून, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मद्यपान विरोधी दिन साजरा


साईसेवा मतिमंद विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मद्यपान विरोधी दिन साजरा* 

शिर्डी प्रतिनिधी : 
 

   आज दिनांक २६ जून २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले. विद्यालयातील विशेष शिक्षिका श्रीमती नंदा शेळके मॅडम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली.
    हा कार्यक्रम सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...