आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात आणि अभिजीत पोटे यांचे नेतृत्वात थकीत ऊस बिलाव3रील 18% व्याज मिळवण्यासाठी मंत्रालयावर धडक
X
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राज्याचे साखर आयुक्त आणि अहमदनगर प्रादेशिक कार्यालय शेतकऱ्यांना थकीत बिलावरची व्याzज मिळवून देतील असे आम्हाला तरी वाटत नाही साखर कारखाने शेतकऱ्यांना ऍडव्हान्स पैसे देतात ही रक्कम साखर कारखान्याला येणाऱ्या उसाच्या दहा-वीस टक्के पेक्षा जास्त नसते परंतु डायरेक्ट ऊस बिलातून ही रक्कम साखर कारखाने 18 ते 22 टक्के व्याज आकारून शेतकऱ्याची कुठलीही संमती न घेता ऊस बिलातून कापून घेतात मग शेतकऱ्यांना उशिरा मिळणाऱ्या ऊस बिलाला व्याज देण्यास साखर कारखानदारांच्या पोटात काय दुखते त्यामुळे आर आर सी जप्ती ही तर सुरुवात आहे अजून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्याज 18% प्रमाणे मिळून देणे अजून बाकी आहे यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्रित येणे आणि त्यांच्यात जनजागृती होणे फार गरजेचे आहे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाची पदाधिकारी गावोगावी जाऊन जनजागृती करतील
पावसाळी अधिवेशनात नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊनसुमारे 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक, टेम्पो घेऊन मुंबई मंत्रालयावर जाणार आहोत यावेळेस लढाई आरपारची असेल
पत्रकार परिषदेमध्ये प्रहार चे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, नेवासा तालुकाध्यक्ष जालिंदर आरगडे श्रीरामपूर शहराध्यक्ष सोमनाथ गर्जे, रणजीत सिनारे, नेवासा तालुका युवा कार्याध्यक्ष देविदास मनाळ हे पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा