शुक्रवार, ३१ मे, २०२४

एकरुखे येथे अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


एकरुखे येथे अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

एकरूखे  -
राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त एकरूखे येथे शिवचरित्रकार श्री हसन सय्यद यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दिलीप सातव यांनी भूषवले,
अहिल्यादेवी यांची जिवन गाथा सांगतांना हसन सय्यद उपस्थितांना उद्देशून बोलतांना म्हणाले की अहिल्यादेवी आपल्या माते समान आहे त्यांच्या कार्याचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे त्यांनी संपूर्ण भारतभर पाण्याचे अनेक बारव बांधले मंदिरांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले, बंधारे बांधली, स्रियांना सन्मानाची वागणूक मिळवून दिली, आपल्या परिसरात असलेले पुरातन बारवे व मंदिरे यांचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे त्यासाठी सर्वांनी महापुरुषांच्या विचाराचे वारसदार होणे गरजेचे आहे तरुण पिढीने जात धर्म विसरून एकत्र येऊन समाज जोडण्याचे काम केले पाहिजे,
यावेळी सुनिल कोल्हे, बाबासाहेब सातव, देवेंद्र भवर, दिलीप सातव वसंत कदम यांनी देखील मनोगत व्यक्त केले 
एकरूखे गावात धार्मिक व ऐतिहासिक वारसा असलेले पुरातन बारव असून त्याठिकाणी दर वर्षी वज्रेश्वरी मातेच्या यात्रा प्रसंगी घडा काढण्याची प्रथा पाहण्यासाठी हजारो भाविक यात्रेला येत असतात त्या पुरातन बारव व परिसराचे जतन, संवर्धन व सुशोभीकरन गावाचे नाव लौकीक वाढवण्याच्या दृष्ठिने गावातील होतकरू तरुणांनी एकत्र येत बारवाची साफ सफाई केली तसेच येणाऱ्या काही दिवसात बारवाच्या धार्मिक एतिहासीक वैभवला अडथळा ठरणाऱ्या अन्य बाबीत बदल करण्यासाठी गावातील सर्व तरुण एकत्र येतील असे आश्वासन वाल्मिक सातव आणि विलास सातव व देवेंद्र भवर यांनी दिले .
यावेळी दिलीप सातव, जगन्नाथ सोनवणे, जालिंदर गाढवे, मोठ्याभाऊ दातीर, मधुकर सातव, देवेंद्र भवर, सुरेश सातव, गणेश थोरात, संतोष भवर, संदीप क्षीरसागर, वाल्मिक सातव, विलास सातव, बाबासाहेब सातव, जयसिंग सातव, भाऊसाहेब गाढवे, सुनिल कोल्हे, संजय तुपे, हर्षल सातव, अमोल तागड, साईनाथ बुट्टे, विक्रम सातव, कैलास झणान, गोरख खिलारी, संग्राम सातव, प्रफुल्ल सातव, रामभाऊ सातव, साहेबराव गाढवे, नितीन जगताप, राजेंद्र राहिन्ज, राजेंद्र लबडे, दत्तू सातव, अनिल सातव उपस्थित होते 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय सोनवणे यांनी केले ,सूचक सुनील कोल्हे ,अनुमोदक हर्षल सातव
यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार लेखक: डॉ. येलम कन्सल्टंट इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट Manomay ...