शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर मृत्यूमुखी तिसऱ्या दिवशी शेतात अर्धवट मृतदेह आढळला नेवासा तालुक्यात खळबळ आमदार लंघेंची घटनास्थळी धाव

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर मृत्यूमुखी तिसऱ्या दिवशी शेतात अर्धवट मृतदेह आढळला 
नेवासा तालुक्यात खळबळ आमदार लंघेंची घटनास्थळी धाव 

नेवासा प्रतिनिधी 

:-तालुक्यातील गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेळ्या, कुत्र्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता थेट माणसावर हल्ला करू लागल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 
गोधेगाव येथील शेतकरी काशिनाथ औटे यांच्या घराशेजारील शेडमध्ये शेती कामगार सुरेश अहिरे हे झोपले होते. गुरुवार दि.१५ रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जवळच असलेल्या शेतात ओढत नेल्याची हृदयद्रावक घटना घडली.

 दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश अहिरे दिसले नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली त्यावेळी त्यांची चप्पल शनिवार दि.१७ रोजी जवळच्या कापसाच्या शेतात पडलेली आढळली. त्यामुळे बिबट्याने हल्ला केल्याचा संशय बळावला ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत असतानाच शेजारील उसाच्या शेतात सुरेश अहिरे (वय ५५)यांचा पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
हि माहिती समजताच घटनास्थळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे, वन अधिकारी अविनाश तेलोरे ,महसूल अधिकारी,आरोग्य अधिकारी यांना पुढील सुचना आमदार लंघे यांनी दिल्या आमदार लंघे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली. तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची यावर नियंत्रण नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
आजपर्यंत गोधेगाव परिसरात बिबट्याने शेळ्या,कुत्रे फस्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत,मात्र बिबट्याने थेट माणसावर हल्ला करून फस्त करण्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासही शेतकरी घाबरत आहेत या नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गोधेगावसह परिसरातील तालुक्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी नदी काठावरील गावातील दिवसा बिबटे फिरताना दिसत असून वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...