नशीब सर्व देतो, ते आम्हाला कळाले पाहिजे : अर्चनाताई साळुंके
केलवड येथे संत बाळूमामा जन्मोत्सव
राहाता :
आयुष्यात परिस्थिती बदलणारा देव आहे, दुष्काळ पडला व शेतकऱ्याचे वाटूळे झाले, प्रत्येक परिस्थितीत पडणारा शेतकरी आहे, आपण स्वतः उभ राहील पाहिजे, आयुष्यालाच नाव ठेवायचे असे नाही . नशीब सर्व देते ते समजले पाहिजे असे प्रतिपादन ह भ प अर्चनाताई साळुंके यांनी केले.
तालुक्यातील केलवड गावात शुक्रवारी श्री संत बाळूमामा १३४ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी त्यांचे कीर्तन झाले. अनेक दिवसांपासून या सोहळ्याचे नियोजन सुरू होते, त्यासाठी गावातील अनेक भक्तांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली, गावात मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करून हे नियोजन करण्यात आले होते, सकाळी ८ वाजता बाळूमामा पालखी व कलश मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर भजन व पाळणा कार्यक्रम पार पडला तसेच साडेचार बाजेच्या सुमारास जन्मोत्सव उत्साहात झाला .
या कार्यक्रमासाठी ह भ प अर्चनादिदी साळुंके ( झी टॉकीज फेम) यांचे जाहीर हरीकीर्तन यावेळी ठेवण्यात आले होते, कार्यक्रमाचे मोठे नियोजन असल्यामुळे बाळूमामा भक्तमंडळाचे त्यांनी मोठे कौतुक केले,कीर्तन झाल्यानंतर आरती व संपूर्ण गावाला महाप्रसाद होता, यासाठी गावातील संत बाळूमामा भक्तमंडळ व ग्रामस्थ यांनी काम पाहिले . यावेळी कीर्तनासाठी गावातील मोठ्या प्रमाणात प्रचंड जणसमुदाय उसळला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा